International Indian Science Festival 2018

 1. आंतरराष्ट्रीय भारतीय विज्ञान महोत्सव २०१८ला ५ ऑक्टोबर रोजी लखनौ (उत्तर प्रदेश) येथे सुरूवात झाली.
 2. या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. ही परिषद ४ दिवस चालेल. यामध्ये १० हजारपेक्षा जास्त शास्त्रज्ञ व विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
 3. यंदाच्या आंतरराष्ट्रीय भारतीय विज्ञान महोत्सवाचा मुख्य विषय ‘Science for Transformation’ हा आहे.
 4. या महोत्सवाचे आयोजन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांनी इंदिरा गांधी प्रतिष्ठानच्या (लखनौ) सहयोगाने केले आहे.
 5. पहिल्या आंतरराष्ट्रीय भारतीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन २०१५मध्ये आयआयटी नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.
 6. त्यानंतर २०१६मध्ये राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा नवी दिल्ली आणि २०१७मध्ये चेन्नई येथे आंतरराष्ट्रीय भारतीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.


Center of Excellence for Nasscom's IOT in Gurgaam

 1. भारताच्या आयटी उद्योगाची शिखर संस्था नॅसकॉमने गुरुग्राम (हरियाणा) येथे इंटरनेट ऑफ थिंग्ससाठी (IoT) सेंटर ऑफ एक्सलन्ससुरु केले.
 2. हे केंद्र हरियाणा सरकारच्या सहकार्याने सुरु करण्यात आले असून, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रव्यापी सहकार्याचा ते भाग आहे.
 3. हे केंद्र आयओटीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच नवकल्पनांवरील सहकार्यासाठी उपयुक्त मंच प्रदान करेल.
 4. आयओटीशी संबंधित नवकल्पनांना चालना देण्याचे कार्य हे केंद्र करेल.
 5. उद्योग, शिक्षण, स्टार्टअप आणि भारताच्या आर्थिक विकासासाठी नवीन उपाय शोधण्यासाठी हा एक उपयुक्त मंच असेल.
 6. आयओटी क्षमता विकसित करण्यासाठी बुद्धिमत्तेच्या आदान-प्रदानासाठी आणि तंत्रज्ञान सहकार्यासाठी देखील हे केंद्र एक उपयुक्त मंच ठरेल.
 7. इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी):-
  1. ही एक युनिक आयडेंटीफायरद्वारे आपापसांमध्ये जोडलेल्या संगणकीय साधने, स्मार्टफोन, वेअरएबल डिव्हाइसेस, होम अॅप्लिकेशन्स, वाहने यांची एक प्रणाली आहे.
  2. ब्रिटीश उद्योजक केविन ॲस्टोन यांनी १९९९मध्ये सर्वप्रथम ही संकल्पना मांडली होती.
  3. या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ही एक अतिशय सुरक्षित प्रणाली आहे. यामध्ये माहितीशी छेडछाड करता येत नाही.
 8. नॅसकॉम (NASSCOM):-
  1. पूर्ण रूप: नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज
  2. स्थापना: १ मार्च १९८८
  3. मुख्यालय: नोएडा, उत्तर प्रदेश
  4. सदस्य: २०००पेक्षा जास्त कंपन्या
  5. चेअरमन: रिशाद प्रेमजी
  6. नॅसकॉम भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि बिजनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (बीपीओ) उद्योगांची ना-नफा तत्वावर कार्य करणारी गैरसरकारी जागतिक संघटना आहे.
  7. ही संस्था सॉफ्टवेअर व सेवांमध्ये व्यावसायिक सुविधा प्रदान करते आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञानात संशोधनाला प्रोत्साहन देते.
  8. बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोची, कोलकत्ता, मुंबई, पुणे आणि तिरुवनंतपुरम येथे या संस्थेची प्रादेशिक कार्यालये आहेत.
  9. या विश्वस्तरीय आयटी व्यापार संस्थेच्या २०००पेक्षा जास्त कंपन्या सदस्य आहेत. यातील २५०हुन अधिक कंपन्या चीन, युरोप, जपान, अमेरिका आणि ब्रिटन या देशांमधील आहेत.
  10. नॅसकॉमच्या सदस्य कंपन्या सॉफ्टवेअर विकास, सॉफ्टवेअर सेवा, सॉफ्टवेअर उत्पादने, आयटी, बीपीओ सेवा आणि ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.


