1. सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते, देशातल्या 11 विविध श्रेणीतील 22 जणांना वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यात सातारा जिल्ह्यातील मंगला बनसोडे,  नागपूर जिल्ह्यातील डॉ. महादेवराव मेश्राम आणि कोल्हापूरच्या मनोरमा कुलकर्णींचा समावेश आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र आहे.
  2. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात  लोकनाट्य व लावणीला समर्पित कुटुंबात जन्मलेल्या मंगला बनसोडे यांच्या कुटुंबाची पाचवी पिढी या क्षेत्रात आहे. 
  3. श्रीमती बनसोडे  लावणी व तमाशा या लोककला माध्यमातून सातव्या वर्षापासून लोकजागृती व सामाजिक संदेश पोहोचवण्याचे काम केले आहे. 
  4. नागपूरच्या उमरेड तालुक्यातील डॉ. महादेवराव मेश्राम यांना  आरोग्य सेवेत अतुलनीय योगदान दिल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  5. श्रीमती मनोरमा कुलकर्णी सध्या 71 वर्षांच्या असून  क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य व विशेष कामगिरीसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.


  1. उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीत दोन दिवसीय ‘निरोगीपणासाठी आंतरराष्ट्रीय योग परिषद’ चे उद्घाटन झाले.
  2. AYUSH राज्यमंत्री (स्व. प्र.) श्रीपद यसो नाइक यांच्या अध्यक्षतेखाली   युर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (AYUSH) मंत्रालयाने या परिषदेचे आयोजन केले आहे. 44 देशांमधील प्रतिनिधींनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
  3. ही परिषद AYUSH, अॅलोपॅथी चिकित्सक, संशोधक, शिक्षणतज्ञ, धोरण निर्माता आणि विद्यार्थी यांच्यासाठी तसेच निरोगी जीवनासाठी योगाच्या विविध पैलूंना समजून घेण्यास एक मंच म्हणून काम करते. यापूर्वी सन 2015 आणि सन 2016 मध्ये ही परिषद भरवली गेली होती. 


Top