1. 91वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे होणार आहे. 
 2.  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या नागपुरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 
 3. संमेलनाच्या यजमानपदाचा मान 'विवेकानंद आश्रम' या संस्थेला देत असल्याचे महामंडळाचे  अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशीयांनी पत्रपरिषदेत जाहीर केले.
 4. संमेलनस्थळाच्या पाहणी समितीने 10 सप्टेंबर रोजी  अह वाल सा दर केला. दिल्लीतील आयोजक संस्थेने ऐनवेळी माघार घेतल्याने बडोदा व हिवरा आश्रम हे दोनच पर्याय महामंडळापुढे उरले होते. परंतु, यातील एकाही स्थळावर एकमत होत नसल्याने अखेर मतदान घेण्यात आले. 
 5. महामंडळाच्या एकूण  19 सदस्यांपैकी 16 सदस्यांनी या मतदानात भाग घेतला. तीन सदस्य अनुपस्थित होते. यातील सात मते बडोद्याला तर नऊ मते हिवरा आश्रमला मिळाली. अखेर बहुमताच्या आधारे संमेलन हिवरा आश्रमला देण्याचा निर्णय झाला, अशी माहिती डॉ. श्रीपाद जोशी यांनी दिली.
 6. तसेच या निर्णयामुळे सात वर्षांनंतर विदर्भाला पुन्हा संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. याआधी  2012 मध्ये 85वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चंद्रपूरच्या सर्वोदय शिक्षण मंडळाने आयोजित केले होते.


 1. काळ्या पैश्याचा प्रवाह रोखण्याच्या दृष्टिने, उच्च मूल्य व्यवहारावर देखरेख ठेवण्यासाठी वित्त मंत्रालयाच्या आयकर विभागाकडून ऑक्टोबर महिन्यापासून प्रोजेक्ट इनसाइट’ च्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली जाणार आहे.
 2. ‘प्रोजेक्ट इनसाइट’ हे कर छापे म्हणून ओळखल्या जाणार्‍या शोध मोहिमा आयोजित करण्याच्या  पारंपारिक पद्धती ऐवजी ऑनलाइन छापे टाकण्यासाठीचे एक एकात्मिक व्यासपीठ आहे, ज्यामध्ये सामाजिक माध्यमांवर सहज उपलब्ध असलेल्या अफाट माहितीचा वापर केला जाईल.
 3. ‘प्रोजेक्ट इनसाइट’ च्या अंमलबजावणीसाठी कर विभागाने गेल्या वर्षी  L&T इन्फोटेकसोबत एक करार केला होता. जे यासंबंधीचे व्यासपीठ कार्य करण्यास सक्षम करीत आहे. आयकर परतावा, आयकर अर्ज,  TDS/TCS घोषणापत्र आणि वित्तीय संस्थांकडून मिळालेले आर्थिक व्यवहारांचे विवरण यांची संपूर्ण माहिती सरकारला संकलित करण्यास हा प्रकल्प तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. या प्रकल्पामुळे कर पालन सुधारण्यासाठी मदत होणार.    
 4. प्रकल्पांतर्गत चालवली जाणारी कार्ये पुढीलप्रमाणे आहेत -  फेसबूक, इंस्टाग्राम यासारख्या सामाजिक माध्यमांवर टाकल्या जाणार्‍या माहितीवरून आणि छायाचित्रावरून संबंधित व्यक्तीचा खर्च आणि घोषित केलेले उत्पन्न यामधील तफावत ओळखली जाणार. संशयित व्यक्तीची या पद्धतीने ओळख केली जाणार.

 5.  टॅक्स बेसचे खोलवर आणि विस्तारीत स्वरूप पाहण्यासह प्रभावी जोखीम व्यवस्थापनासाठी अशा माहितीच्या डेटा माइनिंग, संकलन, सविस्तर तुलना आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.

 6. विदेशी खाते कर अनुपालन कायदा  (FATCA) आणि  कॉमन रिपोर्टिंग स्टँडर्ड (CRS) लागू करण्यासाठी देखील या नवीन तांत्रिक पायाभूत सुविधांचा वापर केला जाईल.

 7. प्रकल्पाचा एक भाग म्हणून, प्राथमिक पडताळणी हाताळण्यासाठी, मोहिमेचे व्यवस्थापन, मोठ्या प्रमाणावर पत्रे/सूचना तयार करण्यासाठी एक नवीन अनुपालन व्यवस्थापन केंद्रीकृत प्रक्रिया केंद्र  (CMCPC) स्थापन करण्यात येणार आहे.

 


 1. 'नाविका सागर परिक्रमा' या उपक्रमांतर्गत नौदलच्या महिला अधिकाऱ्यांचा चमू भारतीय बनावटीच्या आयएनएसव्ही ' तारिणी' या नौकेने जगप्रवासाला रवाना झाला.
 2. भारतात पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांसह सुरु होणारा हा प्रवास पहिल्यांदाच होत आहे. ही आयएनएसव्ही तारिणी ही  आयएनएसव्ही म्हादईची पुढील आवृत्ती आहे. 
 3. भारत सरकारचा ' नारी शक्ती'ला असलेला भक्कम पाठींबा लक्षात घेता हा प्रकल्प सागरी नौकानयन उपक्रमांच्या प्रचारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 
 4. भारत देशासाठी हा गौरवास्पद व ऐतिहासिक क्षण असल्याचे मत  संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्‍त केले. 
 5. पहिला भारतीय वैयक्तिक जागतिक जलप्रवास  19 ऑगस्ट 2009 ते 19 मे 2010 या काळात आयएनएसव्ही म्हादईसोबत निवृत्त कॅप्टन दिलीप दोंदे यांनी केला होता. 
 6. तसेच पहिला भारतीय विनाथांबा वैयक्तिक जगप्रवास कमांडर अभिलाष टॉमी यांनी 1 नोव्हेंबर 2012 ते 31 मार्च 2013 या कालावधीत केला होता.
 7. आयएनएसव्ही तारिणीवरील या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर स्वाती पी, लेफ्टनंट ऐश्वर्या बोद्दापती, लेफ्टनंट विजया देवी, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.


Top