state nutrition report

 1. भारत सरकारने प्रथमच ‘स्टेट ऑफ न्यूट्रिशन’ (पोषणाची स्थिती) अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे.
 2. या अहवालात हे स्पष्ट झाले आहे की, पोषणविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताला अजून खूप काही करणे बाकी आहे.
 3. ठळक बाबी:-
  1. 26 दशलक्ष मुले कमी वजन-ते-उंची यांचे गुणोत्तर असलेल्या समस्येला तोंड देत आहेत, जी संख्या अन्य कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे.
  2. मुलांमधील लठ्ठपणा या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. चीनमध्ये 15.3 दशलक्ष तर भारतात 14.4 दशलक्ष मुले लठ्ठ आहेत.
  3. एक नवीन समस्या समोर आली आहे, ती म्हणजे अधिक वजन आणि लठ्ठपणा.
  4. सन 1980-2015 या दरम्यान, लठ्ठपणा असलेल्या मुलांची संख्या दुप्पट झाली आणि प्रौढांसाठी तिप्पट झाली.
  5. याला पाहता भविष्यात सन 2025 पर्यंत अतिरिक्त 2.6 दशलक्ष मुले लठ्ठ असतील.
  6. वाढत्या लठ्ठपणामुळे हृदयरोग, मधुमेह आणि काही कर्करोग (असंसर्गजन्य रोगही) यांसारख्या तीव्र स्वरुपाच्या आजारांचा धोका वाढत आहे.
  7. लठ्ठपणातील वजन वाढ हा एक गंभीर विषय आहे, कारण त्या व्यक्तीला आयुष्यभराच्या आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्याचे जास्ती वजन असलेले बालपण देखील असते.
  8. भारतीय मुलांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे त्यांना आणखी जास्त धोका असतो.
  9. संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की लठ्ठ यकृतामुळे लहान मुलांमध्ये आजारांची लक्षणे आठव्या वर्षी देखील आढळू शकतात.


