Launch of National Nutrition Mission in Jhunjhunu

 1. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्चला राजस्थानच्या झुनझुनु शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय पोषण मिशन’चे उद्‌घाटन करण्यात आले.
 2. सोबतच राष्ट्रीय पातळीवर ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमाचा विस्तार करण्यात आला.
 3. ‘राष्ट्रीय पोषण मिशन’ या अभियानाला देशभरात आंदोलनाचे रूप देण्यामध्ये झुनझुनू जिल्हा अग्रस्थानी आहे.
 4. बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी सन्मान प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.
राष्ट्रीय पोषण मिशन (ANM)
 1. ठळक बाबी:-
 2. सन 2017-18 पासून सुरू राष्ट्रीय पोषण मिशन (ANM) याचा शुभारंभ 9046.17 कोटी रुपयांसह 3 वर्षांच्या वित्तीय अंदाजाने करण्यात आला आहे. राष्ट्रीय पोषण मिशन देशात पोषणासंबंधी पातळीला युद्धस्तरावर चालविण्याचा एक समग्र प्रस्ताव आहे.
 3. यामध्ये कुपोषणाला दूर करण्यामध्ये योगदान देणार्‍या विविध योजनांना समाविष्ट केले जाणार, ज्यामध्ये ICT आधारित वास्तविक वेळेत देखरेख व्यवस्था, लक्ष्य साध्य करण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशांना प्रोत्साहन देणे, माहिती तंत्रज्ञान आधारित संसाधनांचा वापर करण्यासाठी अंगनवाडी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे, अंगनवाडी कार्यकर्त्यांद्वारे वापरलेल्या जाणार्‍या नोंदणीवहीला बाद करणे, अंगनवाडी केंद्रांवर लहान मुलांची ऊंची मापण्यास सुरुवात करणे, सामाजिक परीक्षण आणि पोषण संसाधन केंद्रांची स्थापना आदींचा समावेश आहे.
 4. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पोषणात जनआंदोलनाद्वारे मोठ्या प्रमाणात लोकांना जोडले जाणार आहे.
 5. राष्ट्रीय पोषण मिशनचे लक्ष्य लहान मुलांमधील बटूवस्था, कुपोषण, रक्ताची कमतरता आणि जन्माच्या वेळी बाळाचे कमी वजन यांना अनुक्रमे 2%, 2%, 3% आणि 2% पर्यंत कमी करणे आहे.
 6. सध्या लहान मुलांमधील बटूवस्थेला वर्षाला कमीतकमी 2% कमी करण्याचे लक्ष्य आहे, मात्र अभियानांतर्गत 2022 सालापर्यंत याचे प्रमाण 38.4% वरुन घटवत 25% पर्यंत आणणे.
 7. या कार्यक्रमामधून 10 कोटींहून अधिक लोकांना लाभ होणार. या कार्यक्रमात सर्व राज्य आणि जिल्ह्यांना टप्प्याटप्प्याने म्हणजेच सन 2017-18 मध्ये 315 जिल्हे, सन 2018-19 मध्ये 235 जिल्हे आणि सन 2019-20 मध्ये उर्वरित जिल्ह्यांना सामील केले जाणार आहे.


 Suspension of Myanmar proposal to create free communication system with India

 1. सीमेलगत 16 किलोमीटरच्या आत लोकांना मुक्त संचार करता यावा यासाठी एक मुक्त संचार व्यवस्था कायम करण्यासाठी भारतासह केला जाणारा करार म्यानमारने अनिश्चित कालावधीसाठी रोखला आहे.
 2. "स्थानिक बाध्यता" दर्शवत म्यानमारने हा निर्णय घेतलेला आहे आणि हा करार करण्यापूर्वी काही काळ मागितला आहे.
 3. 3 जानेवारी 2018 रोजी भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताचे म्यानमारसोबत आर्थिक संबंध वाढविण्यासाठी या करारास मंजूरी दिली होती.
 4. म्यानमारने गेल्या सात महिन्यांमध्ये हा सामंजस्य करार दोनदा (सप्टेंबर 2017, जानेवारी 2018) स्थगित केलेला आहे.
 5. भारत आणि म्यानमार एकूण 1,643 किलोमीटरची कुंपण विरहित सीमा सामायिक करतात, त्यापैकी अरुणाचल प्रदेश 520 किलोमीटर, नागालँड 215 किलोमीटर, मणिपुर 398 किलोमीटर आणि मिझोराम 510 किलोमीटरची सीमा लागलेली आहे.
 6. कराराला आकार देण्याच्या हेतूने केंद्र शासनाने म्यानमारलगत असलेल्या अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या राज्यांना आपली सीमा लोकांसाठी सामायिक करण्यास सांगितले होते.
प्रस्तावामधील ठळक बाबी
 1. सीमा ओलांडणार्‍या लोकांच्या चळवळीवर कोणतेही निर्बंध नसतील.
 2. त्या भागात निवासी सर्व नागरिकांना एक बॉर्डर पास दिले जाणार आणि शेतकी, कामासाठी किंवा नातेवाईकांना भेटायला जाणार्‍यांना नेहमी हा पास जवळ बाळगावा लागणार.
 3. लोकांच्या चळवळीसाठी सुरक्षेच्या दृष्टीने एक कायदेशीर व्यवस्था तयार करण्यात येणार आहे.
 4. सीमेलगत 16 किलोमीटरच्या आत लोकांना मुक्त संचार करता येणार.

