India and SCO: Opportunities and Challenges

 1. 8-9 जून 2018 रोजी चीनच्या किंगदाओ शहरात शांघाय सहकार संघटना (SCO) याची वार्षिक शिखर परिषद संपन्न झाली.
 2. या परिषदेत चीन आणि भारत यांच्यातल्या संबंधांना चालना मिळणार्‍या अनेक विषयांवर चर्चा दोन्ही देशांनी केली आणि म्हणूनच अलीकडेच दोन्ही देशांमधील विवादपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा अधिक महत्त्वाची ठरते.  
 3. परिषदेदरम्यान चर्चित मुद्दे:-
  1. परिषदेत भारताने दहशतवादी जाळ्याच्या विरोधात एकत्रितपणे क्षेत्रीय आणि वैश्विक लढा देण्यासाठी प्रयत्न करण्यावर आणि व्यापार वाढविण्यावर भर दिला.
  2. भारताकडून SCO च्या सदस्य देशांमध्ये व्यापार वाढवण्यासाठी प्रादेशिक संपर्क प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले गेले.
  3. भारताने इराणमधील चबाहर बंदर प्रकल्प आणि संसाधन-समृद्ध मध्य आशियाई देशांमध्ये प्रवेश मिळवून देण्यार्‍या 7200 किलोमीटरहून अधिक लांबीच्या आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण परिवहन मार्गिका यासारख्या संपर्क जोडणी प्रकल्पांवर भर दिला.
  4. गेल्या वर्षी $51 अब्जपर्यंत पोहोचलेली व्यापारी तूट भरून काढण्यासाठी भारताने चीनला त्याचे माहिती तंत्रज्ञान आणि औषधीनिर्माण क्षेत्र खुले करण्यास विनंती केली आहे.
  5. यावर्षी दहशतवाद, अतिरेकी आणि क्रांतिकारकतेविरुद्धच्या लढ्यात सहकार्य करण्यासंदर्भात मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला गेला.
  6. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या वाढलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) येथून चालवलेल्या दहशतवादी संरचनेचे उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव निर्माण करण्याच्या हेतूने भारताने विविध बहुपक्षीय मंचांसमोर पाकिस्तान-प्रायोजित दहशतवादाचा मुद्दा मांडला आहे.
शांघाय सहकार संघटना
 1. शांघाय सहकार संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची स्थापना 2001 साली करण्यात आली. याचे मुख्यालय बीजिंग, चीनमध्ये आहे.
 2. SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे.
 3. चीन हा SCO चा संस्थापक आहे. भारत 2017 साली SCO चा पूर्ण सदस्य बनला.
 4. SCO ला सर्वात मोठा क्षेत्रीय व्यापारी संघ मानल्या जात आहे. या संघामुळे आशियात आर्थिक वृद्धीला बळकटी प्राप्त होणार.
 5. याचा भारताला असा फायदा म्हणजे की, विकासासाठी राजकीय संबंध आणि सुरक्षा अधिक महत्त्वाची असते. त्यासाठी सामंजस्य असणे गरजेचे ठरते.
 6. SCO च्या माध्यमातून भारताला आपल्या शेजारी देशांसोबतचे संबंध सुधारण्यास मदत होईल आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार.
 7. मात्र वाढती राजकीय अस्थिरता ही अजून एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यासाठी यामार्गे प्रयत्न केले जाईल.


