1. अमेरिकेत सुरू असलेल्या विश्व पोलीस व फायर क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला दोन सुवर्ण, एक रौप्यपदक मिळाले. त्यात कोल्हापूरच्या जयश्री बोरगी, मुंबईची सोनिया मोकल यांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्ण, तर मुंबईच्याच रवींद्र जगताप याने कुस्तीत रौप्यपदक पटकाविले.
  2. लॉस एंजिल्स येथे सुरू असलेल्या स्पर्धेत जयश्री बोरगी हिने 5 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यापाठोपाठ सोनिया मोकल हिने 800 मीटर धावणे स्पर्धेत देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.
  3. तसेच 71 किलोगटात ग्रीको रोमन प्रकारात मुंबईच्या रवींद्र जगतापने रौप्यपदक मिळवून दिले.सन 2015 मध्ये अमेरिकेतील फेअर फॅक्स राज्यातील व्हर्जिनिया येथे झालेल्या स्पर्धेत जयश्री बोरगी हिने 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. त्यासह तिने भारतीय पोलीस दलातील धावपटू रहमान याने नोंदविलेला 11.31.29 ही विक्रमी वेळही मोडत 11.03.21 अशी वेळ नोंदवत 5000 मीटर10000 मीटर धावण्यात सुवर्ण, तर 5000 मीटर चालण्यात रौप्यपदकाची कमाई केली होती.अशाप्रकारची कामगिरी करणारी ती पोलीस दलातील एकमेव महिला धावपटू ठरली आहे.


  1. सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिला आहे. पुण्याजवळ असलेल्या अँबी व्हॅलीचा लिलाव थांबवण्यात यावा म्हणून सहारा समुहानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती जी सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळे आता अँबी व्हॅलीचा लिलाव होणार हे अटळ आहे. त्यामुळे अँबी व्हॅली बेसहाराच झाली आहे. 
  2. सेबीनं अँबी व्हॅलीचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली कारण सुप्रीम कोर्टानं सहारा समुहाला २० हजार कोटी रूपये जमा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र ते चुकविण्यात आलेली नाही, मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज मिळून आता ही रक्कम ३७ हजार कोटी रूपये झाली आहे असंही सेबीनं म्हटलं आहे. ही रक्कम सहारा समुहाच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना दिली जाणार आहे ज्या योजना सेबीनं बेकायदेशीर ठरविल्या आहेत.
  3. सहारा समुहानं मुद्दल रक्कमेतल्या म्हणजेच मूळ २० हजार कोटींमधीलच एका मोठ्या रकमेचा भरणा केलेला नाही. २० हजार कोटीपैकी ९ हजार कोटी येणं बाकी आहे असंही सेबीनं म्हटलं आहे. २५ जुलै रोजी झालेल्या सुनावणीत सहारा समुहानं रक्कम जमा करण्यासाठी  ८ महिन्यांची मुदत मागितली होती. मात्र न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठानं सहारा समुहाला एवढी मुदत देण्यास नकार दिला आहे. 
  4. एवढंच नाहीतर आता अँबी व्हॅलीच्या लिलावाची प्रक्रियाही सुरू करण्यात यावी असं मुंबई हायकोर्टानंही म्हटलं आहे. अँबी व्हॅलीची किंमत सहारा समुहानं ३९ हजार कोटींपेक्षा जास्त लावली आहे. तर न्यायमूर्ती मिश्रा यांच्या खंडपीठानं याआधीच अँबी व्हॅलीच्या विक्रीसाठी असलेल्या नियम आणि अटींना मंजुरी दिली आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.