 


Sri Lanka announces 10-day emergency

 1. श्रीलंकेतील कँडी भागात मुस्लीम आणि बौद्ध धर्मीयांमध्ये झालेल्या वादामुळे उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
 2. दोन धर्मीयांमधील वाद भडकू नये त्यावर नियंत्रण मिळवता यावे, तसेच निरपराध लोकांचा बळी जाऊ नये म्हणून श्रीलंका सरकारने हा निर्णय घेतला आहे.
 3. हिंसा पसरवणाऱ्या लोकांविरोधात कारवाई करणे हाच आणीबाणी लागू करण्याचा मुख्य उद्देश आहे असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.
 4. म्यानमारमध्ये उसळलेल्या संघर्षानंतर काही रोहिंग्या मुस्लिमांनी श्रीलंकेत आश्रय घेतला होता. मात्र याबाबतही काही बौद्ध धर्मीयांनी विरोध दर्शवला होता. तसेच त्यांना आश्रय दिला जाऊ नये म्हणून आंदोलनही केले होते.
 5. फेब्रुवारी २०१७मध्ये श्रीलंकेतील पूर्व भागात असलेल्या अंपारा या ठिकाणी हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारानंतर दोन धर्मीयांमधील संघर्ष सुरु झाला. 
 6. बौद्ध आणि मुस्लीम धर्मीयांमध्ये गेल्या वर्षभरापासून संघर्ष आणि वाद सुरु आहे. बौद्ध धर्मीयांना जाणीवपूर्वक मुस्लीम धर्मांतर करण्यास भाग पाडत आहेत असा आरोप बौद्ध धर्मीयांनी केला आहे.
 7. तसेच बौद्ध धर्माचा वारसा असलेली धार्मिक स्थळे उद्धवस्त केली जात असल्याचाही आरोपही होत आहे.
 8. हा सगळा वाद चिघळल्यामुळे आणि शिगेला पोहचल्यामुळे श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
 9. श्रीलंकेत सिंहली बौद्ध समाजाचा एक मोठा जनसमुदाय आहे. हा समुदाय अल्पसंख्याक मुस्लीम आपल्यासाठी धोकादायक असल्याचे मानतात.
 10. २०१४मध्येही श्रीलंकेत मोठ्या दंगली उसळल्या होत्या. या दंगलीत २ हजार पेक्षा जास्त बौद्ध धर्मीयांना तर ८ हजारापेक्षा जास्त मुस्लीम नागरिकांना विस्थापित व्हावे लागले.
 11. श्रीलंकेत एकूण लोकसंख्येच्या १० टक्के मुस्लिम आहेत, ७५ टक्के बौद्ध आणि १३ टक्के हिंदू आहेत. 


 Indian Army in fourth place in world

 1. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सने २०१७मध्ये जगातील विविध देशांच्या सैन्य क्षमतेचे सर्वेक्षण करुन या देशांची क्षमतेनुसार क्रमवारी एका अहवालात प्रसिध्द केली आहे.
 2. या १३३ देशांच्या यादीमध्ये सैन्य दलांमध्ये भारतीय लष्कर चौथ्या स्थानावर आहे. यामध्येपहिल्या क्रमांकावर महासत्ता असलेला अमेरिका आहे, तर रशिया दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
 3. पाकिस्तान या ग्लोबल फायर पावरच्या यादीत १३व्या स्थानावर आहे. मागच्याच वर्षी पाकिस्तानने या यादीत पहिल्या १५मध्ये प्रवेश केला होता.
 4. पाकिस्तानशी तुलना करता भारत जवळपास सर्वच आघाडयांवर सरस असल्याचे या सर्वेक्षणातून समोर येत आहे.
 5. फ्रान्स, यूके, जापान, टर्की आणि जर्मनी हे देश सुद्धा पहिल्या दहामध्ये स्थान टिकवून आहेत.
 6. चीनने रशियाला मागे टाकून दुसरे स्थान मिळवले आहे. चीनकडे आजच्या घडीला रशियापेक्षा जास्त फायटर विमाने आणि जहाजे आहेत.
 7. भौगोलिक स्थिती, लष्कराकडे असणारे स्त्रोत, सैनिकांचे प्रशिक्षण, तंत्रज्ञान, सैनिकांची संख्या अशा एकूण ५० निकषांचा आढावा घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.