 The declaration of India related to paragraph 2 and 3 of the supplement in the Bern Agreement

 1. 9 सप्टेंबर 1886 रोजी पॅरिसमध्ये झालेल्या साहित्यिक आणि कलात्मक लिखाण संदर्भात ‘बर्न करार’ यांच्या मंजुरीचे साधन समजले जाणारे भारताचे घोषणापत्र 28 मार्च 2018 रोजी जागतिक बौद्धिक संपदा संघटनाकडून अधिसूचित करण्यात आले होते.
 2. त्या करारामधील परिशिष्टचे परिच्छेद 2 आणि 3 हे भारतासंदर्भात लिहिले गेले आहेत.
 3. त्यानुसार भारत सरकार 10 ऑक्टोबर 2024 रोजी संपणार्‍या 10 वर्षांच्या मुदतीपर्यंत निर्दिष्ट विशेषाधिकाराचा उपभोग घेऊ शकणार आहे.
 4. ही घोषणा भारत प्रजासत्ताकाच्या क्षेत्राच्या संबंधात 28 मार्च 2018 रोजी लागू केली गेली.
 5. परिशिष्टच्या परिच्छेद 2 मधून भारत प्रजासत्ताकाला अश्या ग्रंथांच्या भाषांतराचा विशेषाधिकार, ज्याचे प्रकाशन पुन: छपाई किंवा समरूप स्वरुपात पुनर्लेखनाच्या रूपात झाले आहे.
 6. सक्षम प्राधिकरणाद्वारे केवळ शिक्षण, शिष्यवृत्ती किंवा संशोधनाच्या उद्देशाने प्रदान केले गेले आहे.
 7. परिशिष्टच्या परिच्छेद 3 मधून भारत प्रजासत्ताकाला असे ग्रंथ, ज्यांचे प्रकाशन पुन: छपाई वा समरूप स्वरुपात पुनर्लेखनाच्या रूपात झाले आहे किंवा कायद्यान्वये तयार केल्या गेलेल्या श्रव्य-दृश्य स्थिरीकरणाच्या श्रव्य-दृश्य रूपात झाले आहे, यांची पुनः प्रस्तुतीचे विशेषाधिकारांच्या बदल्यात अशा आवृत्त्या प्रकाशित करण्याची परवानगी असेल ज्याचे 6 महीन्यांमध्ये वितरण/विक्री झालेली नाही.
 8. भारत 28 एप्रिल 1928 पासून बर्न कराराचा सदस्य आहे आणि वेळोवेळी परिशिष्टच्या परिच्छेद 2 व 3 अन्वये घोषणांची प्रस्तुती करीत आहे.
 9. प्रस्तुती वा उपस्थित अधिसूचना भारताच्या पूर्वस्थितीच्या क्रममध्येच आहे.


 India ranked 84th in the Global Hope Index

 1. एखाद्या देशाने सकारात्मक विचार करत विकासाची अथवा बदलाची आशा धरल्यास होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी जागतिक आशा निर्देशांक काढण्यास सुरवात करण्यात आली आहे.
 2. केवळ एखाद्याच क्षेत्रातील अभ्यासावरून क्रमवारी काढण्याऐवजी तुलनात्मक बदलांचा अभ्यास करून राहुल वासलेकर यांनी ही नवी यादी तयार केली आहे.
 3. जगभरातील १३१ देशांमध्ये सर्वेक्षण करून तयार करण्यात आलेल्या या यादीत भारत ८४व्या स्थानावर आहे.
 4. आशेमुळे एखाद्या देशाच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीत बदल घडून येतो का?, हे तपासण्यासाठी हे सर्वेक्षण केले गेले.
 5. एखादी सकारात्मक गोष्ट घडावी, अशी अपेक्षा करणे म्हणजे आशा अशी सर्वसामान्य व्याख्या आहे. ही वैयक्तिक बाब असली तरी सर्वेक्षण करताना ती सामाजिक बाब म्हणून ध्यानात घेतली गेली.
 6. दहशतवाद, स्थलांतर आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे जगभरात सर्वत्र नकारात्मक वातावरण निर्माण होत असताना लोकांमध्ये आशेचा किरण कायम राहावा, या उद्देशाने जागतिक आशा निर्देशांकची सुरवात करण्यात आली आहे.
 7. आपत्तीमध्ये आशा कायम ठेवल्याने समाजामध्ये काय आणि किती बदल झाला, नागरिकांचे बदललेले जीवनमान आणि आर्थिक स्थिती याची छाननी या वेळी घेण्यात आली.
 8. तसेच, गेल्या काही वर्षांमधील सामाजिक व इतर बदल, जागतिक बॅंकेसारख्या संस्थांनी गोळा केलेली माहिती यांचा अभ्यासही करण्यात आला.
 9. एखाद्या देशाने संशोधनासाठी काय केले, शिक्षणक्षेत्रातील प्रगती, नागरिकांना पाणी आणि विजेसारख्या सुविधा देण्यासाठीचे प्रयत्न, राजकीय स्थैर्य यांचाही अभ्यास केला गेला.
 10. एखाद्या देशातील दीर्घकालीन अथवा अल्पकालीन बदलाचा किती प्रभाव पडतो, याचा अंदाज या निर्देशांकामुळे येतो.
 11. आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्न या बाबींपलीकडे राजकारण, संशोधन यांच्याकडे पाहण्याची गरज असली तरी या मूळ बाबींशिवाय देशाला कोणत्याही बाबतीत आशा ठेवता येणार नाही, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे.
जागतिक आशा निर्देशांक यादीतील प्रमुख देश
क्रमांक देश गुण
१. आयर्लंड ०.७२७
७. सिंगापूर ०.६९१
१७. अमेरिका ०.६५१
२४. जपान ०.६२६
४४. भूतान ०.५६४
५३. चीन ०.५३१
७५. श्रीलंका ०.४८५
८४. भारत ०.४६८
१२७. पाकिस्तान ०.३०५


