India has signed 14 Bilateral Cooperation Agreement between France

 1. फ्रांसचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रोन हे 9 मार्च ते 12 मार्च 2018 या काळात भारत भेटीवर आले आहेत. त्यांच्या या भेटीत दोन्ही देशांनी विविध क्षेत्रांमध्ये 14 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या केल्या.
 2. भारत-फ्रांस यांच्यातील राजनैतिक संबंधांना 1998 साली धोरणात्मक भागीदारीमधून सुरुवात झाली.
 3. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये राजनैतीक, आर्थिक, सांस्कृतिक तसेच संरक्षण, अंतराळ, विज्ञान व तंत्रज्ञान व शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये व्यापक स्वरुपात कार्य चालविले जात आहे.
भारत-फ्रांस सामंजस्य करार
 1. अमली पदार्थ, मादक द्रव्य आणि रासायनिक संयुगे यांचा अवैध वापर आणि अवैध वाहतूक कमी करण्यासाठी तसेच संबंधित गुन्हे रोखण्यासाठी करार.
 2. भारत-फ्रांस स्थलांतरण आणि गतीशीलता भागिदारी करार - या करारामुळे गतीशीलतेवर आधारीत तात्पुरते स्थलांतरण आणि मुळ देशाकडे कौशल्य परत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
 3. शैक्षणिक पात्रतेला सामाईक मान्यता देण्यासाठी करार
 4. रेल्वे मंत्रालय आणि फ्रांसच्या SNCF मोटिलीटीज्‌ यांच्यात रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबत सामंजस्य करार - परस्पर सहकार्य वृद्धिंगत करणे आणि अतिजलद रेल्वे मार्गावर विशेष लक्ष केंद्रीत करणे, स्थानकाचे नुतनीकरण, पायाभूत सुविधांचे आणि उपनगरीय गाड्यांचे आधुनिकीकरण करणे हा या कराराचा हेतु आहे.
 5. कायमस्वरुपी भारत-फ्रांस रेल्वे मंच निर्माण करण्यासाठी एक स्वारस्य पत्र
 6. भारत आणि फ्रांसच्या सशस्त्र दलांदरम्यान परस्पर लॉजिस्टिक सहकार्याच्या तरतुदींसंदर्भात करार - उभय देशांच्या सशस्त्र दलांदरम्यान अधिकृत बंदर दौरे, संयुक्त सराव, संयुक्त प्रशिक्षण, मानवी सहकार्य आणि आपत्ती बचाव कार्यादरम्यान परस्पर लॉजिस्टिक सहकार्य पुरवठा आणि सेवांची तरतूद या करारात आहे.
 7. पर्यावरण क्षेत्रात सामंजस्य करार - पर्यावरण आणि हवामान बदल क्षेत्रात उभय देशांच्या सरकार आणि तांत्रिक तज्ञांदरम्यान माहितीच्या आदान-प्रदानासाठी पाया तयार करणे हा या कराराचा उद्देश आहे.
 8. शाश्वत शहरी विकास क्षेत्रात सहकार्याबाबत करार - स्मार्ट शहर विकास, शहरी वाहतूक प्रणालीचा विकास, शहरी गृहनिर्माण आणि सुविधा याबाबतीत माहितीचे आदान-प्रदान या करारामुळे शक्य होईल.
 9. वर्गीकृत किंवा संरक्षित माहितीच्या आदान-प्रदान आणि परस्पर संरक्षणाबाबत करार - वर्गीकृत आणि संरक्षित माहितीच्या कोणत्याही आदान-प्रदानाला लागू असणारे समान सुरक्षा नियम या करारात नमूद करण्यात आले आहेत.
 10. मेरीटाईम अवेयरनेस मिशनच्या अभ्यासासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि फ्रांसच्या CNES दरम्यान व्यवस्था - फ्रांस आणि भारताच्या स्वारस्य क्षेत्रातील जहाजांचा शोध, ओळख आणि देखरेखीबाबत तोडगा काढण्यासाठी अंमलात आणली जाणारी व्यवस्था विकसित करण्यात येईल.
 11. भारतीय अणु ऊर्जा महामंडळ आणि फ्रांसच्या EDF दरम्यान औद्योगिक करार - जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मार्ग आखण्याची तरतूद या करारात आहे.
 12. हायड्रोग्राफी (जल भौगोलिक शास्त्र) आणि मेरीटाईम कार्टोग्राफी बाबत सहकार्यावर द्विपक्षीय करार - हायड्रोग्राफी नॉटीकल डॉक्युमेंटेशन आणि सागरी सुरक्षा माहिती क्षेत्रात उभय देशांदरम्यान सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा करार आहे.
 13. स्मार्ट शहरांना अर्थसहाय्य करण्यासाठी 100 दशलक्ष युरोच्या कर्ज सुविधेबाबत करार - स्मार्ट शहर अभियानांतर्गत दिला जाणारा निधी आणि केंद्र आणि राज्य सरकारांकडून दिला जाणारा निधी यातील तफावत भरुन काढण्यासाठी या कराराची मदत होईल.
 14. भारतीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE) आणि आणि फ्रांसची राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (INES) दरम्यान सामंजस्य करार - तंत्रज्ञान हस्तांतरण आणि एकत्रित उपक्रमांच्या माध्यमातून सौर ऊर्जा क्षेत्रात ISA सदस्य देशांमधील प्रकल्पांवर उभय देश या करारामुळे काम करु शकतील.


