1. भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने पॉल एच.एप्ली यांच्या नावाने दिला जाणारा उत्तम प्रशासकाचा सन्माननीय पुरस्कारमाजी कॅबिनेट सचिव भालचंद्र गोपाळ देशमुख यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
  2. महाराष्ट्राचे मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधिन क्षत्रीय यांनी  11 ऑक्टोबर रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या हस्ते हा पुरस्कार दिवंगत भालचंद्र देशमुख यांच्या वतीने स्वीकारला.
  3. दिवंगत पंतप्रधान  राजीव गांधी,  विश्वनाथ प्रताप सिंग,  चंद्रशेखर या तीन पंतप्रधानांसोबत महत्त्वाची कामगिरी बजावलेले सनदी अधिकारी दिवंगत भालचंद्र देशमुखांनी कॅबिनेट सचिव या सर्वोच्च पदावर काम करण्यापूर्वी  मुंबई महापालिकेचे मुख्य आयुक्त, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव या पदांसह केंद्र सरकारमध्ये अनेक पदांवर काम केले. प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवीत लोक प्रशासनात अनेक आदर्श पायंडे देशमुखांनी पाडले.
  4. भारतीय राजकारणातल्या अद्वितिय घटनांची साक्ष देणारे व भारताच्या अलौकिक ग्रंथसंपदेत मोलाची भर घालणारे 'पुना टू प्राइम मिनिस्टर्स ऑफिस', ' अ कॅबिनेट सेक्रेटरी थिंक्स अ लाऊ ड', ' अ कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स अराउंड', ' अ कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स बॅक' यासह अनेक ग्रंथ भालचंद्र देशमुखांनी लिहिले.


  1. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी नियुक्ती  करण्यात आली आहे. 
  2. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही घोषणा केली.  गजेंद्र चौहान यांची या पदावरील नियुक्ती वादग्रस्त ठरली होती. 
  3. अनुपम खेर यांनी चरित्र अभिनेते म्हणून बॉलीवूडमध्ये दीर्घकाळ आपली छाप पाडली आहे. त्यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून 'कर्मा', 'चायना गेट', 'दिलवाले दुल्हनियॉं ले जाएंगे', 'कुछ कुछ होता है' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहे. 
  4. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी भारत सरकारने खेर यांना 2004 मध्ये  पद्मश्री आणि 2016 मध्ये  पद्मभूषण पुरस्काराने गौरवले. खेर यांनी याआधी सेन्सॉर बोर्ड आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. 
  5. तसेच यापूर्वी एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान होते. मात्र, सुरुवातीपासूनच ते वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या नियुक्तीला विरोध करत विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले होते. तरीही चौहान पदावर कायम होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपल्यावर मुदतवाढ नाकारण्यात आली. चौहान यांनी अनुपम खेर यांना नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.


Top