 FIFA World Cup 2018

 1. फिफा विश्वचषक २०१८ ही फिफा विश्वचषक ह्या जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेची २१वी आवृत्ती असेल. ही स्पर्धा १४ जून ते जुलै १५ दरम्यान रशियामध्ये खेळवली जाईल.
 2. रशिया तसेच पूर्व युरोपात विश्वचषकाचे आयोजन होण्याची ही पहिलीच वेळ असेल. डिसेंबर २०१० मध्ये झ्युरिक येथे झालेल्या फिफाच्या बैठकीमध्ये रशियाला यजमानपदासाठी निवडले गेले.
 3. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सर्व २१० सदस्य राष्ट्रांनी पात्रता फेरीमध्ये भाग घेतला. यजमान रशियासह जगातील एकूण ३२ संघ ह्या स्पर्धेच्या मुख्य फेरीत भाग घेतील.
 4. १२ मार्च २०१५ ते १५ नोव्हेंबर २०१७ या काळात पात्रता फेरीचे एकूण ८७२ सामने खेळवण्यात आले ज्यांमधून ३१ संघांना मुख्य विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळाला. तर यजमान रशियाला थेट मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळाला.
 5. आईसलँड व पनामा ह्या देशांनी विश्वचषक स्पर्धेत प्रथमच प्रवेश मिळवला, तर इटली व नेदरलँड्स ह्या दिग्गज युरोपीय संघांवर पात्रता फेरीतच पराभवाची नामुष्की ओढवली.
 6. तसेच घाना व आयव्हरी कोस्ट ह्या बलाढ्य आफ्रिकन संघांना देखील मुख्य फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आले.
 7. यापूर्वीची फिफा विश्वचषक २०१४ ही स्पर्धा जून १२ ते जुलै १३ दरम्यान ब्राझील देशामध्येखेळवली गेली. जर्मनी संघाने अर्जेंटिनाचा पराभव करत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते.
 8.  टेलस्टार १८:-
  1. फिफा वर्ल्ड कप २०१८मध्ये ‘टेलस्टार १८’ या फुटबॉलने सामने खेळले जाणार आहे. हे बॉल पाकिस्तानातील एका कंपनीने तयार केले आहेत.
  2. टेलस्टार १८ हा बॉल आदिदास या कंपनीने डिझाईन केला असून फुटबॉल वर्ल्ड कपसाठी बॉल डिझाईन करण्याची आदिदासची ही १३वी वेळ आहे.
  3. फुटबॉलच्या पहिल्या वर्ल्ड कपमधील बॉललाही टेलस्टार १८ हे नाव देण्यात आले होते. तेच नाव आदिदासने पुन्हा एकदा वापरले आहे.
  4. टेलस्टार १८ हा बॉल हा तयार करण्याचे काम पाकिस्तानच्या सियालकोटमधील फॉरवर्ड स्पोर्ट कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी आपल्या खेळ वस्तूंच्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे.
  5. या कंपनीत प्रत्येक महिन्यात ७ लाख बॉल तयार केले जातात. २०१४ विश्व चषकासाठीही याच कंपनीने फुटबॉल तयार केले होते.
 9.  व्हिक्टोरिया लोपीरेवा:-
  1. २००३मध्ये मिस रशिया स्पर्धेची विजेती ठरलेली व्हिक्टोरिया लोपीरेवाची फिफा विश्वचषक २०१८च्या ब्रँड अॅम्बेसिडरपदी निवड करण्यात आली.
  2. व्हिक्टोरियाचा जन्म २८ जुलै १९८३मध्ये रशियात झाला. तिने रोस्टोव्ह स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक्स येथून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली आहे.
  3. ‘मॉडेल ऑफ डॉन’, ‘फेस ऑफ द इयर’, ‘रोस्टोव्ह ब्युटी’ आणि ‘डॉनबास ओपन’ या स्पर्धांच्या विजेतेपदामुळे ती नावारुपास आली.
  4. २००७मध्ये ‘फुटबॉल नाइट’ या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा व्हिक्टोरियाच्या खांद्यांवर होती. ज्यानंतर तिला या खेळात रस वाटू लागला.
  5. व्हिक्टोरिया फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे.
  6. ज्याच्या माध्यमातून ती रशियन संस्कृतीचा प्रचार करणार आहे. त्याशिवाय ती या खेळाच्या आयोजनामागची काही महत्त्वाची उद्दिष्ट सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे.


