India: Member of the Advanced Motor Fuel Technology Cooperation Program under the IEA

 1. दिनांक 9 मे 2018 रोजी भारत आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (IEA) अंतर्गत प्रगत मोटर इंधन तंत्रज्ञान सहयोग कार्यक्रम (Advanced Motor Fuels Technology Collaboration Program) याचा सदस्य म्हणून निवडला गेला आहे, ही घोषणा केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे.
 2. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेमध्ये (International Energy Agency -IEA) भारताला दिनांक 30 मार्च 2017 पासून "सहकारी (असोसिएशन)" दर्जा दिला गेला आहे.
 3. अमेरिका, चीन, जपान, कॅनडा, चिली, इस्राएल, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क, स्पेन, कोरिया, स्वित्झर्लंड आणि थायलंड हे या कार्यक्रमाचे इतर सदस्य आहेत.
 4. कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दीष्ट म्हणजे प्रदूषकांचे उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि वाहतूक क्षेत्रात इंधनाबाबत उच्च कार्यक्षमता प्राप्त करण्याच्या हेतूने प्रगत मोटर इंधन वा पर्यायी इंधनांच्या बाजारपेठांची ओळख करुन देणे हा आहे.
 5. या कार्यक्रमामध्ये सहभागाचे फायदे म्हणजे संशोधनासाठी खर्च सामायिक करण्यात येईल आणि तांत्रिक स्त्रोतांची उपलब्धता वाढणार आहे.
 6. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) ही 1974 साली आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (Organisation for Economic Co-operation and Development -OECD) याच्या संरचनेत स्थापन करण्यात आलेली एक स्वायत्त आंतरसरकारी संस्था आहे.
 7. IEA चे सचिवालय पॅरिस (फ्रान्स) येथे आहे.


ISRO will send a space mission to study the planet Venus in 2023

 1. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) 2023 साली शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी अंतराळ मोहीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. ISROच्या या द्वितीय आंतरग्रहीय मोहिमेमधून शुक्रावर थर्मल कॅमेरा, मास स्पेक्ट्रोमिटर आणि क्लाउड मॉनिटरिंग कॅमेरासह एकूण 12 वैज्ञानिक प्रयोग पाठविण्याची योजना आहे.
 3. आकार, वस्तुमान, घनता, संरचना आणि गुरुत्वाकर्षण या घटकांच्या समानतेमुळे शुक्र ग्रह पृथ्वीची "जुळी बहीण" असल्याचे मानले जाते.
 4. या मोहिमेत पृष्ठभाग, वातावरणाची रासायनिक संरचना आणि सौर विकिरण वा सौर पवन या घटकांचा अभ्यास केला जाणार.
 5. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे.
 6. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले.
 7. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.
 8. ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत संघाने प्रक्षेपित केला.
 9. 1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा प्रक्षेपित करण्यात आला.
 10. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली आणि चंद्रावर पोहचणारा भारत हा जगातला चौथा देश बनला.
 11. त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.


NASA's 'Ralph' campaign will visit the Guru Planet's 'Trojan' asteroid

 1. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) याच्या ‘न्यू होरीझन्स मिशन’ अंतराळयानाने ‘राल्फ’ या शोधक उपकरणाला गुरु ग्रहाच्या कक्षेत पाठवले गेले आहे आणि योजनेनुसार हे उपकरण सन 2021 मध्ये लुसी मिशनच्या अंतर्गत गुरुच्या ‘ट्रोजन’ या लघुग्रहाला भेट देणार आहे.
 2. 2006 साली ‘न्यू होरीझन्स’ अंतराळयान पाठवले गेले आणि त्यावरील ‘राल्फ’ या शोधक प्रयोगाने अनेक शोध घेतले आहेत.
 3. राल्फ ही प्लूटो आणि त्याच्या चंद्राला भेट देणारी पहिली मोहीम होती.
 4. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ही संयुक्त राज्य अमेरिकेची (UAS) एक सरकारी शाखा आहे, जी देशाच्या सार्वजनिक अंतराळ कार्यक्रमांचे आयोजन करण्यास आणि हवाई उड्डाणशास्त्र व अंतराळ संशोधनासाठी जबाबदार आहे.
 5. NASA ची स्थापना 19 जुलै 1948 रोजी नॅशनल अॅडवायजरी कमिटी फॉर एरोनॉटिक्स (NCA) याच्या जागी केली गेली होती.
 6. या संस्थेने 1 ऑक्टोबर 1948 पासून कार्य करण्यास सुरुवात केली. 


Top