 New guidelines for the control of the tobacco industry by the WHO

 1. केप टाऊन (दक्षिण आफ्रिका) येथे ‘2018 वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन टोबॅको ऑर हेल्थ’ या परिषदेत WHO ने त्याच्या "टोबॅको प्रॉडक्ट रेग्युलेशन: बिल्डिंग लॅबोरेटरीज टेस्टिंग कपॅसिटी" नामक नवीन दिशानिर्देशकांना प्रसिद्ध केले.
 2. जागतिक आरोग्य संघटनेने तंबाखू उत्पादनावर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी, लोकांचा जीव वाचविण्यासाठी आणि तंबाखूशी संबंधित आजारांच्या उपचारासाठी आरोग्य सेवांसाठी महसूल मिळविण्याकरता WHO ने व्यापक तंबाखू नियंत्रणासंदर्भात माहिती दिली आहे.
 3. यासोबतच प्रकाशित करण्यात आलेल्या ‘केस स्टडीज फॉर रेगुलेटरी अप्प्रोचेस टु टोबॅको प्रॉडक्ट्स – मेन्थॉल इन टोबॅको प्रॉडक्ट्स’ या लेखात तंबाखू उत्पादनात मेन्थॉलचा वापर याबाबत सल्लात्मक टिपा प्रदान केल्या आहेत.
 4. यामध्ये तंबाखू उत्पादनात मेन्थॉलचा वापर केल्यास उद्भवणार्‍या आरोग्यविषयक परिणामांबाबत पुरावे दिले आहेत, जे धोरणनिर्मात्यांसाठी आणि नियमकांकरिता पुरावे आधारित निष्कर्ष आणि शिफारसी प्रदान करते.
 5. तंबाखूमुळे दरवर्षी 7 दशलक्षहून जास्त लोकांचा मृत्यू होतो. बर्‍याच देशांनी तंबाखूची मागणी कमी करण्यासाठी प्रगत धोरणांची निर्मिती केली आहे, परंतु सरकार विशेषत: तंबाखू उत्पादनांच्या नियमनासह तंबाखूच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक कायदे लागू करू शकते.
 6. WHO फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन टोबॅको कंट्रोल (WHO FCTC) तंबाखू सेवन याविरुद्ध लढण्यासाठी WHO च्या अखत्यारीत स्थापन करण्यात आलेला वैश्विक करार आहे. याने तंबाखू नियंत्रणामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.
"टोबॅको प्रॉडक्ट रेग्युलेशन: बिल्डिंग लॅबोरेटरीज टेस्टिंग कपॅसिटी"
 1. दिशानिर्देशकांबाबत:-
 2. नवीन दिशानिर्देशकांचा WHO फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन टोबॅको कंट्रोल (WHO FCTC) च्या कलम 9 व 10 यांची अंमलबजावणी करण्यास अधिक पाठबळ पुरविणार, ज्यामधून सदस्य राज्यांमध्ये तंबाखूच्या उत्पादनांचे नियमन करण्यात योगदान मिळणार.
 3. या नवीन साधनांद्वारे देशांकरिता उपयुक्त तंबाखूच्या उत्पादनांच्या नियमनासाठी तरतुदी सादर करण्यास आणि तंबाखू उद्योगाचे 'शासन' समाप्त करण्यासाठी उपयुक्त स्त्रोत उपलब्ध करून देत आहे.
 4. यामधून तंबाखूच्या चाचण्या अंमलात आणण्यासाठी व्यावहारिक, टप्प्याटप्प्याने पध्दती प्रदान केल्या आहेत. अपुरी संसाधने असणार्‍या अनेक देशांमध्येही एक चाचणी सुविधा स्थापित करण्यासाठी हे दिशानिर्देश पाठबळ पुरवते.
 5. याच्या मदतीने तंबाखू उत्पादनांची कश्याप्रकारे तपासणी करावी याबाबत मार्गदर्शन मिळते. तसेच कोणत्या उत्पादनांची तपासणी करावी आणि नियमनाला समर्थन देण्यासाठी कश्या अर्थपूर्ण पद्धतीने चाचणीची माहिती वापरावी याबद्दल सुगम माहिती पुरविलेली आहे.
 6. तसेच विद्यमान अंतर्गत प्रयोगशाळेचा वापर करून, बाह्य प्रयोगशाळेशी करार करून एक चाचणी प्रयोगशाळा विकसित करण्यासाठी हे मार्गदर्शन देते आणि WHO आणि बाहेरील अश्या दोन्हीमध्ये उपलब्ध समर्थन यंत्रणा वापरण्याकरिता चरणबद्ध मार्गदर्शन प्रदान करते.


