MPSC chalu ghadamodi, current affairs

1. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेतही आठ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 125 तर, विरोधात 105 मते पडली. विधेयकावरून घूमजाव करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत सभात्याग केला.

2. तर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.

3. राज्यसभेत 240 सदस्य असून पाच सदस्यांनी गैरहजर राहण्यासाठी रितसर परवानगी मागितली होती. त्यामुळे वरिष्ठ सभागृहात 235 सदस्य उपस्थित राहणार होते. पण, प्रत्यक्ष मतदानावेळी 230 सदस्य सभागृहात होते.

4. तसेच शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण, लोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामविलास पासवान असे पाच खासदार गैरहजर होते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन अर्थ इमेजिंग सॅटलाइट रिसॅट-2 बीआर 1 चे प्रक्षेपण केले.

2. तर पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्ही हा भारताचा अत्यंत भरवशाचा उपग्रह प्रक्षेपक आहे. पीएसएलव्हीची ही 50 वी मोहीम होती.

3. RISAT-2BR1 हा रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइट आहे. या उपग्रहाचे वजन 628 किलो आहे.

4. RISAT-2B मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे. RISAT-2 ची जागा घेण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या RISAT-2B उपग्रहाचे प्रक्षेपण झाले होते.

5. रिसॅट उपग्रहांची मालिका असून प्रामुख्याने हेरगिरीसाठी या उपग्रहांचा उपयोग करण्यात येणार आहे. या उपग्रहामुळे सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक बळकट होईल. शत्रुच्या हालचाली या उपग्रहाच्या नजरेतून सुटण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.

6. तसेच काही दिवसांपूर्वीच इस्रोने कार्टोसॅट-3 या अर्थ इमेजिंग सॅटेलाइटचे प्रक्षेपण केले होते. RISAT-2BR1 या उपग्रहासोबत इस्रोने अन्य देशांच्या आणखी नऊ उपग्रहांचे प्रक्षेपण केले. यातले सहा उपग्रह अमेरिकेचे तर, इस्रायल, इटली आणि जापानचा प्रत्येकी एक उपग्रह आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरण प्रक्रियेअंतर्गत 10 हजार अमेरिकन ‘सिग सउर अ‍ॅसॉल्ट रायफल्स’ (American SiG Sauer assault) ची पहिली खेप भारताला मिळाली आहे.

2. तर या अत्याधुनिक रायफलचा वापर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना समूळ नष्ट करण्यासाठी केला जाणार आहे.

3. भारताने लष्कराला अधिक सक्षम बनवण्साठी व अद्यावत शस्त्रसाठ्याने परिपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने तब्बल 72 हजार 400 रायफल निर्मितीचे कंत्राट दिले होते.

4. तसेच सद्यस्थितीस या रायफल जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय सेनेच्या उत्तर कमांडकडे सोपवण्यात आल्या आहेत. भारतीय लष्कराची ही उत्तर कमांड जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी अभियान राबवते, तसेच पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या सर्व कारवायांना सडतोड प्रत्युत्तर देते.

5. तर या रायफलचा भारतीय लष्कराच्या शस्त्रसाठ्यात समावेश झाल्याने लष्कराच्या मारक क्षमतेत वाढ झाली आहे. कारण, ही रायफल जवळून तसेच दूरून मारा करणाऱ्या रायफल श्रेणीमधील सर्वात अद्यावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी आहे.

6. भारतीय लष्कराला या 72 हजार 400 अद्यावत रायफलने सुसज्ज करण्यासाठी सरकारकडून 700 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती.

7. अमेरिकेतील शस्त्र निर्मिती करणारी सिग सउर ही कंपनी या रायफल भारताला देत आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. उप-कर्णधार रोहित शर्माने अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.

2. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकार ठोकणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

3. तर हा विक्रम करण्यासाठी रोहित शर्माला अवघ्या एका षटकाराची गरज होती, मात्र पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहित फलंदाजीत पुरता अपयशी ठरला. मात्र मुंबईच्या मैदानावर खेळत असताना अखेरीस रोहितने हा विक्रम केला आहे.

4. तसेच या विक्रमी कामगिरीसोबत रोहित शर्माला दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळालं आहे.

5. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी यांनीच आतापर्यंत 400 षटकारांचा टप्पा ओलांडला आहे. ख्रिस गेलच्या नावावर सध्या 534 तर शाहिद आफ्रिदीच्या नावावर 476 षटकार जमा आहेत. 


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. नागपूर समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एकनाथ शिंदेंनी केलेली आहे.

2. मंत्रिमंडळाच्या बैठकीत माझ्या या मागणीला इतर मंत्र्यांनाही पाठिंबा दिला असून, लवकरच हा मार्ग ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ म्हणून ओळखला जाणार असल्याचं राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

3. समृद्धी महामार्ग तीन वर्षांच्या आत पूर्ण होईल. 20 ते 22 टक्के काम प्रगतिपथावर आहे.

4. नागपूर- मुंबई हे 15 तासांचं अंतर समृद्धी महामार्गामुळे सहा तासांवर येणार आहे.

5. समृद्धी महामार्गामुळे त्या भागातल्या विकासाला चालना मिळणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र सगळ्याच भागाला न्याय मिळणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा बाळासाहेबांच्या संकल्पनेतून आणि गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनातून तयार झालेला आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. सन 1882 मध्ये आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.

2. गुजराथी कथाकार व कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचा जन्म 12 डिसेंबर 1892 मध्ये झाला होता.

3. जी. मार्कोनी याला सन 1901 मध्ये प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.

4. 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.

5. राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 मध्ये झाला.

6. प्रसिध्द अभिनेते शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 मध्ये झाला.

7. प्रियांका चोप्रा यांना सन 2016 मध्ये युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले होते.


Top