shaktikant Das: The new governor of the Reserve Bank of India (RBI)

 1. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याच्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी वित्त सचिव असलेल्या शक्तिकांत दास यांची तीन वर्षांसाठी RBIच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. शक्तिकांत दास माजी वित्त सचिव आहेत. सध्या ते वित्त आयोगाचे सदस्य आहेत. ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
 3. वित्त विषयात मास्टर्स डिग्रीप्राप्त दास यांनी केंद्र सरकारच्या विविध अधिकाऱ्यांचे सचिवपद भुषवले आहे.
 4. त्यांनी वित्त मंत्रालयाचे सहसचिव, तामीळनाडू विशेष महसूल आयुक्त, शिवाय उद्योग खात्याचे सचिव म्हणून काम पाहिले आहे. गेल्या वर्षीच ते केंद्रीय सेवेतून निवृत्त झाले आहेत.
 5. सरकारच्या नोटाबंदी निर्णयात शक्तिकांत दास यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
 6. RBI विषयी -
  1. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.
  2. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले.
  3. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
  4. भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले.
  5. RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उप गव्हर्नर नियुक्त केले जातात.
  6. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते.
  7. सर सी. डी. देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.


'State Assembly Elections 2018' result

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल दि. 11 डिसेंबर 2018 रोजी जाहीर केली गेलीत.

तेलंगणा (एकूण 119 जागा)

 1. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) 88
  काँग्रेस 21
  भाजप 1
  अन्य 9

मिझोरम (एकूण 40 जागा)

मिझो नॅशनल फ्रंट (MNF) 26
काँग्रेस 5
भाजप 1
अन्य 8

मध्यप्रदेश (एकूण 230 जागा)

तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) 88
काँग्रेस 114
भाजप 109
अन्य 7

छत्तीसगड (एकूण 90 जागा)

काँग्रेस 68
भाजप 15
अन्य 7

राजस्थान (एकूण 199 जागा)

काँग्रेस 99
भाजप 73
अन्य 27
 1. भारतातली विधानसभा निवडणूक म्हणजे ती निवडणूक ज्यामध्ये भारतीय मतदाता विधानसभा (किंवा विधिमंडळ / राज्य विधानसभा) मधील सदस्यांची निवड करतो.
 2. ही निवडणुक दर 5 वर्षांनी आयोजित केली जाते आणि विधानसभेच्या सदस्यांना आमदार (MLA) म्हणून संबोधले जाते.
 3. विधानसभा निवडणुका सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वर्षी घेतल्या जात नाहीत.
 4. विधानसभा निवडणुका या देशातील 29 राज्यांमध्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी 2 (दिल्ली आणि पुडुचेरी) मध्ये आयोजित केल्या जातात.


Top

Whoops, looks like something went wrong.