ISA-ADB, NDB, GCF, AfDB and AIIB joint financial partnership declaration

 1. आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) आणि आफ्रिका विकास बँक (AfDb), आशियाई विकास बँक (ADB), आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB), ग्रीन क्लायमेट फंड (GCF) आणि नवीन विकास बँक (NDB) यांनी संयुक्त वित्तीय भागीदारी घोषणापत्रावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.
 2. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) यांनी सुद्धा ISA सोबत एक संयुक्त भागीदारी घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे. या कराराचा उद्देश्य नवीनीकरण ऊर्जेच्या समर्थनात त्यांच्या मदतीला अधिक बळकट करणे आहे.
 3. ESA सौर ऊर्जेच्या 1000 हून अधिक गीगावॉटच्या तैनातीसाठी आणि सौर ऊर्जेत सन 2030 पर्यंत USD 1000 अब्जहून अधिक निधी जमविण्यासाठी काम करीत आहे.
 4. आशियाई विकास बँक (ADB):-
  1. ही एक क्षेत्रीय विकास बँक आहे, ज्याची स्थापना 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधील आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी केली गेली.
  2. ही बँक UN इकोनॉमिक कमीशन फॉर एशिया अँड फार ईस्ट (UNESCAP) आणि गैर क्षेत्रीय विकसित देशांच्या सदस्यांना सामावून घेते.
 5. आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB):-
  1. ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे आणि जानेवारी 2016 पासून ही सेवेत आहे.
  2. याचे मुख्यालय चीनची राजधानी बीजिंग येथे आहे.
  3. वर्तमानात जगभरात याचे 80 सदस्य आहेत.
  4. ही बँक आशियामधील पायाभूत सुविधांसंबंधी विकास प्रकल्पांसाठी आर्थिक मदत प्रदान करते.
 6. आफ्रिका विकास बँक (AfDb):-
  1. ही आफ्रिकेतल्या देशांच्या आर्थिक विकासासाठी आणि सामाजिक प्रगतीसाठी योगदान देण्यासाठी लास्टोन एम. द्वारा स्थापित एक बहुपक्षीय विकास वित्त संस्था आहे.
  2. AfDB ची 10 सप्टेंबर 1964 रोजी स्थापना झाली आणि त्यात तीन संस्थांचा समावेश आहे.
  3. ते आहेत - आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक, आफ्रिकन डेव्हलपमेंट फंड आणि नायजेरिया ट्रस्ट फंड.
  4. 1983 साली भारत AfDB मध्ये सहभागी झाले.
  5. याचे मुख्यालय ट्यूनिस, ट्युनिशिया येथे आहे. यात 78 देशांची सदस्यता आहे.
 7. नवीन विकास बँक (NDB) (पूर्वीची BRICS विकास बँक) :-
  1. ही BRICS राष्ट्रांद्वारे (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) स्थापन करण्यात आलेली बहुपक्षीय बँक आहे.
  2. 15 जुलै 2014 रोजी NDB ची स्थापना करण्यात आली.
  3. या बँकेचे पहिले आणि सध्या कार्यरत अध्यक्ष भारताचे के. व्ही. कामत हे आहेत. बँकेचे मुख्यालय शांघाय (चीन) येथे आहे.
  4. NDB उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी पुरविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आले आहे.
 8. ग्रीन क्लायमेट फंड (GCF):-
  1. हा कोष UNFCCC च्या कार्यचौकटी अंतर्गत विकसित करण्यात आला आहे, ज्यामधून हवामान बदलाशी जुळवून घेण्याकरिता आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पद्धतींसाठी विकसनशील देशांना मदत पुरवल्या जाते.
  2. याची सन 2010 मध्ये स्थापना करण्यात आली.
  3. याचे मुख्यालय दक्षिण कोरियातील इंचेऑनच्या न्यू सोंगदो जिल्ह्यात आहे.