Combined maneuvers of Coast Guard of India and Vietnam

 1. भारत आणि व्हिएतनामच्या तटरक्षक दलाच्या सहयोग HOP TAC २०१८ या संयुक्त युद्धाभ्यासाचे आयोजन बंगालच्या उपसागरात करण्यात आले.
 2. दोन्ही देशांच्या नौदलाच्या तटरक्षक दलांमध्ये कारवाई दरम्यान समन्वय दृढ करणे हा या युद्धाभ्यासाचा मुख्य उद्देश आहे.
 3. सहयोग HOP TAC २०१८:- 
  1. या अभ्यासाचा उद्देश दोन्ही देशांच्या तटरक्षक दलादरम्यान सागरी क्षेत्रातील बचाव कार्यामध्ये वर्किंग लेव्हल संबंधाना मजबूत करणे हा होता.
  2. या अभ्यासात अपहरण आणि समुद्री चाच्यांच्या विरूद्ध कारवाई करण्याचा सराव करण्यात आला.
  3. याव्यतिरिक्त या अभ्यासात आग विझविण्याचा सरावही करण्यात आला.
  4. या सरावात भारताकडून तटरक्षक दलातील शौर्य, अर्न्वेश ही जहाजे, इंटरसेप्टर बोट सी-४३१, डोर्नियर विमान आणि चेतक हेलीकॉप्टरने सहभाग घेतला.
  5. याव्यतिरिक्त राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या सागर मंजुषा जहाजानेदेखील सहभाग घेतला.


Flagwalker for the Thangvillu Mariyappan Asian Para competition

 1. रिओ पॅराऑलिम्पिक खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारा थांगवेलु मारियप्पन याची तिसऱ्या आशियाई पॅरा स्पर्धा २०१८साठी भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे.
 2. या स्पर्धेसाठी ३०२ सदस्यांचा संघ भारत पाठवित आहे. त्यात ॲथलीट, प्रशिक्षक, अधिकारी व इतर कर्मचारी सामील आहेत.
 3. थांगवेलु मारियप्पनचा जन्म २८ जून १९९५ रोजी तामिळनाडूच्या सलेम जिल्ह्यात झाला.
 4. २०१६च्या रिओ ग्रीष्मकालीन पॅराऑलिम्पिक खेळांमध्ये त्याने उंच उडीमध्ये सुवर्णपदकजिंकले होते.
 5. त्याच्या योगदानासाठी २०१७मध्ये भारत सरकारने त्याला पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले.
 6. आशियाई पॅरा स्पर्धा २०१८:-
  1. आशियाई पॅरा स्पर्धेची ही तिसरी आवृत्ती आहे.
  2. आशियाई पॅरा स्पर्धा ६ ते १३ ऑक्टोबर दरम्यान इंडोनेशियातील जकार्ता येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
  3. या स्पर्धेत १८ खेळांमध्ये ५४६ इव्हेंट्स आयोजित केले जातील. ४२ देश या स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत.


Sentenced to former South Korean President Lee Myung Baak

 1. दक्षिण कोरियाच्या सेऊलस्थित न्यायालयाने देशाचे माजी राष्ट्रध्यक्ष ली म्यूंग बाक यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात १५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
 2. ली म्यूंग बाक २००८ ते २०१३ दरम्यान दक्षिण कोरियाचे १०वे राष्ट्रध्यक्ष होते. तुरुंगवासाची शिक्षा झालेले ते दक्षिण कोरियाचे चौथे राष्ट्रध्यक्ष आहेत.
 3. त्यांची उत्तराधिकारी आणि दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला राष्ट्रध्यक्ष पार्क ग्युन-हे यांनासुद्धा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
 4. पार्श्वभूमी:-
 5. ली म्यूंग बाक यांच्यावर सॅमसंग आणि इतर मोठ्या कंपन्यांकडून अवैधरित्या १० दशलक्ष डॉलर्स प्राप्त केल्याचा आरोप आहे.
 6.  याव्यतिरिक्त, ली म्यूंग बाक खाजगी वाहन निर्मात्या कंपनीकडून २१.७७ दशलक्ष डॉलर्सची लाच घेतल्याप्रकरणी दोषी आढळून आले आहेत.
 7. १५ वर्षे तुरुंगवासाव्यतिरिक्त त्यांना १३ अब्ज वोन (दक्षिण कोरियाचे चलन) इतका दंडही ठोठाविण्यात आला आहे.
 8. ली म्यूंग बाक:-
  1. दक्षिण कोरियाचे राजनेता ली म्यूंग बाक यांचा जन्म १९ डिसेंबर १९४१ रोजी झाला. २००८ ते २०१३ दरम्यान ते दक्षिण कोरियाचे १०वे राष्ट्राध्यक्ष होते.
  2. त्यापूर्वी ते ह्युंडाई अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. १ जुलै २००२ ते ३० जून २००६ दरम्यान ते सेऊलचे महापौर होते.
  3. डिसेंबर २००७मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांना ४८.७ टक्के मते मिळाली. २५ फेब्रुवारी २००८ त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदभार स्वीकारला.
  4. २२ मार्च २०१८ रोजी त्यांना भ्रष्टाचार, लाच, पदाचा दुरुपयोग आणि कर चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली.


Top