 Universalisation of Health Services in India

 1. संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या शाश्वत विकास ध्येय (SGD) अंतर्गत आरोग्य हा देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने एक अतिमहत्वाचा विषय समजला जातो.
 2. भारतासारख्या गजबजलेल्या पण उदयोन्मुख राष्ट्राकडे बघता हा विषय देशाच्या विकासामध्ये प्रमुख विषय समजला जाऊ शकतो.
 3. शिवाय सामाजिक-आर्थिक विकासाचे इतर निर्देशक जसे दारिद्र्य, पोषण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता हे सुद्धा विचारात घेतले पाहिजे.
 4. यांचा देखील आरोग्यासंबंधी विषयाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येतोच. एकूणच काय तर भारतात आरोग्य सेवा-सुविधांचे विस्तारीकरण हा एक महत्त्वाचा विषय आहे.
 5. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने मे 1977 मध्ये "हेल्थ फॉर ऑल" चे लक्ष्य निर्धारित केले.
 6. हे 2000 सालच्या अखेरपर्यंत साध्य करायचे होते.
 7. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने ‘मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स’ तयार केले होते, जे की 2015 सालापर्यंत साध्य करणे ठरविण्यात आले होते.
 8. त्यानंतर UN च्या सर्व सदस्य देशांनी 2030 सालापर्यंत प्राप्त करण्याकरिता 2016 साली शाश्वत विकास ध्येय (SGD) निश्चित केलेत.
 9. या सर्वांमध्ये "हेल्थ फॉर ऑल" हे विधान कायम ठेवण्यात आले आहे.
 10. "हेल्थ फॉर ऑल":- 
  1. पूर्ण रूपाने शारीरिक, मानसिक, सामाजिक कल्याणकारी स्थिती आणि रोग किंवा दुर्बलतेचा अभाव नसलेली स्थिती.
 11. एकूणच परिस्थिती आणि मार्ग:-
  1. ज्ञात अनिश्चित पर्यावरणीय धोक्याच्या कारणामुळे दरवर्षी जवळजवळ 13 दशलक्ष मृत्यू आणि रोगाच्या जागतिक भारांपैकी सुमारे एक चतुर्थांश रोग उद्भवतात.
  2. भारतात सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आधी दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांना संबोधित करण्यात प्रचंड प्रगती झाली आहे, परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आलेली नाही.
  3. जरी नोंदलेल्या प्रकरणांची संख्या वर्षभरात घटलेली असली तरी अश्या रोगांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांमुळे प्रभावित देशांना रोगांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते.
  4. याव्यतिरिक्त, देशाला सार्वत्रिक आरोग्य स्थिती साध्य करण्याकरिता राष्ट्रीय कार्यचौकट विकसित करणे आवश्यक आहे.
  5. यामध्ये स्थानिक आरोग्य संस्था, खासगी क्षेत्र, अशासकीय संघटना आणि लोकसहभागासह संस्थांबरोबर प्राथमिक पातळीवर आंतर-क्षेत्रीय सहयोगांचा समावेश असेल जेणेकरुन प्राथमिक आरोग्य आणि आधारभूत आणि तृतीयात्मक पायाभूत सुविधा वाढण्यास मदत होईल.
  6. हे केवळ योग्य आणि समग्र उपचार सुनिश्चित करणार नाही, तर लोकांना स्वतःला आजारांपासून वाचवण्यासाठी आणि उपचारांच्या मागणीसाठी वागण्याची प्रेरणा देईल. त्यासाठी लोकांमध्ये प्रबोधन होणे आवश्यक आहे.
  7. राष्ट्रीय विद्यार्थी संघ (NCC), राष्ट्रीय स्काऊट सेवा (NSS), नर्सिंग शाळा इ. सारख्या प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या माध्यमातून आरोग्यविषयक कार्यक्रमे संयुक्तपणे चालविणे, ज्यामुळे सामाजिक व पर्यावरणीय निर्धारकांना संबोधित करण्यामध्ये विश्वास निर्माण होईल आणि वैयक्तिक स्वच्छता, निरोगी स्वभाव आणि स्वच्छता यात सकारात्मक बदल घडवले जाऊ शकतील.


The selection of five countries as UNSC's new temporary member

 1. 193 सदस्यांच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने (UNGA) दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, डॉमिनिकन प्रजासत्ताक, जर्मनी आणि बेल्जियम या पाच देशांची निवड संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) नवे अस्थायी सदस्य म्हणून केली आहे.
 2. ते दोन वर्षांसाठी निवडले गेले आहेत. त्यांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2019 पासून सुरु होईल.
 3. यावर्षी बोलिव्हिया, इथिओपिया, कझाकिस्तान आणि स्वीडन यांचा अस्थायी सदस्य म्हणून असलेला कार्यकाळ संपुष्टात येत आहे. या रिक्त जागांची भरती करण्यासाठी हे मतदान केले गेले.
 4. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा प्रमुख अंगापैकी एक आहे.
 5. ही परिषद आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा राखण्यास जबाबदार असते. या परिषदेला अनिवार्य निर्णयांना घोषित करण्याचा अधिकार देखील आहे.
 6. त्याला UNSC प्रस्ताव म्हणून ओळखले जाते. 1945 साली स्थापित UNSC मध्ये 15 सदस्य आहेत, ज्यात अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स हे स्थायी सदस्य आहेत.
 7. या स्थायी सदस्यांकडे ‘व्हीटो’चा (नकार देण्याचा) अधिकार आहे.
 8. उर्वरित 10 अस्थायी सदस्यांची निवड दोन वर्षांसाठी केली जाते.
 9. या 10 अस्थायी सदस्यांमध्ये आफ्रिका समुहातून 3 सदस्य; जंबूद्वीपीय समूह, पश्चिम यूरोपीय समूह आणि लॅटिन अमेरिका व कॅरेबियन समुहातून प्रत्येकी 2 सदस्य; पूर्व यूरोपीय समुहातून 1 सदस्य निवडण्यात येतात. यामध्ये एक सदस्य हा आखाती देश असणे आवश्यक आहे.


