India ranked 130th in the Economic Freedom Index

 1. अमेरिकेच्या ‘द हेरिटेज फाउंडेशन’ या वैचारिक संस्थेकडून प्रसिद्ध अहवालानुसार, सन 2018 मध्ये आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारतात अत्याधिक सुधारणा दिसून आली आहे.
 2. नव्या सरकारच्या आर्थिक सुधारणांचा भविष्यावर सकारात्मक प्रभाव दिसून येण्याची अपेक्षा आहे.
आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक
 1. ठळक बाबी:-
 2. 180 देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत 54.5 अंकांनी 130 व्या स्थानी आले आहे. सन 2017 मध्ये भारताचा क्रमांक 143 होता.
 3. भारताचे शेजारी पाकिस्तान 131 तर चीन 110 क्रमांकावर आहे.
 4. आशिया-प्रशांत क्षेत्राच्या अहवालामध्ये भारताला 30 वे स्थान मिळाले आहे. यामध्ये क्षेत्राच्या 43 देशांच्या धोरणांचा आढावा घेण्यात आला आहे.
 5. एका वर्षात भारताच्या आर्थिक स्वातंत्र्य गुणात 1.9 ने झालेली वाढ हे दर्शवते की ही सुधारणा प्रभावी न्यायप्रणाली, व्यवसाय स्वातंत्र्य, सरकारी एकात्मता आणि वित्तीय आरोग्य यांमध्ये झालेली आहे.
 6. 1990 सालच्या सुरुवातीस लागू औद्योगिक नियंत्रणमुक्त करणे, सरकारी उपक्रमांचे खाजगीकरण करणे आणि परदेशी व्यापार आणि गुंतवणुकीवरील नियंत्रणे यांच्या समावेशासह आर्थिक उदारीकरणाच्या उपाययोजनांमुळे आर्थिक वृद्धीला वेग आला.
 7. भ्रष्टाचार, अविकसित पायाभूत सुविधा, प्रतिबंधात्मक आणि कठोर नियामक वातावरण आणि गरीब आर्थिक आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापनाने संपूर्ण विकासाला आळा घालणे सुरूच ठेवले आहे.
 8. सरकारी मालकीच्या संस्था वित्तीय क्षेत्रावर वर्चस्व गाजवतात आणि विदेशी सहभाग मर्यादित आहे. सार्वजनिक-क्षेत्रातील बँकांमध्ये, अकार्यक्षम मालमत्ता एकूण मालमत्तेच्या सुमारे 10% आहे.


 India's first MIMO laboratory in IIT Delhi

 1. 5G सेलुलर दळणवळण तंत्रज्ञानावर भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) दिल्लीमध्ये मोठ्या पातळीवर कार्याला सुरुवात केली जात आहे.
 2. त्यासाठी मॅसिव मल्टीपल-इनपुट मल्टीपल-आउटपुट (MIMO) तंत्रज्ञानावर देशाची पहिली रेडियो प्रयोगशाळा उभारली जात आहे. ही प्रयोगशाळा 13 एप्रिलला उघडली जाणार आहे.
 3. ही प्रयोगशाळा IIT च्या भारती स्कूल ऑफ टेलिकम्यूनिकेशन टेक्नॉलजी अँड मॅनेजमेंट मध्ये प्रस्थापित केली जात आहे. या ठिकाणी 5G सेंटर ऑफ एक्सिलेंस अँड डिजिटल इनोव्हेशन्स लॅबोरेटरीज देखील आहे.
 4. या ठिकाणी संपर्क क्षेत्रात विविध विषयावर संशोधन चालविले जाणार आहे.
 5. MIMO तंत्रज्ञानामुळे शरीरास हानिकारक असलेल्या तरंगोत्सर्जन (radiation) याला रोखण्यास मदत होणार आहे.
 6. मोबाइल टर्मिनलला एकाच वारंवारीतेमध्ये एकाच वेळी नेटवर्क मिळणार आहे.
 7. या यंत्रणेमध्ये 3G आणि 4G च्या तुलनेत 10 पटीने कमी तरंगोत्सर्जन (radiation) होणार आहे. त्यामुळे आरोग्याचे नुकसान कमी होणार आहे.


 The 'Quest' initiative of Maharashtra Government for tribal welfare

 1. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाद्वारे तयार केलेल्या ‘क्वेस्ट’ (क्वालिटी इवॅल्यूएशन फॉर सस्टेनेबल ट्रान्सफॉर्म) कार्यालय या नाविन्यपूर्ण, नियोजन व मूल्यमापन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
 2. महाराष्ट्र शासनातर्फे आखण्यात आलेल्या विकासनिधी व योजनांचे नियोजन, नियंत्रण व मूल्यमापन नवनिर्मित ‘क्वेस्ट’ केंद्राद्वारे केले जाणार आहे.
 3. आदिवासी समुदायाच्या लोकांचा विकास करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.
 4. शासकीय योजनांचे संनियंत्रण, मूल्यमापन करणारे ‘क्वेस्ट’ केंद्र हे देशातील पहिले केंद्र आहे.
 5. हे केंद्र आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत मुंबईत स्थापन केले असून, त्याचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे.


 Balram Bhargava: The new Director General of ICMR

 1. AIIMS प्रा. बलराम भार्गव यांची भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) महासंचालक आणि आरोग्य संशोधन विभागाचे सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. प्रा. भार्गव सध्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) येथे प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार कार्डिओलॉजिस्ट आहेत.
 3. त्यांची ही नियुक्ती तीन वर्षांकरिता किंवा वयाच्या 60 वर्षांपर्यंत केली गेली आहे.
 4. याशिवाय, प्रसिद्ध शास्त्रज्ञ रेणू स्वरूप यांना जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव पदी नियुक्त करण्यात आले आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)
 1. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) याची स्थापना 1911 साली करण्यात आली.
 2. जी जगातल्या सर्वात जुन्या वैद्यकीय संशोधन संस्थांपैकी एक आहे.
 3. याचे नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे.
 4. ITBRC सार्वजनिक आणि खाजगी संस्थांसोबत कार्य करीत आहे.
 5. जे जागेवरच निदान, कमी उपचार प्रक्रिया आणि क्षयरोगासाठी एक प्रभावी लस विकसीत करण्यासाठी देशातील शोध प्रयत्नांचे संचालन करीत आहे.


Top