Laxmikant Deshmukh elected as president of Literary Meet

 1. 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. गुजरातमधील बडोद्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष भूषवतील. लक्ष्मीकांत देशमुख हे विदर्भातील लेखक असून त्यांची आतापर्यंत 13 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
 2. 10 डिसेंबर रोजी नागपुरात आज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मतमोजणी झाली. या मतमोजणीत लक्ष्मीकांत देशमुख यांना 427 मतं मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले रविंद्र शोभणे यांना 357 मतं मिळाली.
 3. दरम्यान या पंचरंगी लढतीत या दोघांशिवाय राजन खान, किशोर सानप आणि रविंद्र गुर्जर देखील रिंगणात होते. यंदा ब़डोद्यात मराठी साहित्य संमेलन होत आहे.
 4. या निवडणुकीसाठी 1070 मतदार होते, ज्यापैकी 896 लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यातील 14 मतं ही अवैध ठरली.

लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्यसंपदा

 1. अंधेरनगरी - कथा
 2. इन्कलाब विरुद्ध जिहाद - कादंबरी
 3. नंबर 1 - कथासंग्रह
 4. ऑक्टोपस - कथासंग्रह
 5. पाणी! पाणी! -
 6. प्रशासननामा - कायदेविषयक, सामाजिक लेखन
 7. अग्नीपथ - कथासंग्रह
 8. अविस्मरणीय कोल्हापूर - माहितीपर लेखन
 9. बखर – भारतीय प्रशासनाशी – राजकीय, सामाजिक लेखन
 10. दूरदर्शन हाजीर हो - नाटक
 11. मधुबाला ते गांधी - व्यक्तीचित्रण
 12. सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी


Congress vice president Rahul Gandhi

 1. १३२ वर्षांची परंपरा असलेला देशातील सर्वात जूना पक्ष काँग्रेसला ११ डिसेंबर रोजी ४७ वर्षीय राहुल गांधी यांच्या रूपाने नवे नेतृत्व मिळाले.
 2. काँग्रेस अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राहुल यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी पत्रकार परिषदेत केली.
 3. राहुल यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव ठेवणारे ८९ अर्ज आले होते. छाननीत हे सर्व अर्ज वैध ठरले असून अध्यक्षपदासाठी राहुल हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले जात आहे, असे रामचंद्रन यांनी नमूद केले.
 4. विद्यमान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी १६ डिसेंबर रोजी सकाळी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर त्याचदिवशी सकाळी ११ वाजता सोनिया तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची अधिकृतपणे सूत्रे स्वीकारतील अशीही माहिती देण्यात आली.


Pvt. M. S. Swaminathan received the Yerarringer Award

 1. भारत सरकारकडून प्राध्यापक एम. एस. स्वामिनाथन यांना 'येरारिंगन' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 2. भारतीय कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविणारे व्यक्तित्व म्हणून प्राध्यापक एम. एस. स्वामिनाथन यांना ओळखले जाते.
 3. त्यांच्या नेतृत्वात नवीन कृषी धोरणाचा अवलंब आणि उच्च उत्पन्न देणारे विविध बियाणे व रासायनिक खतांचा वापर केल्याने १९६० साली भारताने कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली होती.
 4. त्यांनी डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्यासोबत गव्हाच्या उच्च उत्पन्न देणार्‍या जाती विकसित करण्याचे काम केले.


The WHO's first global monitoring system is working for dementia

 1. जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) 7 डिसेंबर 2017 पासून प्रथमच स्मृतिभ्रंश आजारासाठी वैश्विक संनियंत्रण यंत्रणा कार्यरत केली आहे.
 2. यासंदर्भात जागतिक स्मृतिभ्रंश वेधशाळा हे ऑनलाइन व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.
 3. स्मृतिभ्रंश आजाराने वर्ष 2050 पर्यंत जगभरात 152 दशलक्ष लोक प्रभावित झाल्याचा अंदाज आहे, जे की वर्तमान आजारी असलेल्यांच्या (50 दशलक्ष) लोकसंख्येच्या तिप्पट असेल.
 4. स्मृतिभ्रंश आजारामध्ये अल्जायमर रोग आणि स्मृति भ्रष्ट होणार्‍या अन्य प्रकारच्या आजारात आणि संज्ञानात्मक अपंगत्व समाविष्ट आहे. प्रत्येक वर्षी जवळपास 10 दशलक्ष लोकांमध्ये स्मृतिभ्रंश आजार विकसित होतो, ज्यामध्ये 6 दशलक्ष लोकसंख्या कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वास्तव्यास राहतात.

जागतिक स्मृतिभ्रंश वेधशाळा:-

 1. WHO कडून ‘जागतिक स्मृतिभ्रंश वेधशाळा (Global Dementia Observatory)’ नावाने एक संकेतस्थळ आधारित वैश्विक व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.
 2. याद्वारा राष्ट्रपातळीवर आणि जागतिक पातळीवर स्मृतिभ्रंश आजाराने ग्रस्त लोक आणि त्यांची निगा राखणार्‍या लोकांसाठी सेवांच्या उपलब्धतेसंबंधी प्रगतीला बघू शकतात.
 3. संनियंत्रण आणि उपचार प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय धोरण आणि योजना, जोखिम कमी करण्याचे उपाय आणि पायाभूत सुविधांची उपस्थितीचे संनियंत्रण देखील करणार.

पार्श्वभूमी:-

 1. स्मृतिभ्रंश आजाराच्या नियंत्रणासाठी वार्षिक जागतिक खर्च अंदाजित रूपात $818 अब्ज एवढे आहे, जे की वैश्विक सकल स्थानिक उत्पादनाच्या फक्त 1% हून अधिकच्या बरोबरीत आहे. वर्ष 2030 पर्यंत हा खर्च दुप्पट म्हणजेच जवळपास $2 लाख कोटीपर्यंत होण्याचे अपेक्षित आहे.
 2. आतापर्यंत WHO ने 21 देशांमधून माहिती संकलित केली आहे.
 3.  2018 च्या शेवटीपर्यंत, कमीतकमी 50 देशांची माहिती देण्याचे प्रयत्न केले जातील.
 4. आतापर्यंत 81% देशांमध्ये स्मृतिभ्रंश आजारासंबंधी जागृती किंवा जोखीम कमी करण्याची मोहीमा राबवलेल्या आहेत.
 5. 71% देशांमध्ये स्मृतिभ्रंश आजारासाठी योजना आहेत, 71% देशांमध्ये निगा राखणार्‍यांना मदत आणि प्रशिक्षण दिले गेलेत आणि 66% देशांमध्ये आजारासंबंधी मैत्रीपूर्ण पुढाकार सुरू केले गेलेत.
 6. WHO च्या या उपक्रमामुळे धोरण निर्मात्यांना, आरोग्य आणि सामाजिक निगा राखणार्‍यांना, नागरी संस्था आणि स्मृतिभ्रंश-ग्रस्त लोकांना तसेच त्यांची निगा राखणार्‍यांना आजाराची समस्या कमी व अवरोधीत करण्यासंबंधी व्यापक कृती करण्यास मार्गदर्शक ठरणार आहे.


Top