MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅफ) सलग 13व्यांदा अग्रस्थान राखले. आतापर्यंतची विक्रमी पदकझेप घेताना भारताच्या खात्यावर 312 पदकांची नोंद होती.

2. तर यात 174 सुवर्ण, 93 रौप्य आणि 45 कांस्यपदकांचा समावेश होता.

3. तसेच 2016मध्ये गुवाहाटी आणि शिलाँग येथे झालेल्या ‘सॅफ’ स्पर्धेतील 309 पदकांचा आकडा या वेळी भारताने ओलांडला. परंतु 15 सुवर्णपदके कमी मिळवली.

4. तर यजमान नेपाळला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर श्रीलंकेला तिसरे स्थान मिळाले.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. वन्यप्राण्यांची डीएनए चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाने बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्वत:ची प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

2. तर अशी प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला ठरला आहे.

3. तसेच यासाठी आवश्यक असलेला 3 कोटी 96 लाख रुपयांचा निधी उद्यान व्यवस्थापनाला उपलब्ध झाला असून ही प्रयोगशाळा उभारण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे उद्यानाचे मुख्य वन संरक्षक अन्वर अहमद यांनी सांगितले.

4. मानव वन्यजीव संघर्षात विशेषत: जेव्हा यात मनुष्य मृत्यूच्या घटना घडतात तेंव्हा घटनेच्यावेळी कारणीभूत प्राण्याला ओळखून त्याला जेरबंद करणे अत्यंत महत्वाचे ठरते. आतापर्यंतअशा वन्य प्राण्याची ओळख पटविण्यासाठी पायांचे ठसे किंवा शरीरावरील ठिपके/पट्टयांचा वापर केला जात होता.

5. तसेच आता प्राण्यांची तंतोतंत ओळख होण्याकरिता प्राण्यांची डीएनए चाचणी करणे आवश्यक ठरत असल्याची बाब लक्षात घेऊन वन विभाग स्वत:ची प्रयोगशाळा उभारणार आहे. सद्यस्थितीत डी.एन.ए चाचणी करण्यासाठीचे नमुने हैदराबाद व भारतीय वन्यजीव संस्थान डेहराडून यांच्याकडे पाठविले जातात. या चाचणीचे परिणाम मिळण्याकरिता अनेक महिने वाट पहावी लागते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. समाजऋणाची जाणीव ठेवून ग्लोबल रुग्णालयाचे संचालक डॉ. अमित मायदेव यांनी ‘एन्डोस्कोपी ऑन व्हील्स’ म्हणजेच फिरत्या पोटविकार केंद्राची निर्मिती केली आहे.

2. तर या फिरत्या केंद्रात अद्ययावत सोयी-सुविधांनी सज्ज ऑपरेशन थिएटर आहे. या गाडीत उपस्थित असणारे दोन तज्ज्ञ डॉक्टर आणि तंत्रज्ञ रुग्णांना वैद्यकीय सुविधा देतील.

3. तसेच एच-पायलोरी, कर्करोगाचे लवकर निदान, आतड्यांचा अल्सर, बायोप्सी, आतड्यांना सूज आली असेल तर त्याचे निदान, अ‍ॅसिडिटीची तपासणी या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येईल.ही सुविधा सुरू करण्यासाठी नरेंद्र कुमार बलदोटा व परिवार यांनी देणगी देऊन पुढाकार घेतला आहे.

4. तर या केंद्रातील संपूर्ण सुविधा विनामूल्य असतील. त्यामुळे पोटविकार होण्याची कारणे व त्यावरील उपाय आणि उपचार याबाबत लोकांमध्ये या केंद्राच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. पारखे परिवार न्यास पुणे, मातोश्री माईसाहेब पारखे मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा मानाचा आदर्श माता पुरस्कार अपंगांची माता सुजाता सुगवेकर यांना एका सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

2. तर आदर्श महाविद्यालयाच्या सभागृहात हा सोहळा पार पडला.

3. तसेच अनाथाची माता होणे सोपे, पण शारीरिक आणि मानसिकदृष्टया विकलांग मुलांचे संगोपन आणि स्वावलंबित्व यावर काम करणे महाकठीण आहे. सुगवेकर यांनी हे महान कार्य केले आहे. 70 मुलांची जबाबदारी यशस्वीपणे उचलली आहे.

4. संगोपिताच्या माध्यमातून हे कार्य सुगवेकर यांनी सुरू ठेवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊ न पारखे न्यासाचे विश्वस्त डॉ. प्रकाश पारखे आणि सरोज पारखे व परिवार यांनी सुगवेकर याना यंदाचा आदर्श माता पुरस्कार प्रदान केला. रोख 25 हजार रुपये आणि सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1.किरकोळ विक्रीच्या क्षेत्रातील व्यवहार सर्वासाठीच ज्यामुळे सोपे झाले, त्या बारकोडचे सहसंशोधक व अमेरिकी अभियंता जॉर्ज लॉरर यांचे उत्तर कॅरोलिनातील वेंडेल येथील निवास्थानी निधन झाले.

2. तर बहुतेक वस्तूंवर जी काळ्या रेघांची पट्टी दिसते त्याला बारकोड असे म्हणतात. तो 12 अंकांचा एक सांकेतांक असतो ज्यावरून ते उत्पादन ओळखता येते. आज जगात विक्रीसाठी असलेल्या बहुतांश वस्तूंवर बारकोड लावलेला असतो.

3. आयबीएम कंपनीत काम करीत असताना जॉजॅ लॉरर यांनी युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड म्हणजे बारकोड विकसित केले होते. हा बारकोड वाचण्यासाठी लागणारा स्कॅनरही त्यांनी विकसित केला.

4. तसेच या बारकोडमध्ये आधी टिंबांचा समावेश होता त्याऐवजी लॉरर यांनी पट्टय़ांचा समावेश केला. बारकोडमुळे उद्योग जगतात मोठी क्रांती घडून आली असे आयबीएमच्या संकेतस्थळावर त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीत म्हटले आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. सी.व्ही. रमण यांना सन 1930 मध्ये नोबेल पारितोषिक जाहीर झाला.

2. भारताचे राष्ट्रपती आणि अर्थतज्ञ प्रणवकुमार मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी झाला.

3. सन 1946 या वर्षी युनिसेफ (UNICEF) ची स्थापना झाली.

4. भारतीय बुद्धिबळपटू विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म 11 डिसेंबर 1969 मध्ये झाला.

5. 2001 या साली चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मध्ये प्रवेश झाला.

6. सन 2006 मध्ये अंतराळवीर सुनिता विल्यम आय.एस.एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली होती.


Top