 Gauri Lankesh and Sudip Dutta's name are in the Museum of Nazi Museum

 1. पत्रकारिता आणि बातम्यांचा इतिहास सांगणारे जगातील सर्वांत मोठे संग्रहालय असलेल्या ‘न्युझियम’मधील पत्रकारांच्या स्मारकामध्ये गौरी लंकेश व सुदीप दत्ता भौमिक या २ भारतीयांसह १८ पत्रकारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
 2. जागतिक स्तरावर प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर जी गदा आणली जात आहे, त्याची जाणीव सर्वांना व्हावी या हेतूने अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे ‘न्युझियम’ संग्रहालयात पत्रकारांचे हे स्मारक उभारले आहे.
 3. भारतातील जातीव्यवस्था व हिंदु मुलतत्त्ववादावर घणाघाती प्रहार करणारे लेख गौरी लंकेश नेहमी लिहीत.
 4. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी एका व्यक्तीवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
 5. सुदीप दत्ता भौमिक यांनी निमलष्करी दलातील भ्रष्टाचार त्रिपुरातील एका वृत्तपत्रात लेखन करुन उजेडात आणला होता.
 6. त्यानंतर एक आठवड्याने निमलष्करी दलाचा एक अधिकारी तपन देववर्मा याने सुदीप यांना २१ नोव्हेंबर २०१७ रोजी भेटायला बोलावले.
 7. त्यावेळी रागाच्या भरात देववर्माने आपल्या अंगरक्षकाला सुदीप यांना गोळी घालून ठार मारण्याचा आदेश दिला.
 8. दक्षिण अशियाई देशांतील यामिन रशीद या पत्रकाराच्या नावाचाही यंदा न्यूजियमच्या स्मारकात समावेश करण्यात आला आहे. मालदीवमधील द डेली पॅनिक या वृत्तपत्रासाठी यामिन काम करत होते.


Top