Soumya Swaminathan: Chief Scientist of the new Department of World Health Organization

 1. जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) त्याच्या नव्या विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून सौम्या स्वामीनाथन यांची नेमणूक केली आहे.
 2. संघटनेनी ‘डिजिटल आरोग्य विभाग’ (Department of Digital Health) नावाचा नवा विभाग तयार केला आहे आणि त्यासाठी मुख्य शास्त्रज्ञ हे पद तयार केले आहे.
 3. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगाने बदलत चाललेल्या आरोग्य सेवांच्या योग्य व्यवस्थापनासाठी हा विभाग जबाबदार असणार आहे.
 4. हा विभाग डिजिटल तंत्रज्ञानाचे मूल्यांकन करण्यामध्ये आपली भूमिका वाढवेल आणि देशांना समर्थन कसे द्यावे आणि त्यांचे नियमन कसे करावे याबद्दल निर्णय घेण्यास मदत करणार आहे.
 5. सौम्या स्वामीनाथन जागतिक आरोग्य संघटनेच्या तीन उप-महासंचालकांपैकी एक होत्या, ज्या WHO महासंचालक टेड्रोस अॅदोनोम गेब्रेयेसुस यांना मदत करत होत्या.
 6. जागतिक आरोग्य संघटना (WHO):-
  1. ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे.
  2. दिनांक 7 एप्रिल 1948 रोजी स्थापन करण्यात आलेल्या WHOचे जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय आहे.
  3. हा संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाचा एक सदस्य आहे.
  4. ही आरोग्य संघटना पूर्वी ‘एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स’ म्हणून ओळखली जात होती.


IBBI boards have signed an agreement with the International Finance Corporation

 1. भारतात नादारी व दिवाळखोरी संदर्भात असलेल्या नियमांची प्रभावीपणे अंमलबाजवणी करण्याच्या उद्देशाने, भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळाने (IBBI) आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (IFC) या संस्थेसोबत एक करार केला आहे.
 2. नियमांची प्रभावीपणे अंमलबाजवणी व्हावी यासाठी त्यायोग्य व्यवसायिक आणि व्यवसायिक संस्थांची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (IFC) IBBIला दिनांक 30 जून 2021 पर्यंत तांत्रिक सहाय्य पुरविणार आहे.
 3. शिवाय त्यातून राष्ट्रीय दिवाळखोरी कार्यक्रम आखला जाणार आहे.
 4. भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ (IBBI) भारतात दिवाळखोरीसंबंधी कारवाई आणि भारतातील इन्सोल्वंसी प्रॉफेश्नल एजन्सी (IPA), इन्सोल्वंसी प्रॉफेश्नल्स (IP) आणि इन्फॉर्मेशन यूटिलिटिज (IU) सारख्या संस्थांना नियमित करतात.
 5. हे दिनांक 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाले आणि याला नादारी आणि दिवाळखोरी नियमावलीद्वारे वैधानिक अधिकार दिले गेले आहेत.
 6. यामध्ये वित्त व कायदा मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या प्रतिनिधीसह 10 सभासद असतात.
 7. सन 1956 साली स्थापना करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (International Finance Corporation -IFC) जागतिक बँक समुहाचा सदस्य आहे.
 8. ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे जी विकसनशील देशांमध्ये खासगी क्षेत्रातल्या विकासास प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूक, सल्ला आणि मालमत्ता व्यवस्थापन सेवा प्रदान करते.
 9. त्याचे मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी. (अमेरिका) येथे आहे.


marayoor jaggery get GI tag

 1. मरायूर गूळाला भौगोलिक खूण (GI) टॅग प्राप्त झाले आहे.
 2. उच्च गुणवत्तेसाठी ओळखला जाणारा मरायूर गूळ आता कोणत्याही फसवणुकीशिवाय योग्य किंमतीत विकला जाऊ शकणार.
 3. केरळ राज्यात मरायूर आणि कंथाल्लूर ग्राम पंचायतींमध्ये कुठल्याही रसायनांचा वापर न करता गूळ तयार केला जातो.
 4. भौगोलिक खूण (GI):-
  1. भौगोलिक खूण (Geographical Indication) हे उत्पादनांवर छापले जाणारे चिन्ह आहे.
  2. या चिन्हामुळे उत्पादनाला विशेष भौगोलिक ओळख मिळते आणि ती त्याची मूळ गुणवत्ता दर्शवते.
  3. उदा. दार्जीलिंगची चायपत्ती, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी.
 5. CIPAM:-
  1. बौद्धिक संपदा अधिकार जाहिरात व व्यवस्थापन विभाग (Cell for IPR Promotion and Management -CIPAM) हे भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य व औद्योगिक मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण व जाहिरात विभागाच्या (DIPP) अंतर्गत कार्य करते.
  2. या संस्थेकडून भारतीय उत्पादनांना GI टॅग दिला जातो.


Inauguration of India's third IT route in China

 1. माहिती तंत्रज्ञानासंबंधी भारतीय आणि चीनी कंपन्यांमधील भागीदारीमध्ये सुलभता यावी या उद्देशाने भारताने चीनमध्ये झुझौ शहरात विकसित केलेल्या आपल्या तिसर्‍या मार्गिकेचे (कॉरीडॉर) उद्घाटन केले.
 2. या परिसराचा विकास करण्यासाठी भारताच्या सॉफ्टवेयर व सेवा कंपन्यांचा राष्ट्रीय संघ (NASSCOM) या संस्थेनी चीनच्या जियांग्सू प्रांतातल्या झुझौ शहरासोबत भागीदारी करार झाला होता.
 3. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आणि अॅनालिटिक्स अश्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्पादने तयार करण्यासाठी सहकार्य काम करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
 4. यापूर्वी चीनच्या डालियन आणि गुइयांग या दोन शहरांमध्ये अशा प्रकारच्या मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत.
 5. चीनी बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराच्या माध्यमातून, आतापर्यंत 300 हून अधिक चीनी कंपन्यांसोबत सूक्ष्म व लघु उद्योग क्षेत्रातल्या 10 भारतीय कंपन्यांनी सुमारे USD 4.5 दशलक्ष किंमतीचे करार केले आहेत.
 6. चीन हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले पूर्व आशियातले एक राष्ट्र आहे.
 7. या देशाची राजधानी बिजींग शहर असून चीनी रेन्मिन्बी (ऊर्फ चीनी युआन) हे राष्ट्रीय चलन आहे.


50th rise day of CISF: 10 March 2019

 1. दिनांक 10 मार्च 2019 रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (CISF) 50वा उदय दिन (Raising Day) साजरा करण्यात आला.
 2. त्यानिमित्ताने गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 3. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) हा भारतातला केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे.
 4. दिनांक 10 मार्च 1969 रोजी भारतीय संसदेच्या अधिनियमान्वये याची स्थापना करण्यात आली.
 5. हे दल अतिमहत्त्वाच्या सरकारी इमारती, दिल्ली मेट्रो, आणि विमानतळांना सुरक्षा पुरविते.


Top