जी-20 मध्ये दहशतवाद विरोधात कृती योजनेचा स्वीकार

 1. हॅमबर्ग (जर्मनी) येथे 7-8 जुलै 2017 रोजी जी-20 देशांची शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती.
 2. या परिषदेचा मुख्य मुद्दा दहशतवाद हा होता.
 3. याप्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिफारस केलेल्या 10 बिंदूंना गृहीत धरून तयार करण्यात आलेल्या दहशतवाद विरोधात कृती योजनेला सर्व देशांकडून स्वीकारण्यात आले आहे.

शिफारशी खालीलप्रमाणे:-

 1. दहशतवादास समर्थन देणार्या राष्ट्रांविरुद्ध कठोर कारवाई होणे अनिवार्य केले जावे. जी-20 मध्ये अश्या राष्ट्रांवर बंदी घालणे आवश्यक आहे.
 2. जी-20 देशांनी संशयित दहशतवाद्यांची आणि त्यांच्या समर्थकांची यादीची देवाणघेवाण करणे आवश्यक आहे.
 3. गुन्हेगारांचे दुसर्या देशांकडे हस्तांतरण अश्या कायदेशीर प्रक्रियेला सुलभ आणि जलद करणे आवश्यक आहे.
 4. आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील व्यापक कराराला लवकरच स्वीकारले पाहिजे.
 5. UNSC ठराव आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रक्रिया प्रभावीपणे अंमलात आणले जावे.
 6. जी-20 देशांनी डी-रॅडिकलायझेशन कार्यक्रमावर भर देणे आणि सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान करणे आवश्यक आहे.
 7. फायनॅनष्यल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) आणि इतर माध्यमांद्वारे दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा कमी केला पाहिजे.
 8. वेपन अँड एक्सप्लोजीव अॅक्शन टास्क फोर्स (WEATF) हे FATF च्या तत्वावर तयार करावेत जेणेकरून दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचा होणारा पुरवठा रोखला जाईल.
 9. जी-20 देशांनी दहशतवादी कारवायांवर लक्ष केंद्रित करून सायबर सुरक्षेमध्ये सहकार्य करावे.
 10. दहशतवादविरोधी यंत्रणेवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ स्थापन करावे.

जी-20 :-

 1. जी-20 हा जगातल्या 20 प्रमुख अर्थव्यवस्थांच्या 20 वित्त मंत्र्यांचा आणि केंद्रीय बँकांचे गवर्नर यांचा समूह आहे.
 2. या समूहात 19 देश आणि यूरोपीय संघाचा समावेश आहे.
 3. या समूहाचे प्रतिनिधित्व यूरोपीय परिषदेचे अध्यक्ष आणि यूरोपीय केंद्रीय बँकेद्वारा केले जाते.
 4. या समूहाची स्थापना 1999 साली झाली.


UNESCO कडून ‘अहमदाबाद’ शहराला वारसा शहर म्हणून घोषित

 1. संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) च्या जागतिक वारसा समितीने ‘अहमदाबाद’ शहराला वारसा शहर म्हणून घोषित केले आहे.
 2. या सोबतच अहमदाबाद भारतातले पहिले जागतिक वारसा शहर बनले आहे.
 3. गुजरातचे हे शहर हिंदू, इस्लामीक व जैन परंपरांना दर्शवणारे भिंतबंद शहर आहे.
 4. शिवाय नेपाळमधील भक्तपुर आणि श्रीलंकेतील गल्ले या शहरांचाही समावेश करण्यात आला आहे.
 5. UNESCO च्या जागतिक वारसा शहरांमध्ये एकूण 287 शहरांचा समावेश आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इस्त्राईल दौरा 

 1. भारत आणि इस्त्रायल दरम्यान ७ करार
 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक इस्त्रायल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि इस्त्रायल यांनी विविध क्षेत्रांतील ७ करारांवर स्वाक्षरी केली.
 3. पंतप्रधान मोदी आणि इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अवकाश, जलव्यवस्थापन, कृषी या क्षेत्रांसह सुमारे १७ हजार कोटींच्या ७ करारांवर स्वाक्षरी केली.
 4. भारत-इस्रायल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कृषीच्या ३ वर्षांच्या कार्यक्रमाची घोषणा ही यावेळी करण्यात आली.
 5. यासोबतच पिण्याचे पाणी आणि स्वच्छता क्षेत्रातही भारत आणि इस्रायलमध्ये सहकार्य करार करण्यात आला आहे.
 6. तसेच इस्रो आणि इस्रायलमध्ये आण्विक घड्याळ विकसित करण्यासाठी सहयोगाची योजना आखण्यात आली आहे.
 7. औद्योगिक संशोधन, विकास आणि नवप्रवर्तनासाठी ४० दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा करण्याचा निर्णयही भारत आणि इस्त्रायल यांनी घेतला. त्यासाठी दोन्ही देश प्रत्येकी २० दशलक्ष डॉलर निधीचे योगदान देतील.
 8. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींच्या ‘नमामि गंगे’ योजनेंतर्गत गंगा नदीच्या स्वच्छतेसाठीही भारत आणि इस्रायलमध्ये एक करार झाला आहे.
 9. जलसंधारण, लहान उपग्रह या क्षेत्रांतही प्रगती करण्यासंदर्भात इस्रायल आणि भारतामध्ये करार झाले आहेत.
 10. इस्रायलने सध्या भारतातील शेती, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये संबंध वाढीस लागावेत यासाठी ५ अब्ज डॉलर्सचा विशेष निधी उभारला आहे.
 11. इस्रायलच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलचे राष्ट्रपती रुवेन रिलविन यांचीदेखील भेट घेतली.

मोदींनी केले भारतीय समुदायाला संबोधित:-

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ३ दिवसीय इस्रायल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तेल अवीव येथे भारतीय समुदायाला संबोधित केले.
 2. यावेळी त्यांच्यासोबत इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू तसेच हजारोंच्या संख्यने भारतीय नागरिक उपस्थित होते.
 3. मोदींनी आपल्या भाषणात दिल्ली-मुंबई-तेल अवीव दरम्यान थेट विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली.
 4. इस्रायलमध्ये लष्करी सेवा बजावलेल्या भारतीय नागरिकांना ओसीआय कार्ड (भारतीय नागरिकत्व) देण्याचे आश्वासनही दिले.
 5. तसेच मूळ भारतीय असलेल्या इस्रायली किंवा ज्यू नागरिकांसाठी ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) आणि पर्सन ऑफ इंडियन ओरिजन (पीआयओ) कार्ड देण्यासंबंधीची प्रक्रिया सुलभ बनविली जाणार आहे.
 6. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमध्ये एक भारतीय सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याचीही घोषणा केली.

मोदी आणि मोशे यांची भेट:-

 1. २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पालकांचे छत्र हरपलेल्या मोशे होल्ट्झबर्ग (११) या मुलाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.
 2. मोदींची भेट हा मोशे आणि त्याच्या आजी-आजोबांसाठी भावनिक क्षण ठरला. मोशे आणि त्याच्या कुटुंबाला मोदी यांनी या वेळी भारतभेटीचे निमंत्रण दिले.
 3. लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या २६/११च्या हल्ल्यात मुंबईतील नरीमन हाऊस येथे मोशेचे पालक आणि इतर सहा जणांचा मृत्यू झाला होता.


Top

Whoops, looks like something went wrong.