Walmart-Flipkart deal and e-Commerce India

 1. नुकतेच, वॉलमार्ट या अमेरिकेच्या सर्वात मोठ्या किरकोळ विक्रेता कंपनीने भारतामधल्या सचिन बंसल आणि बिन्नी बंसल यांच्या ‘फ्लिपकार्ट’ या ई-वाणिज्य कंपनीचा 77% हिस्सा खरेदी केला आहे.
 2. जवळजवळ 1,05,360 कोटी रुपयांचा ($16 अब्ज) हा सौदा ई-वाणिज्य उद्योग क्षेत्रातला जगातला सर्वात मोठा सौदा ठरला आहे.
 3. ई-वाणिज्य भारत:-
  1. जगात ई-वाणिज्य उद्योग क्षेत्र सर्वात जास्त वेगाने वाढत आहे.
  2. भारतात या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत असून त्याची उलाढाल $21 दशलक्षवर पोहचलेली आहे. इंटरनेट धारकांची संख्याही वेगाने वाढत असल्याने भारतातले ई-वाणिज्य उद्योग क्षेत्र जगभरातल्या गुंतवणूक कंपन्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
  3. भारतात ई-वाणिज्यचा व्यवसाय दरवर्षी सरासरी 30% नी वाढतो आहे.
  4. यापूर्वी ई-वाणिज्य उद्योग क्षेत्रातली अग्रगण्य असलेल्या अॅमेजॉन या कंपनीने भारतातली ‘पे’ ही कंपनी खरेदी केली होती.
  5. अॅमेजॉन कंपनीने फॅशन व कपड्यांच्या ऑफलाइन किरकोळ बाजारात पुढे पाऊल टाकण्यासाठी भारतीय रिटेलर शॉपर्स स्टॉप लिमिटेडमध्ये $27.6 दशलक्षाची गुंतवणूक केलेली आहे.
 4. बाजारावर पडणारे प्रभाव आणि फायदे:-
  1. या सौद्यामुळे भारतातल्या ई-वाणिज्य उद्योगांवर मोठा परिणाम होणार असल्याचे वर्तविण्यात आले आहे.
  2. वॉलमार्ट सारख्या बलाढ्य कंपनीसमोर भारतीय कंपन्यांना टिकाव धरून राहाणे ही एक चिंतेची बाब आहे.
  3. ऑल इंडिया ऑनलाइन वेंडर्स असोसिएशन (AIOVA) यांच्यानुसार, कंपनीचा टिकाव लागण्याकरिता वॉलमार्ट सारख्या मोठ्या कंपन्या मर्यादित कमी किंमतीच्या शर्यतीत भाग घेतात, ज्याचा अन्य कंपन्यांवर प्रतिकूल प्रभाव पडतो.
  4. आता भारतात जगातले दोन मोठे स्पर्धक आहेत.
  5. दोघांमध्ये होणार्‍या स्पर्धेत एक फायदा म्हणून भारतातल्या कृषी व पायाभूत सुविधा क्षेत्रांना वेगवान चालना मिळणार आहे.
  6. याचा थेट फायदा शेतकर्‍यांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी होणारच, सोबतच ग्राहकांची मागणी देखील वाढणार आहे.
  7. भारतीय बाजारपेठेत वॉलमार्टच्या प्रवेशामुळे वस्तूंच्या बाबतीत कमी किंमतीत अधिक विविधता येऊ शकते.
 5. उपस्थित अडचणी व उपाय:-
  1. भारतातही इतर देशांप्रमाणेच व्यापार वाढविण्यासाठी लागणाऱ्या मुलभूत सेवा-सुविधांचा अभाव ही देखील एक समस्या आहे.
  2. भारतात आज रस्त्यांचे सर्वात मोठे जाळे पसरले आहे, पण त्यात अवघे 2% राष्ट्रीय महामार्ग आहेत.
  3. घरपोच सेवा वेळेवर देण्याच्या उद्देशाने क्वांटीफाइड कॉमर्स ही अमेरिकेची संस्था भारतात ड्रोनमार्फत वितरणाबाबत संशोधन करत आहे.
  4. फेसबुक, युट्यूब सारख्या नव्या जाहिरात माध्यमांचा आधार घेऊन ग्राहकांना थेट लक्ष्य केले जात आहे.


Top