triple talaq amendment

 1. तिहेरी तलाक बेकायदा ठरवणाऱ्या आणि तो देणाऱ्या पतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद असलेल्या विधेयकात केंद्रीय मंत्रिमंडळाने 9 ऑगस्ट रोजी सुधारणा केली.
 2. या कायद्याचा दुरूपयोग होऊ नये, यासाठी ही सुधारणा झाली असून संबंधित पतीला परिस्थितीनुरूप जामीन देण्याचा अधिकार त्यानुसार न्यायालयाला देण्यात आला आहे.
 3. हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने त्याच्या गैरवापराची भीती मोठय़ा प्रमाणात व्यक्त झाली होती. कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली.
 4. ‘मुस्लीम महिला विवाहविषयक हक्क संरक्षण‘ हे विधेयक गेल्या वर्षी लोकसभेत मंजूर करण्यात आले, मात्र ते राज्यसभेत प्रलंबित आहे.
 5. 10 ऑगस्ट रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस असून हे सुधारित विधेयक राज्यसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेत ते मंजूर झाले, तर लोकसभेत परत पाठवले जाऊन त्यातील सुधारणांना मंजुरी मिळवली जाईल, असे सांगण्यात आले. या विधेयकाला आता विरोधकांनी मंजुरी द्यावी, असे प्रसाद म्हणाले.
 6. तिहेरी तलाक हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने पोलीस गुन्हेगाराला जामीन देऊ शकत नाहीत. त्यासाठी त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जावे लागेल, असे प्रसाद यांनी सांगितले.
 7. अर्थात पत्नीला भरपाई देण्यास पतीने मान्यता दिली तरच हा जामीन देता येणार आहे. अर्थात या भरपाईची व्याप्ती किती असावी, याचा निर्णयही न्यायालयावरच सोपवण्यात आला आहे


ramsevak sharma extended 2 year duration as TRAI Chairman

 1. आधार क्रमांक मिळवून त्याद्वारे संबंधित व्यक्तीची सर्व माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंटरनेट हॅकरना सायबरविश्वात खुले आव्हान देणारे तसेच ट्रायचे विद्यमान अध्यक्ष रामसेवक शर्मा यांना केंद्र सरकारने दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे.
 2. ट्रायच्या वीस वर्षांच्या इतिहासात त्याच्या अध्यक्षाला मुदतवाढ देण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
 3. रामसेवक शर्मा हे या पदावरून 9 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार होते. कॅबिनेटच्या नियुक्तीविषयक समितीने आता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत त्यांना मुदतवाढ दिली आहे. ते आता 65व्या वर्षी सेवानिवृत्त होतील.
 4. बिहारमधील 1978च्या केडरचे आयएएस अधिकारी असलेले शर्मा ट्रायचे अध्यक्ष बनण्याआधी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव होते. ते युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे (यूआयडीएआय) पहिले महासंचालक होते. या प्राधिकरणाचे प्रमुख नंदन नीलकेणी आयआयटीमध्ये रामसेवक शर्मा यांचे सहाध्यायी होते.
 5. तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान असलेल्या निवडक आयएएस अधिकार्‍यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
 6. 2014च्या लोकसभा निवडणुकीत आधार योजनेवर 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने जोरदार टीका केली होती.
 7. परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर आधारसंदर्भात रामसेवक शर्मा यांनी त्यांच्यासमोर जे सादरीकरण केले त्यामुळे मोदींचा आधारला असलेला विरोध मावळला. त्यानंतर आधारची प्रणाली अधिक मजबूत करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला.


world biofuel day 10 august

 1. पारंपारिक इंधनाला पर्याय म्हणून अजैविक इंधनाचे महत्व आणि जैवइंधन क्षेत्रात सरकारचे विविध प्रयत्न याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 10 ऑगस्ट हा दिवस जागतिक जैवइंधन दिवस म्हणून साजरा केला जातो.

 2. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय गेल्या तीन वर्षांपासून हा दिवस साजरा करत आहे.

