chalu ghadamodi, current affairs

1. केंद्र शासनाच्या युवा आणि क्रीडा मंत्रालय यांच्यामार्फत गुणवंत खेळाडूंकरिता क्रीडा पेन्शन योजना राबविण्यात येते. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे.

2. गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेसाठी अर्ज करणारा खेळाडू हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे. खेळाडूने ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.

3. विविध स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त/गुणवंत खेळाडूस नमूद केल्यानुसार मासिक मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पेन्शन 30 वर्षापासून (किंवा सक्रिय क्रीडा पासून सेवानिवृत्तीची तारीख, जे नंतर असेल) मिळणाऱ्या खेळाडूवर देय असेल आणि त्याच्या/तिच्या आयुष्यादरम्यान कायम राहील, परंतु पेन्शन लागू करताना खेळाडू सक्रिय क्रीडा करियरमधून निवृत्त झालेले असणे आवश्यक आहे. 


chalu ghadamodi, current affairs

1. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला देशातीलच नव्हे तर आशिया, आफ्रिका आणि इतर खंडात लसींचा तसेच विविध प्रकारच्या औषधांचा पुरवठा करणारी एक प्रमुख संस्था बनविले जाईल. यासाठी संस्थेला सर्व प्रकारची प्रशासकीय आणि आर्थिक मदत केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

2. श्री. रावल यांनी परळ येथील हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला भेट देऊन महामंडळाच्या कामकाजाची माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महामंडळाने विविध ९ प्रकारच्या औषधगोळ्या तयार करण्याचा हाती घेतलेला प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे, असे मंत्री श्री. रावल यांनी यावेळी सांगितले.

3.‘हाफकिन’ ही भारतासह आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांना पोलिओ लसींचा पुरवठा करणारी प्रमुख संस्था आहे. 


chalu ghadamodi, current affairs

1. केंद्र सरकारने पर्यावरणपुरक वाहनांचा आग्रह धरला आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा अंगिकार करण्याकडे कल आहे. त्याचवेळी टीव्हीएस मोटार कंपनीने चक्क इथेनॉलवर चालणारी बाइक बाजारात आणली आहे. ही देशातील पहिली बाइक आहे.

2. दुचाकी व तीनचाकी वाहने बनवणारी जागतिक पातळीवरील नामांकित कंपनी टीव्हीएस मोटार कंपनीने ‘अपाचे आरटीआर २०० एफआय ई १००’ ही भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल सादर केली आहे.

3. टीव्हीएस मोटर कंपनीने सर्वात आधी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये ही संकल्पना मांडली होती. टीव्हीएस अपाचे हा टीव्हीएस मोटार कंपनीचा सर्वात प्रमुख ब्रँड असून जगभरात ३५ लाखाहून अधिक समाधानी ग्राहक या ब्रॅण्डचा आनंद घेत आहेत.

4. इथेनॉलचे उत्पादन नूतनीकरणीय प्लान्ट स्रोतांकरवी देशात केले जाते. हे विषारी नसून बायोडिग्रेडेबल आहे. हाताळणी, साठवण आणि वाहतूक या सर्व दृष्टीने सुरक्षित आहे


chalu ghadamodi, current affairs

1. १९२०: पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले.

2. १८१७: अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्‍री थोरो यांचा जन्म.

3. १६६०: बाजी प्रभू देशपांडे यांचे निधन.

4. १९८२ : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना

5. १९६५ : संजय मांजरेकर – क्रिकेटपटू जन्म.

 


Top

Whoops, looks like something went wrong.