SIDDHI SHIRKE CYCLING COMPETITION PUNE

 1. पुण्याच्या सिद्धी शिर्के हिने 64व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. तिने 14 वर्षांखालील मुलींच्या 500 मीटर टाइम ट्रायलमध्ये अव्वल स्थान पटकावले. सिद्धीचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले. तिने रोड सायकलिंगमध्ये 6 किलोमीटर टाइम ट्रायलमध्ये सुवर्णयश मिळवले होते.

 2. भारतीय क्रीडा प्राधिकरण, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने म्हाळुंगे-बालेवाडी येथील वेलोड्रम स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सिद्धी शिर्केने 45.110 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले.


 3. तामिळनाडूच्या एम. पूजा स्वेताने 47.610 सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक प्राप्त केले. तर महाराष्ट्रच्या सुहानी मोरेने 52.517

  सेकंदासह कांस्यपदकाची कमाई केली.

 4. 14 वर्षांखालील मुलांच्या 500 मीटर टाइम ट्रायलमध्ये झारखंडच्या नारायण महतोने (40.158 सेकंद) सुवर्णपदक प्राप्त केले. महाराष्ट्राच्या अथर्व पाटीलला (41.680 सेकंद) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. झारखंडच्या अर्णव श्री याने (41.830 सेकंद) कांस्यपदक मिळवले.


GREEN INDIA CHINA EFFORTS

 1. जास्त लोकसंख्येचे देश हे नेहमी पर्यावरणाची हानी करीत असतात, त्यामुळे जमिनीवरील हिरवाईचे क्षेत्र कमी होते, असा आतापर्यंतचा समज असला तरी अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेच्या एका अहवालाने तो खोटा ठरला आहे. 

 2. चीन व भारत या जास्त लोकसंख्या असलेल्या देशांनीच हिरवाई निर्माण करण्याच्या जागतिक उद्दिष्टात मोठे काम केले आहे असे अहवालात म्हटले आहे.

 3. जग हे वीस वर्षांपूर्वीपेक्षा जास्त हिरवे आहे, असाही निष्कर्ष त्यात काढण्यात आला आहे. नासाच्या उपग्रहांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधात मुख्य लेखक व बोस्टन विद्यापीठातील प्राध्यापक ची चेन यांनी म्हटले आहे, की जगातील एकतृतीयांश हिरवाई भारत व चीनमध्ये असून, जगातील हिरवाईखालील क्षेत्राचा 9 टक्के भाग या दोन्ही देशांत आहे.

 4. 11 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या शोधनिबंधात 2000-2017 या काळात नासाच्या उपग्रहांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे भारत व चीन या देशांत जगातील इतर पीक क्षेत्रापेक्षा हिरवाईचे पट्टे अधिक आहेत असे म्हटले आहे.


DIN VISHESH

 1. 13 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक रेडीओ दिन‘ आहे.

 2. स्पेनने सन 1668 या वर्षी पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.

 3. प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 मध्ये झाला होता.

 4. इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1894 मध्ये झाला.

 5. लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1911 रोजी झाला होता.


Top