 3. यानिमित्त उद्या नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात कार्यक्रम होणार असून उद्‌घाटन सत्राला पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 4. कार्यक्रमात शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, शास्त्रज्ञ, जैवइंधन क्षेत्रातील उद्योजक, विज्ञान-अभियांत्रिकी व कृषी क्षेत्रातील विद्यार्थी, खासदार, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 5. इथेनॉल, बायो-डिझेल, बायो-सीएनजी अशा विविध विषयांवर कार्यक्रमात चर्चासत्रं होणार आहेत.


harivansh narayan singh upperhouse vicechief

 1. 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी राज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने आपल्या उमेदवाराच्या विजयासह पुन्हा एकदा विरोधकांच्या एकजुटीला सुरुंग लावला.
 2. यूपीएचे उमेदवार बीके हरिप्रसाद यांना पराभूत करत एनडीएचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह 25 मतांनी विजयी झाले आहेत. 
 3. हरिवंश सिंह यांना 125 मतं मिळाली तर बीके हरिप्रसाद यांना 105 मतं मिळवता आली. 245 सदस्यांच्या राज्यसभेत सध्या 244 खासदार आहेत, तर एक जागा रिक्त आहे. पण 230 खासदारांनीच मतदानात सहभाग घेतला.
 4. एनडीएच्या या विजयात सर्वात मोठं योगदान बीजू जनता दलाचं आहे. अनेत मतभेदानंतरही बीजेडी खासदारांनी एनडीए उमेदवाराला मतदान केलं.
 5. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी हरिवंश सिंह यांच्या विजयाची घोषणा केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांच्या जागेवर जाऊन त्यांचं अभिनंदन केलं.
 6. तर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही हरिवंश सिंह यांना शुभेच्छा देत मिळून जनतेच्या मुद्द्यांवर एकत्र काम करण्याचं आवाहन केलं.

दोन वेळा मतदान

 1. राज्यसभेत उपसभापती निवडणुकीसाठी दोन वेळा मतदान झालं. पहिल्या वेळी हरिवंश सिंह यांना 115 तर दुसऱ्या वेळी त्यांना 125 मतं मिळाली. पहिल्यांदा काही मतं योग्य पद्धतीने न झाल्याने पुन्हा मतदान घेण्यात आलं.
 2. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आवाहनानंतर ओदिशाच्या बीजेडी, तामिळनाडूच्या एआयएडीएमके आणि तेलंगणाच्या टीआरएने एनडीएचे उमेदवार हरिवंश सिंह यांना साथ दिली. त्यामुळे विरोधकांच्या उमेदवारांना मोठा धक्का बसला.


कोण आहेत हरिवंश सिंह?

हरिवंश नारायण सिंह यांचा जन्म 30 जून 1956 रोजी बलिया जिल्ह्यातील सिताबदियारा गावात झाला होता. हरिवंश जेपी आंदोलनामुळे प्रेरित झाले होते. त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात एमए आणि पत्रकारितेत डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात टाइम्स समूहातून केली होती

बँक ऑफ इंडियातही नोकरी

यानंतर हरिवंश सिंह यांच्याकडे धर्मयुग या साप्ताहिकाची जबाबदारी सोपवण्यात आली.

1981 पर्यंत हरिवंश सिंह धर्मयुगचे उपसंपादक होते. यानंतर त्यांनी पत्रकारिता सोडली आणि 1981 पासून 1984 पर्यंत हैदराबाद, पाटणामध्ये बँक ऑफ इंडियात नोकरी केली.

1984 मध्ये ते पुन्हा एकदा पत्रकारितेत परतले आणि 1989 पर्यंत त्यांनी 'आनंद बाजार पत्रिका'च्या 'रविवार' या साप्ताहिकाचे सहाय्यक संपादक म्हणून काम केलं.

 


bharat bhutan army combine cycling and tracking mission

 1. भारत आणि भुटान यांच्या राजनैतिक संबंधाना 50 वर्षे पूर्ण झालीत.
 2. हा क्षण साजरा करण्यासाठी भारतीय लष्कर आणि रॉयल भुटान लष्कर यांची एक संयुक्त सायकलिंग-नि-ट्रेकिंग मोहीम आयोजित करण्यात आली.
 3. ही मोहीम 31 जुलै 2018 रोजी भुटानमध्ये हा झोंग येथे सुरू झाली आणि 7 ऑगस्ट 2018 रोजी थिंपू येथे याचा समारोप झाला.
 4. दोन्ही देशांच्या प्रत्येकी 17 कर्मचार्‍यांनी यात सहभाग घेतला आणि तेथील डोंगराळ प्रदेशात एकूण 384 किलोमीटरचे अंतर कापले.
 5. भुटान हा हिमालयाच्या पूर्व भागात असलेला बौद्ध साम्राज्य असलेला देशा आहे.
 6. थिंपू हे या देशाचे राजधानी शहर आहे. भारतीय रुपया, भुटानी नगुल्ट्रम ही चलने देशात वापरली जातात. झोंगखा ही देशाची अधिकृत भाषा आहे


Top