12 ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा 

 1. 12 ऑगस्ट 2017 रोजी "यूथ बिल्डिंग पीस" या संकल्पनेखाली ‘आंतरराष्ट्रीय युवा दिवस 2017’ साजरा करण्यात आला आहे.
 2. संघर्षाच्या परिस्थितीला प्रतिबंध करून त्यामध्ये परिवर्तन घडविण्यामधील तसेच सहभाग, सामाजिक न्याय आणि शाश्वत शांतीसाठी तरुणाईच्या योगदानासाठी हा दिवस समर्पित करण्यात आला होता.
 3. 2030 शाश्वत विकास उद्देशांमधील ‘लक्ष्य-16’ हे सर्व स्तरावर प्रतिसादात्मक, समावेशक, सहभाग आणि प्रतिनिधीत्व या दृष्टीने निर्णय घेण्याचे सुनिश्चित करणे आहे. युवांना ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी धोरणात्मक कृती आराखडा  आणि व्यावहारिक मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ‘वर्ल्ड प्रोग्राम ऑफ अॅक्शन फॉर यूथ’ दस्तऐवज तयार करण्यात आले आहे.
 4. या दस्तऐवजामध्ये प्राधान्य असलेल्या 15 क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. ते आहेत – शिक्षण, रोजगार, उपासमार आणि गरिबी, आरोग्य, पर्यावरण, औषधीचे दुरुपयोग, किशोरवयीनसंबंधी अपराध, खाली वेळत केली जाणारी कृत्ये, मुली आणि तरुण स्त्रिया, सहभाग, जागतिकीकरण, माहिती व दळणवळण तंत्रज्ञान, HIV/AIDS, युवा आणि संघर्ष, पिढिंमधील संबंध.

 पार्श्वभूमी:-

 1. आंतरराष्ट्रीय युवा दिवस (International Youth Day -IYD) दरवर्षी 12 ऑगस्ट तारखेला साजरा करण्यात येतो.
 2. वर्ष 1985 ला प्रथम ‘आंतरराष्ट्रीय युवा वर्ष’ घोषित केले गेले. ‘आंतरराष्ट्रीय युवा दिवस’ साजरा करण्याची संकल्पना प्रथम लिस्बन येथे 8-12 ऑगस्ट 1998 या काळात झालेल्या युवांसाठी जबाबदार असलेल्या मंत्र्यांच्या जागतिक परिषदेत मांडली गेली होती.
 3. त्यानंतर 17 डिसेंबर 1999 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत ठराव 54/120 मंजूर करून दरवर्षी 12 ऑगस्ट या तारखेला ‘आंतरराष्ट्रीय युवा दिवस’ साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
 4. 2000 साली पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला. या दिवशी सरकार युवासंबंधित मुद्द्यांबाबत जागृती निर्माण करते आणि प्रोत्साहन देते. यानंतर 2015 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने शाश्वत विकासामध्ये युवांचा सहभाग वाढविण्यासाठी S/RES/2250 (2015) ठराव मंजूर केला आणि 2016 साली संघर्ष काळात युवांची भूमिका स्पष्ट करणारा S/RES/2282 (2016) ठराव मंजूर केला.


जागतिक हत्ती दिवस निमित्ताने 'गज यात्रा' चे उद्घाटन

केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते 12 ऑगस्ट 2017 रोजी ‘गज यात्रा’ अभियानाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

जागतिक हत्ती दिवसाच्या निमित्ताने हत्तींच्या संवर्धनासाठी हे राष्ट्रव्यापी अभियान सुरू करण्यात आले आहे. हे अभियान हत्तींचा अधिवास असलेल्या 12 राज्यांमध्ये चालवले जाणार आहे.

अभियानासंबंधी:-

 1. हत्तीच्या विषयावर आधारित कलाकार आणि कारागीर यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि रोड शो आयोजित केल्या जाणार आहे.
 2. मंत्रालयाने वर्ष 2012 मध्ये प्रसिद्ध केलेले ‘गजु’ नामक बोधचिन्ह (mascot) या अभियानाचा प्रचार करणार.
 3. हे अभियान वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया (WWF-भारत) द्वारा चालवले जाणार आहे.

याप्रसंगी प्रसिद्ध करण्यात आलेले दस्ताऐवज:-

 1. हत्तींसाठी अखिल भारतीय जन-गणना 2017 प्रसिद्ध करण्यात आली. शिवाय हत्तींसाठी राइट ऑफ पॅसेज दस्ताऐवज तयार करण्यात आले, जे भारतात हत्तींच्या मार्गिकेबाबत माहिती प्रदान करते.
 2. ENVIS केंद्र, WWF-भारत, प्रोजेक्ट एलिफेंट डिविजन आणि पर्यावरण मंत्रालय यांनी तयार केलेले संसदीय प्रश्नोत्तरावर आधारित ‘ग्लिम्पसेस ऑफ इनीशिएटिव टेकन फॉर एलिफेंट कन्जर्वेशन इन इंडिया (2012-2017)’ दस्तऐवज प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये पर्यावरणसंबंधी विभिन्न मुद्द्यांचे विवरण आहे.

जागतिक हत्ती दिवस:-

 1. जागतिक हत्ती दिवस दरवर्षी 12 ऑगस्ट या तारखेला साजरा केला जातो. हत्तींच्या संरक्षणार्थ हा दिवस साजरा केला जातो. याप्रसंगी त्यांच्या जागतिक संख्या, संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
 2. याशिवाय, हत्तींचे संरक्षण, बेकायदेशीर शिकार आणि तस्करीला आळा घालणे, हत्तींवर गुणवत्तापूर्ण उपचार करणे आणि सोडवलेल्या हत्तींचे पुनर्वसन करणे याविषयी जागरूकता प्रदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
 3. ‘IUCN रेड लिस्ट’ मध्ये अफ्रीकन हत्तीला ‘धोक्यात असलेले हत्ती’ व एशियन हत्तीला ‘लुप्त होत असलेले’ या श्रेणीत सामील केले आहे. आज जगात फक्त 400,000 अफ्रीकन हत्ती आणि 40,000 एशियन हत्ती आहेत.


Top