Only 31% of Indians have their own health insurance: a report

 1. एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अर्ध्याअधिक लोकांना वैद्यकीय आवश्यकतेमुळे "आर्थिक संकटाचा" सामना करावा लागलेला असूनही केवळ 31% भारतीयांकडे त्यांच्या नियोक्ताद्वारा प्रदान केल्या गेलेल्या विम्याव्यतिरिक्त वेगळा आरोग्य विमा आहे.
 2. बहुतेक भारतीय आरोग्य विमा घेण्याच्या तुलनेत वाहन किंवा जीवन विमा घेणे पसंत करतात.
 3. याचे हे कारण होते की, बहुतेक भारतीयांनी विमा नसल्यामुळे झालेल्या कित्येक अत्याधिक खर्चाचा बरोबर अंदाज लावू शकलेले नाहीत आणि ते याला केवळ कर लाभाच्या दृष्टिकोनातून बघत आहेत.
 4. तसेच ज्या लोकांकडे आरोग्य विमा होता, त्यामधील बहुतेक लोकांकडे 2 लाख रुपयापेक्षा कमीचा लाभ दिला गेला होता, जो हार्ट ट्रान्सप्लांट सारख्या गंभीर समस्यांसारख्या अनेक प्रकरणात ग्राह्य नव्हता.
 5. काही लोकांकडे अनेक विमे होते. सर्वेक्षणामधील 41% लोकांकडे जीवनविमा आणि 37% लोकांकडे त्यांच्या वाहनाचा विमा होता.
 6. वर्ष 2015-16 दरम्यान आरोग्य विम्याखाली येणारी लोकसंख्या 36 कोटीच्या घरात होती, जी की इंडियन ब्रॅंड इक्विटी फाउंडेशनच्या अनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 30% आहे.
 7. भारतीय हा स्वत:कडून आरोग्य खर्चाचा मोठा अंश खर्च करण्यासाठी देखील ओळखला जातो.
 8. 2014 साली भारताच्या आरोग्य खर्चाचा 89% भाग हा परवडण्याच्या पलीकडचा होता, जो तुलनेनी वैश्विक सरासरीच्या 18% होता.
 9. सर्व केंद्र पुरस्कृत योजनांपैकी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सर्वांत अधिक पसंतीस उतरली.
 10. राष्ट्रीय आरोग्य विमा योजना (RSBY) दारिद्र्यरेषेखालील (BPL म्हणजे शहरी भागात दररोज 33 रुपये आणि ग्रामीण भागात 27 रुपये खर्च करण्याची क्षमता असलेले) पाच व्यक्तींच्या कुटुंबासाठी 30,000 रुपयांपर्यंत वैद्यकीय विमा देते. 


During the year 2017-18 to 2019-20, the program will be organized by 'Play India'

 1. वर्ष 2017-18 ते वर्ष 2019-20 या कालावधीत ‘खेलो इंडिया’ कार्यक्रम पुन्हा एकदा राबवल्या जाणार आहे.
 2. वर्ष 2017-18 ते वर्ष 2019-20 या कालावधीसाठी ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमांतर्गत 1,756 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
 3. भारतीय क्रीडा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निवडक संस्थांमधून दरवर्षी 1,000 गुणवंत तरुण खेळाडूंची निवड केली जाणार आणि निवडलेल्या प्रत्येक खेळाडूला सलग 8 वर्षांसाठी 5 लाख रूपयांची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाणार.
 4. क्रीडा स्पर्धा आणि शिक्षण अश्या दोन्ही प्रकारे खेळाडूंना सहभाग घेता येईल अश्या देशभरातल्या 20 विद्यापीठांना सर्वोत्कृष्ट क्रीडा केंद्र म्हणून प्रोत्साहन देणार.
 5. मोठ्या राष्ट्रीय शारीरिक आरोग्यसंबंधी कार्यक्रमामधून 10-18 वर्षे वयोगटातील 200 दशलक्ष लहान मुला-मुलींना या कार्यक्रमात समाविष्ट केले जाईल.
 6. एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ ही नवीन योजना सुरू केली होती.

सुरुवातीच्या काळात या योजनेत

 1. मैदानी खेळ,
 2. वॉलीबॉल,
 3. कबड्डी,
 4. फुटबॉल,
 5. जूडो,
 6. हॉकी,
 7. बॉक्सिंग,
 8. टेबल टेनिस,
 9. बास्केट बॉल
 10. आणि कुस्ती

या खेळांचा समावेश करण्यात आला होता आणि पुढे त्याची व्याप्ती इतर खेळांसाठी वाढविण्यात आली आहे.


Australia - Winner of Hockey World League Final

 1. भुवनेश्वर (ओडिशा) येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने अर्जेंटीनाचा पराभव करत हॉकी वर्ल्ड लीग अंतिम स्पर्धा जिंकली.
 2. स्पर्धेच्या कांस्यपदकाचा मानकरी भारतीय संघ ठरलेला आहे.
 3. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव केला.

