jack ma will retire from alibaba

 1. जगातील सर्वांत श्रीमंतांपैकी एक असलेले जॅक मा पुढील वर्षी 'अलिबाबा' कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहेत.
 2. मा. यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल झॅंग यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे.
 3. कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून मा वर्षभर कायम राहणार आहेत. मा यांनी त्यांच्या 54 व्या वाढदिवशी आपला उत्तराधिकारी जाहीर केला.
 4. झँग हे 46 वर्षांचे असून, ते 10 सप्टेंबर 2019 मध्ये कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. झॅंग यांच्याकडे पूर्ण सूत्रे सुपूर्द करेपर्यंत मा कार्यकारी अध्यक्षपदी राहतील.
 5. कार्यकारी अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतर मा संचालक मंडळावर कायमस्वरूपी सदस्य म्हणून 2020 पर्यंत राहणार आहेत.
 6. सुरवातीच्या काळात इंग्रजीचे शिक्षक असलेले मा यांनी 'अलिबाबा'ला 420 अब्ज डॉलरची कंपनी बनविले.
 7. व्यावसायिक जबाबदारीतून मुक्त होऊन मा आता सामाजिक कार्याकडे वळणार आहेत. ते प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रावर भर देणार आहेत.


NONE OF THE ABOVE OPTION CANCEL FROM LOWER HOUSE

 1. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमधील मतदान पत्रिकेवरील नोटाचा पर्याय काढून टाकण्याची घोषणा ११ सप्टेंबर रोजी केली.
 2. सर्वोच्च न्यायालयाने राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमधील मतदान पत्रिकेवर आदेश नोटाचा पर्याय प्रकाशित न करण्याचे आदेश जारी केले आहेत.
 3. तर लोकसभा आणि विधानसभा यासारख्या थेट निवडणुकांमध्ये नोटाचा पर्याय वापरण्यास परवानगी दिली आहे.
 4. नोटा (NOTA) म्हणजे ‘None Of The Above’ (वरीलपैकी कोणीही नाही) या इंग्रजी शब्द समूहाचे संक्षिप्त रूप होय.
 5. एखाद्या विशिष्ट निवडणुकीत पात्र मतदारातर्फे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरून मतदान करताना हा पर्याय वापरण्याची भारतात मुभा आहे.
 6. निवडणुकीत यादीतील उमेदवारांपैकी कोणत्याही उमेदवाराला मत द्यावयाचे नसल्यासनोटा पर्यायाचा उपयोग केला जातो.
 7. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २०१३मध्ये भारतात नोटाची सुरूवात झाली. नोटाचा पर्याय उपलब्ध करून देणारा भारत जगातील १४वा देश आहे.


Yogesh kumar appointed as 14 cadre new head

 1. पूर्व-पश्चिमी लडाखच्या संरक्षणाची जबाबदारी असणाऱ्या लष्कराच्या १४ कोअरचे प्रमुखम्हणून लेफ्टनंट जनरल योगेश कुमार जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. १४ कोअरवर जगातील सर्वात उंचावरील रणभूमी अर्थात सियाचीन, कारगिल, पूर्व-पश्चिमी लडाखच्या संरक्षणाची जबाबदारी आहे.
 3. एकीकडे पाकिस्तानची नियंत्रण रेषा, तर दुसरीकडे चीनलगतची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अशा दोन्ही आघाड्यांवर कोअरला सजग राहावे लागते.
 4. त्यांनी या क्षेत्रात पूर्वी ब्रिगेड आणि डिव्हिजनचे नेतृत्व केले आहे. याआधी ते महानिरीक्षक (पायदळ) या पदावर कार्यरत होते.
 5. तसेच लष्करी मुख्यालयात लष्करी कार्यवाही विभागाची जबाबदारी त्यांनी काही काळ सांभाळली आहे.
 6. सीमावाद सोडविण्यासाठी चीन-भारत यांच्यात सुरू असलेल्या चर्चेत भारतीय शिष्टमंडळामध्येही जोशी यांचा अनेकदा सहभाग राहिला.
 7. कारगिल युद्धात शत्रूने बळकावलेला प्रदेश ताब्यात घेण्यात १३व्या जम्मू-काश्मीर रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर असलेल्या जोशी यांनी महत्त्वाची कामगिरी केली होती.
 8. त्यांच्या या बटालियनच्या कामगिरीचा ‘शुरांमधील शूरवीर’ म्हणून गौरव झाला होता. तसेच बटालियनला २ परमवीरचक्र, ८ वीरचक्र, १४ सेना पदके प्राप्त झाली.
 9. कारगिल युद्धातील कामगिरीबद्दल जोशी यांना ‘वीरचक्र’ देण्यात आले. तत्पूर्वी त्यांचा सेना पदक, अतिविशिष्ट सेवा पदकाने गौरव झाला होता.


yudh abhyas excercise between india and america

 1. भारत आणि अमेरिकेच्या ‘युद्ध अभ्यास २०१८’ या संयुक्त लढाऊ युद्ध सरावाचे आयोजन १६ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर दरम्यान उत्तराखंडमध्ये केले जाणार आहे.
 2. भारत आणि अमेरिका यांच्यादरम्यान झालेल्या २+२ चर्चेनंतर हा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 3. दोन्ही देशांमधील अशा प्रकारचा हा १४वा संयुक्त लष्करी सराव असेल. या सरावाला २००४मध्ये सुरुवात झाली.
 4. दोन्ही देश एक एक करून प्रतिवर्षी या सरावाचे आयोजन करतात. गेल्यावर्षी अमेरिकेतील लुईस-मॅककार्डमध्ये या सरावाचे आयोजन करण्यात आले होते.
 5. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये दहशतवादविरोधी कारवायातील कार्यक्षमता वाढविणे, हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.
 6. ‘युद्ध अभ्यास २०१८’अंतर्गत दोन्ही देशांचे सैन्य डोंगराळ प्रदेशात दहशतवाद आणि घुसखोरीविरोधी कारवायांचा संयुक्तरीत्या अभ्यास करतील.
 7. यावर्षी ‘युद्ध अभ्यास’मध्ये बटालियन स्तरावरील तसेच विभागीय स्तरावरील कमांड पोस्टचा अभ्यास केला जाणार आहे.
 8. या सरावात दोन्ही देशांतील प्रत्येकी सुमारे ३५० सैनिक सहभागी होतील. यापूर्वी यात फक्त २०० सैनिक भाग घेत होते. भारतातर्फे १५ गढवाल रायफल्स बटालियन या सरावात सहभागी होणार आहे.


Top