Javed Abadi dies of crippled people

 1. अपंगांच्या हक्कांसाठी लढणारे आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते जावेद अबिदी यांचे वयाच्या ५३व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रोजी निधन झाले.
 2. अपंगांच्या हक्कांसाठी झगडणारा भारताचा वैश्विक चेहरा म्हणूनही जावेद अबिदी यांची ओळख होती.
 3. उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये जन्मलेल्या जावेद अबिदी यांना स्पिनिया बिफिडा झाल्याचे निदान झाले होते. त्यामुळे वयाच्या १५ वर्षापासूनच त्यांना व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला.
 4. अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘डिसअॅबिलिटी राइट ग्रुप’ (डिआरजी)ची स्थापना केली होती.
 5. ‘राइट्स फॉर पर्सन विथ डिसअॅबिलिटी बिल २०१४’ हे विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर अपंगांचा कँडल मार्च काढला होता.
 6. ताजमहालपासून अनेक पर्यटनस्थळांच्या ठिकाणी विख्यात वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांना व्हीलचेअरवरून भेटी देता याव्यात, यासाठी तेथे रॅम्प बांधण्याचा आग्रह अबिदींनीच धरला होता.
 7. १९९३मध्ये सोनिया गांधी यांच्या आग्रहास्तव त्यांनी राजीव गांधी फाऊंडेशनच्या अपंग विकास विभागाची जबाबदारी स्वीकारली.
 8. ‘इंटरनॅशनल डिसॅबिलिटी अलायन्स’च्या उपाध्यक्षपदी २०१३ मध्ये अबिदी यांची निवड झाली.
 9. जनगणनेत अपंगांना स्वतंत्र प्रवर्ग, अपंग कामकाज मंत्रालय या महत्त्वाच्या निर्णयांना त्यांची अपंगांच्या हक्कांसाठी चळवळ कारणीभूत होती.
 10. अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. म्हणूनच त्यांना अपंगांचे तारणहार म्हणून ओळखले जायचे.


India won two gold medals in the World Cup

 1. मेक्सिकोत सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या शहझार रिझवी आणि मनू भाकेरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अनुक्रमे पुरुष व महिला गटात प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. 
 2. शहझार रिझवीने रिझवीने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ख्रिस्तियन रिट्झवर मात करताना २४२.३ गुणांचा विश्वविक्रम नोंदवला.
 3. तर मनूने विश्वचषक अंतिम फेरीची विजेती अ‍ॅलेझांड्रा जेव्हेला हिला पराभूत करताना २३७.५ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले.
 4. अकरावीमध्ये शिकणाऱ्या मनूने २०१८मध्ये ब्यूनस आयर्स येथे होणाऱ्या युवा ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला आहे.
 5. मनूने जपानमध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य जिंकले होते. गतवर्षी मनूने दोन राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली.
 6. रवी कुमारने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक मिळवताना २२६.४ गुणांची नोंद केली.
 7. महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये मेहुली घोषने २२८.४ गुण नोंदवत कांस्यपदकमिळवले.
 8. जितू रायने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात २१९ गुणांसह कांस्य जिंकले.


The Importance of Today's Day in History 10 march

 1. महत्वाच्या घटना:-
  1. १८७६: अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांचा सहकारी थॉमस वॅटसन यांच्याशी दुरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला.
  2. १९५२: केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅंटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला.
  3. १९७२: वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.
  4. १९८५: भारतीय क्रिकेट संघाने रवि शास्त्री यांना चॅम्पियन ऑफ  चॅम्पियन्स हा किताब मिळाला.
 2. जन्म:-
जन्म
 1. १९१८: गायक आणि अभिनेता सौदागर नागनाथ गोरे उर्फ छोटा गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर१९९७)
 2. १९२९: कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म.
 3. १९५७: अल कायदा या आतंकी संस्थेचे संस्थापक ओसामा बिन लादेन यांचा जन्म. (मृत्यू: २ मे २०११)

मृत्यू:-

मृत्यू
 1. १८७२: इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचे निधन. (जन्म: २२ जून १८०५)
 2. १८९७: पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१)
 3. १९५९: पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद जयकर यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८७३)
 4. १९७१: कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८९४)
 5. १९९९: प्रसिद्ध कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १९१२)


Top