स्पर्धेचे इतर पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत -

 1. टॉप गोलस्कोअरर - बेल्जियमचा लोएक ल्यूएपर्ट
 2. प्लेयर ऑफ द टूर्नामेंट - जर्मनीचा माट्स ग्रॅमबश
 3. गोलकीपर ऑफ द टूर्नामेंट – अर्जेंटिनाचा जुआन मॅन्युएल विवाल्दी
 4. यंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट - बेल्जियमचा व्हिक्टर वेग्नेझ

हॉकी वर्ल्ड लीग ही आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) द्वारा आयोजित केली जाणारी आंतरराष्ट्रीय क्षेत्रीय हॉकी स्पर्धा आहे.

ही स्पर्धा दर दोन वर्षांच्या कालावधीत आयोजित केली जाते.

हॉकी विश्वचषक (पुरुष आणि महिला) आणि ऑलंम्पिक खेळांसाठी पात्रता स्पर्धा आहे.


Pvt. M. S. Swaminathan received 'Yerrarringer' award

 1. भारत सरकारकडून प्राध्यापक एम. एस. स्वामिनाथन यांना ‘येरारिंगन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
 2. भारतीय कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविणारे व्यक्तित्व म्हणून प्राध्यापक एम. एस. स्वामिनाथन यांना ओळखले जाते.
 3. भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हणूनही ओळखले जाते.
 4. त्यांच्या नेतृत्वात नवीन कृषी धोरणाचा अवलंब केला.
 5. उच्च उत्पन्न देणारे विविध बियाणे व रासायनिक खतांचा वापर केला.
 6. त्यामुळे 1960 साली भारताने कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ नोंदवली होती.
 7. त्यांनी डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्यासोबत गव्हाच्या उच्च उत्पन्न देणार्‍या जाती विकसित करण्याचे काम केले.


Vyas Samman 2017 Hindi writer Mamta Kalia has announced

 1. हिंदी लेखिका ममता कालिया यांना व्यास सन्मान 2017 घोषित केला.
 2. हिंदी साहित्यकार ममता कालिया यांची वर्ष 2017 चा ‘व्यास सन्मान’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
 3. के.के. बिडला फाउंडेशनच्या निवड समितीने त्यांच्या ‘दुक्खम-सुक्खम’ कादंबरीसाठी 27 वा व्यास सन्मान देण्याचा निर्णय घेतला.
 4. के.के. बिडला फाउंडेशनतर्फे व्यास सन्मान दिला जातो.
 5. हा पुरस्कार दहा वर्षांच्या कालावधीत हिंदी भाषेत प्रकाशित सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीला दिला जातो.
 6. 1991 साली पहिला व्यास सन्मान डॉ. राम विलास शर्मा यांना दिला गेला.
 7. पुरस्कार म्हणून 3.5 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते.


Dr. Babasaheb Ambedkar International Center started

 1. गेल्या पंचवीस वर्षांपासून रेंगाळलेले दिल्लीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र ७ डिसेंबर रोजी सुरु झाले आहे.
 2. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजधानी दिल्लीतील हे पहिलेच स्मारक आहे.
 3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रही पुढाकाराने केवळ ३२ महिन्यांमध्ये ही वास्तू साकारली आहे. २० एप्रिल २०१५रोजी मोदींनी या वास्तूचे भूमिपूजन केले होते.
 4. ‘१५, जनपथ’ असा तिचा पत्ता असून प्रसिद्ध ‘ल मेरिडियन’ या पंचतारांकित हॉटेलला खेटून ही वास्तू आहे.
 5. या केंद्राला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा देण्याची शक्यता असून सामाजिक विषयांसाठी हे केंद्र सरकारसाठी ‘थिंक टँक’ असू शकते.
 6. दलित, आदिवासी, अन्य मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक आदींच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे हे केंद्र बनविण्याचा सरकारचा विचार आहे.
 7. बाबासाहेबांनी देशाला राज्यघटना दिली; पण त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करणारी एकही वास्तू राजधानीत नव्हती.
 8. ही बाब हेरून बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये (१९९०-९१) ‘लुटेन्स दिल्ली’मधील ‘जनपथ’ मार्गावर त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी घेतला होता. 

आंतरराष्ट्रीय केंद्र:- 

 1. जागा : ३.२ एकर
 2. खर्च : १९५ कोटी
 3. बांधण्याचा कालावधी : ३२ महिने
 4. दहा हजार पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय, ‘ई-लायब्ररी’च्या माध्यमातून दोन लाख पुस्तके आणि ७० हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय मासिके, जर्नल्स उपलब्ध.
 5. सातशे क्षमतेचे एक भव्य सभागृह आणि प्रत्ये की शंभर क्षमतेची दोन छोटेखानी सभागृहे.
 6. दर्शनी भागात आंबेडकर आणि ध्यानस्थ बुद्ध अशा दोन भव्य पुतळे आहेत.
 7. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचे चिरंजीव अनिल यांनी हे पुतळे साकारलेत.
 8. सत्तर फुटांचा अशोक स्तंभदेखील कोरलाय. कदाचित तो देशातील सर्वांत उंच ठरावा.
 9. वास्तूची दोन प्रवेशद्वारे सांची स्तूपाच्या तोरणासारखी आहेत.
 10. एकूण बुद्धिस्ट वास्तूशैलीचा प्रभाव आहे.


Top