Pandit Deendayal Upadhyay junction of Mughalsarai station

 1. उत्तर प्रदेशाताली योगी आदित्यनाथ सरकारने प्रसिद्ध मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नामकरण पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन असे केले आहे. याबाबत अधिसूचनाही सरकारने प्रसिद्ध केली आहे.
 2. जनतेच्या मागणीवरुन उत्तर प्रदेशातील मुगलसराय जंक्शनचे नाव बदलून पंडित दीनदयाल उपाध्याय करण्यात आल्याचे, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.
 3. योगी सरकारच्या मंत्रिमंडळाने गेल्याच वर्षी मुगलसराय जंक्शनचे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय करण्याचा निर्णय घेतला होता.
 4. दरम्यान, योगी सरकारच्या या निर्णयावर सर्वच स्तरातून विरोध व्हाऊ लागल्याने काही काळ त्यांनी हा निर्णय लांबणीवर टाकला होता.
 5. काही लोकांनी मुगलसराय जंक्शनला देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नाव देण्याची मागणी केली होती.
 6. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे आणि भाजपाचे नेते असलेले दीनदयाल उपाध्याय आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री या दोघांचाही मुगलसराय शहराशी जवळचा संबंध आहे.
 7. मुगरसराय हे शास्त्रींचे जन्मस्थळ आहे. तर १९६८मध्ये दीनदयाल उपाध्याय यांचा मुगलसराय जंक्शन येथे संशयास्पद मृत्यू झाला होता.
 8. बऱ्याच काळापासून भाजपा या रेल्वे स्टेशनला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्याची मागणी करीत होती.


 Nikesh Arora: The highest paid CEO

 1. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे जन्मलेले निकेश अरोरा यांची अमेरिकेतील पालो अल्टो नेटवर्क्स इंक या सिक्युरिटी सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. पालो अल्टोकडून अरोरा यांना १२.८ कोटी डॉलर म्हणजे जवळपास ८५९ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे.
 3. त्यामुळे सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंच्या यादीत अरोरा यांचे नाव दाखल झाले आहे.
 4. निकेश यांच्याआधी अॅपलचे सीईओ टीम कुक हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वाधिक वेतन मिळवणारे सीईओ होते. त्यांचे पॅकेज ११.९ कोटी डॉलर आहे.
 5. जगभरातल्या सर्वात मोठ्या सायबर सिक्युरिटी सॉफ्टवेअर निर्माता पालो नेटवर्क्स कंपनीची जगभरातल्या जवळपास ५० हजार कंपन्यांबरोबर भागीदारी आहे. यात ५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
 6. टेक्नोलॉजी सेक्टरमध्ये क्लाऊड आणि डेटा डीलिंगचा अरोरा यांचा प्रदीर्घ अनुभव राहिला आहे. यापूर्वी ते सॉफ्ट बॅंक आणि गुगलमध्ये कार्यरत होते.
 7. पालो अल्टोमध्ये अरोरा यांनी मार्क मिकलॉकलीन यांची जागा घेतली आहे. मार्क २०११पासून पालो अल्टोचे सीईओ होते.
 8. मार्क मिकलॉकलीन हे कंपनीमध्ये मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत, तर अरोरा हे मंडळाचे अध्यक्ष असतील.
 9. ६ फेब्रुवारी १९६८ रोजी उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे निकेश अरोरा यांचा जन्म झाला. वडील भारतीय हवाई दलात अधिकारी होते.
 10. त्यांनी १९८९साली आयआयटी वाराणसीमधून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग पूर्ण केले आणि त्यानंतर काही काळ त्यांनी विप्रोमध्ये नोकरी केली.
 11. पुढील शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये जाण्यासाठी त्यांनी ही नोकरी सोडली. नंतर अमेरिका नॉर्थ-ईस्टर्न यूनिव्हर्सिटीतून त्यांनी एमबीएची पदवी मिळवली.


Top