India: The world's second largest importer of weapons in the arms world

 1. स्टॉकहोम (स्वीडन) येथील 'स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट' (SIPRI) या जागतिक शस्त्रास्त्रे व्यापाराच्या क्षेत्रात काम करणाऱ्या वैचारिक संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, सन "2014-18” या काळात भारत हा शस्त्रास्त्रांचा जगातला द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा आयातदार देश ठरला आणि जागतिक पातळीवर त्याचा 9.5% वाटा होता.
 2. 'ट्रेंड्स इन इंटरनॅशनल आर्म्स ट्रान्सफर-2018' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, सौदी अरब हा आता सर्वात मोठा आयातदार देश बनला आहे.
 3. शस्त्रास्त्रे आणि लष्करी उपकरणे यांची आयात कमी केल्यानंतर भारत याबाबतीत मागे पडला आहे.
 4. भारत दशकापासून पाच प्रमुख आयातदारांपैकी एक आहे.
 5. ताज्या अहवालानुसार, सन 2011-2015 या कालावधीत अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि चीन हे पाच शस्त्रास्त्रांचे सर्वात मोठे निर्यातदार होते.
 6. अमेरिका आणि रशिया यांचा निर्यातीत अनुक्रमे 36% आणि 21% वाटा होता.


Mohamed Shatayeh: The new Prime Minister of Palestine

 1. पॅलेस्टाईन अथॉरिटीचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी पॅलेस्टाईनच्या पंतप्रधान पदी मोहम्मद शताएह यांची नियुक्ती केली आहे.
 2. ही नियुक्ती निवृत्त झालेल्या रामी हमदल्लाह यांच्या जागी झाली आहे.
 3. पॅलेस्टाईन हा मध्यपूर्वेमधील भूमध्य समुद्र व जॉर्डन नदीच्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे.
 4. देशाच्या सीमेवरून या प्रदेशाचा इस्राएलसोबत दीर्घकाळापासून वाद सुरू आहे.
 5. 1993 सालाच्या ओस्लो कराराच्या परिणामस्वरूप, पॅलेस्टाईन नॅशनल अथॉरिटी गाझा-जेरिको कराराच्या आधी 1994 सालीच स्थापन करण्यात आलेले अंतरिम स्वयं-सरकारी मंडळ आहे.
 6. वेस्ट बॅंकेच्या क्षेत्र-ए आणि क्षेत्र-बी तसेच गाझा पट्टी या प्रदेशांचे प्रशासन सांभाळण्यासाठी 1994 साली गाझा-जेरिको करार (कैरो करार) केला गेला.


'World Wide Web' has completed 30 years

 1. दिनांक 12 मार्च 2019 रोजी संगणक जगतातल्या सर्वाधिक महत्त्वाच्या ‘वर्ल्ड वाइड वेब’ (WWW) या मंचाला 30 वर्ष पूर्ण झाली.
 2. WWW चा इतिहास:-
  1. ब्रिटिश संगणक शास्त्रज्ञ टिम बर्नेर्स-ली यांनी ‘वर्ल्ड वाइड वेब’ (WWW) याची रचना केली.
  2. 1989 साली WWWची स्थापना झाली. हा आधुनिक मानवजातीच्या प्रगत तंत्रज्ञानाचा एक महान विकास आहे.
  3. 1989 साली 33 वर्षांच्या बर्नर्स-ली यांनी ENQUIRE या यंत्रणेचा संदर्भ घेऊन "मेष (Mesh)" नावाच्या प्रणालीसाठी स्वित्झर्लंडमधील CERN (युरोपियन ऑर्गनाइझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च) येथे व्यवस्थापनासाठी ‘इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट: ए प्रोपोजल’ या शीर्षकाखाली एक प्रस्ताव दिला होता.
  4. सुरुवातीला, CERN येथील एकाधिक संगणकांमध्ये माहिती सामायिक करण्यासाठी बर्नर्स-ली यांनी मेष नावाने टाइप्ड लिंक्ससह एक मोठ्या हायपरटेक्स्ट डेटाबेसची कल्पना मांडली.
  5. त्यांनी HTML, HTTP आणि वर्ल्ड वाइड वेब या प्रोग्रामिंग लॅंगवेजवर आधारित एक मॉडेल विकसित केले. 
  6. पुढे 1991 सालापर्यंत ही यंत्रणा बाह्य वेब सर्व्हरच्या माध्यमातून प्रसारित झाली.


All women astronauts will be 'spacewalk' for the first time on March 29

 1. इतिहासात पहिल्यांदाच, दिनांक 29 मार्च 2019 रोजी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेनी आपल्या दोन महिला अंतराळवीरांचा ‘स्पेसवॉक’ (अंतराळात यानाशिवाय भ्रमण करणे) आयोजित करण्याचे ठरविले आहे.
 2. या मोहिमेदरम्यान अॅनी मॅक्लेन आणि क्रिस्टीना कोच या अंतराळात भ्रमण करणार आहेत.
 3. ही मोहीम कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA) याच्या फ्लाइट कंट्रोलर क्रिस्टन फॅसिओल यांच्याकडून व्यवस्थापित केली जाणार आहे. या मोहिमेत निक हेग देखील सामील होतील.
 4. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) येथे आधीपासूनच नियोजित असलेल्या तीन स्पेसवॉकच्या शृंखलेतली ही द्वितीय मोहीम आहे.
 5. 29 मार्चला आयोजित करण्यात आलेला हा स्पेसवॉक सात तास चालणार आहे.
 6. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS):-
  1. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हे पृथ्वीच्या खालच्या अंतराळ कक्षेत 400 किलोमीटर आकाशात तरंगणारे एक अंतराळ स्थानक आहे.
  2. या कृत्रिम उपग्रहावर मानवाचा अधिवास शक्य झाला आहे. 1998 साली या बहू-राष्ट्रीय प्रकल्पाचा पहिला भाग अंतराळात पाठवण्यात आला.
  3. ISS वर सध्या अमेरिका, रशिया, कॅनडा आणि जपान या देशांचे अंतराळवीर कार्यरत आहेत.


Guided 'Pinaka' fireworks test successful

 1. दिनांक 11 मार्च 2019 रोजी भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेनी (DRDO) पोखरणच्या चाचणी क्षेत्रात स्वदेशी विकसित केल्या गेलेल्या मार्गदर्शित ‘पिनाका’ (PINAKA) अग्निबाणाची चाचणी यशस्वीपणे पार पाडली.
 2. 70 किलोमीटर दूरवरचे लक्ष्य भेदू शकणारे ‘पिनाका’ (PINAKA) अग्निबाण मार्गदर्शित आहे.
 3. पुण्यातले शस्त्रनिर्मिती संशोधन व विकास आस्थापना (ARDE), हैदराबाद येथील DRDOचे रिसर्च सेंटर इमारत (RCI) आणि संरक्षण संशोधन व विकास प्रयोगशाळा (DRDL) यांनी संयुक्तपणे याचा विकास केला.
 4. पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर (MBRL) मधून सोडण्यात येते.
 5. हे अग्निबाण अत्याधुनिक मार्गदर्शक आणि नियंत्रण प्रणालीने सुसज्जित आहे.


Top