1. बीसीसी आयने ११ जुलै रोजी रात्री  रवी शास्त्री यांच्याकडे टीम इंडियाच्या मुख्य कोचपदाची जबाबदारी सोपविली.
  2. माजी वेगवान गोलंदाज झहीर खान हे संघाचे गोलंदाजी कोच असतील. याशिवाय राहुल द्रविड यांच्याकडे विशिष्ट परदेश दौऱ्यासाठी फलंदाजी सल्लागाराची नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
  3. राहुल द्रविड हे भारतीय 'अ' आणि १९ वर्षांखालील मुलांच्या संघाचेसुद्धा मुख्य मार्गदर्शक आहेत.
  4. बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करताना सांगितले, की क्रिकेट सल्लागार समितीच्या ( सीएसी ) शिफारशींवर आम्ही शास्त्री यांना मुख्य कोच नेमण्याचा निर्णय घेतला. झहीर खान हे पुढील दोन वर्षांसाठी गोलंदाजी कोच असतील.
  5. तसेच भारताकडून २०१४ मध्ये अखेरचा सामना खेळणारा  झहीर खान हा भारताचा सर्वोत्कृष्ट स्विंग गोलंदाज मानला जातो.


  1. भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राज हिने महिला वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे.
  2. तसेच यासह तिने अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. मितालीने केवळ महिला क्रिकेटर नाही तर अनेक दिग्गज पुरूष क्रिकेटपटूंनाही मागे टाकले आहे.
  3. इंग्लंडमध्ये सध्या महिला वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध मिताली ब्रिस्टलच्या मैदानावर उतरली त्यावेळी वर्ल्ड रेकॉर्डपासून मिताली केवळ ४१  धावा दूर होती. या सामन्यात ११४ चेंडूंमध्ये ६९ धावा फटकावून मिताली बाद झाली, पण त्याआधी तिने ६ हजार धावांचा टप्पा ओलांडला.
  4. १८३ एकदिवसीय सामन्यांमध्ये मितालीने हा विक्रम केला. यापुर्वी इंग्लंडची खेळाडू शार्ले एडवर्डच्या नावावर हा विक्रम होता. शार्ले एडवर्डने १९१ सामन्यांमध्ये ५९९२ धावा बनवल्या होत्या.


Top

Whoops, looks like something went wrong.