 If the girl below the age of 12 is raped in Rajasthan, she will be hanged

 1. राजस्थान विधानसभेत 12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार अथवा सामूहिक बलात्कार करणाऱ्या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
 2. राजस्थान मध्यप्रदेशानंतर अशा प्रकारचा कायदा करणारे दुसरे राज्य ठरले आहे.
 3. भारतीय दंड विधेयक कलम 1860 मध्ये नवे कलम 376(क) जोडून 12 वर्षांपर्यंतच्या मुलींवर जो कोणी बलात्कार करेल त्यास फाशींच्या शिक्षेची अथवा कठोर तुरुंगवासाची (14 वर्षे ते आजीवन) तजवीज करण्यात आली आहे.
 4. सामूहिक बलात्कार प्रकरणी प्रत्येक व्यक्तीस फाशी अथवा कठोर तुरुंगवास, ज्याचा कालावधी 20 वर्षांपेक्षा कमी नसेल वा आजीवन कारावास असू शकेल.
 5. गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानात दरवर्षी सरासरी 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार होण्याची सरासरी 1300 हून अधिक प्रकरणे नोंदवली जातात.
 6. जानेवारी 2013 ते डिसेंबर 2017 पर्यंत राज्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कारांची 6519 प्रकरणे नोंदली गेली.


Vipalav Kumar Dev is the new chief minister of Tripura.

 1. 25 वर्षे सलग त्रिपुरावर राज्य करणाऱ्या डाव्यांची सत्ता उलथवण्यात यश आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे विप्लव देव त्रिपुराचे मुख्यमंत्री झाले आहेत.
 2. विप्लव देव यांनी आगरतळा येथे झालेल्या कार्यक्रमात पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी त्यांना शपथ दिली.
 3. मुख्यमंत्री :- विप्लव देव.
 4. उपमुख्यमंत्री :- जिष्णू देववर्मन.
 5. प्रमुख उपस्थिती :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह.
 6. त्रिपुरा विधानसभेत ६० जागापैकी भाजपला ३५ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपचे मित्रपक्ष जनजाती पार्टी आयपीएफटीला ८ जागा मिळाल्या आहेत.
 7. डाव्यांच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच भाजपचे दोन तृतियांश बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. सीपीएमला १६ जागा मिळाल्या असून काँग्रेसला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.


The Importance of Today's Day in History 12 march

 1. महत्वाच्या घटना:-
  1. १९११: कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला.
  2. १९३०: महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
  3. १९९३: मुंबई येथे १२ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार झाले, तर हजारो जखमी झाले.
  4. १९९९: सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.
  5. २००१: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जन्म:-

जन्म
 1. १८२४: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव किरचॉफ यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १८८७)
 2. १८९१: अभिनेते आणि निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म.
 3. १९११: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा जन्म. (जन्म: १२ ऑगस्ट १९७३)
 4. १९१३: भारताचे ५वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९८४)
 5. १९३३: लेखिका कविता विश्वनाथ नरवणे यांचा जन्म.

मृत्यू:-

मृत्यू
 1. १९४२: जर्मन अभियंते आणि उद्योजक रॉबर्ट बॉश यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १८६१)
 2. १९६०: भारतीय इतिहासकार क्षितीमोहन सेन यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १८८०)
 3. १९९९: प्रसिध्द व्हायोलिनवादक आणि वाद्यवृंद संचालक यहुदी मेनुहिन यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल१९१६)
 4. २००१: अमेरिकन लेखक रॉबर्ट लुडलुम यांचे निधन. (जन्म: २५ मे १९२७)


Top