India's 41st rank in 'EIU Democracy Index 2018'

 1. ब्रिटनमधील ‘इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिट’ (EIU) या संस्थेनी त्याचा वार्षिक ‘EIU लोकशाही निर्देशांक 2018’ प्रसिद्ध केला आहे. 
 2. यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत भारत 7.23 गुणांसह 41 व्या क्रमांकावर आहे.
 3. ठळक बाबी:-
  1. अहवालाच्या या वर्षीच्या अकराव्या आवृत्तीत हे दिसून येते की जगातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात राजकीय भागीदारी वाढत आहे.
  2. औपचारिक राजकीय संस्था स्पष्टपणे निरुपयोगी ठरत असल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळे जनतेने रोष कृतीत बदललेला आहे आणि बहुतेकांनी मतदानाकडे पाठ फिरवलेली आहे आणि निषेधात्मक आंदोलने चालवली जात आहेत.
  3. यात महिलांनी सर्वाधिक पुढाकार घेतला आहे. लोकशाहीवरील विश्वासाला तडा जाणे ही बाब या वर्षी सर्वाधिक प्रमाणात बिघडलेले असल्याचे दिसून येते.
  4. संपूर्ण आशिया-प्रशांत क्षेत्रामध्ये केवळ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड हे "संपूर्ण लोकशाही" गटात समाविष्ट करण्यात आलेले देश आहे. तर अमेरिका या प्रथम श्रेणीत स्थान मिळविण्यात अपयशी ठरले आहे.
 4. यादीमधील विविध गटातले शीर्ष देश:-
  1. प्रथम 20 देशांमधील (म्हणजेच संपूर्ण लोकशाही गटामधील) शीर्ष दहा देश – नॉर्वे (9.87), आइसलँड (9.58), स्वीडन (9.39), न्यूझीलँड (9.26), डेन्मार्क (9.22), कॅनडा (9.15), आयर्लंड (9.15), फिनलँड (9.14), ऑस्ट्रेलिया (9.09), स्वित्झर्लंड (9.03).
  2. ‘दोषपूर्ण लोकशाही’ गटात (क्र. 21 ते 75) शीर्ष पाच देश - दक्षिण कोरिया (8), जपान, चिली, एस्टोनिया, अमेरिका (7.96).
  3. ‘संकरित शासन’ गटात (क्र. 76 ते 114) शीर्ष पाच देश – अल्बानिया (5.98), एल साल्वाडोर, मॅकेडोनिया, मोल्दोव्हा, फिजी (5.85).
  4. ‘सत्तावादी’ गटात (क्र. 115 ते 165) शीर्ष पाच देश – जॉर्डन (3.93), मोजांबिक, कुवैत, म्यानमार, मॉरिटानिया (3.82).
  5. यादीत तळाशी (क्र. 163 ते 167) असलेले पाच देश – चाड (1.61), मध्य आफ्रिका प्रजासत्ताक, कॉंगो लोकशाही प्रजासत्ताक, सिरीया, उत्तर कोरिया (1.08).
  6. हा अहवाल 165 स्वतंत्र देश आणि दोन प्रदेशांसाठी तयार केला जातो, जो जागतिक लोकशाही संदर्भात एकूण परिस्थिती दर्शवितो.
  7. हा अहवाल पाच श्रेणींमध्ये विभागाला गेला आहे,
 5. ते आहेत -
  1. निवडणूक प्रक्रिया आणि बहुलवाद; नागरी स्वातंत्र्य; सरकारचे कामकाज; राजकीय सहभाग; आणि राजकीय संस्कृती. 
  2. या श्रेणींमध्ये 60 निर्देशकांवरून गुण दिले जातात आणि देशांना ‘संपूर्ण लोकशाही’, ‘दोषपूर्ण लोकशाही’, ‘संकरित शासन’ किंवा ‘सत्तावादी’ म्हणून वर्गीकृत केले जाते. देशांना 10 पैकी गुण दिले गेले आहेत.


In the first 'India-Central Asia Dialogue' concluded in Uzbekistan

 1. दि. 13 जानेवारी 2019 रोजी उझबेकिस्तानच्या समरकंद या शहरात ‘भारत-मध्य आशिया संवाद’ याची प्रथम बैठक आयोजित करण्यात आली होती.
 2. भारताचे परराष्ट्र कल्याण मंत्री सुषमा स्वराज या दोन दिवसांच्या उझबेकिस्तान दौर्‍यावर आहेत.
 3. उझबेकिस्तानाचे परराष्ट्र मंत्री अब्दुलाझेझ कमिलोव्ह यांच्या समवेत त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले.
 4. या बैठकीत मध्य आशियाई देशांसोबत भारताचे सामाजिक व व्यवसायिक संबंध अधिक बळकट करण्याच्या दिशेने विविध विषयांवर चर्चा केली गेली.
 5. तसेच या क्षेत्रामधील व्यापारासंबंधी आणि आर्थिक कार्ये सुलभ करण्यासाठी भारत आणि अफगाणिस्तान आणि मध्य आशिया यांच्या दरम्यान व्यवहार्य संपर्क व्यवस्था उभारण्यासाठी पर्याये विकसित करण्याच्या उद्देशाने चर्चा केली गेली.
 6. आशिया
 7. आशिया हा पृथ्वीवरील सात (आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया) भूखंडांपैकी एक आहे. आशिया जगातला सर्वात मोठा व सर्वात अधिक लोकसंख्या असलेला खंड आहे.
 8. जगातली 60% लोकसंख्या आशियात राहते. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 8.6% भाग आशियाने व्यापला आहे.
 9. आशिया खंडाचे 6 विभाग पाडले गेले आहेत,
 10. ते आहेत:-
  1. पूर्व आशिया (8 देश)
  2. मध्य आशिया (5 देश)
  3. दक्षिण आशिया (9 देश)
  4. आग्नेय आशिया (11 देश)
  5. नैऋत्य आशिया (मध्यपूर्व) (19 देश)
  6. उत्तर आशिया (एकमेव - रशिया)


India's first human space expedition will be implemented by December 2021: ISRO

 1. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) देशाची पहिली मानवी अंतराळ मोहीम राबविण्याच्या आपल्या योजनेची घोषणा केली आहे.
 2. रुबीकॉन प्रकल्पाच्या सहाय्याने ‘गगनयान’ प्रकल्प राबविला जाणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2021 पर्यंत राबविण्याची योजना आहे.
 3. गेल्यावर्षी 28 डिसेंबरला केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘गगनयान’ प्रकल्पाला मंजुरी दिली होती आणि या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 10,000 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता.
 4. योजनेनुसार, डिसेंबर 2021 मध्ये एका महिलेसह सात भारतीय अंतराळवीरांना घेऊन 'गगनयान' अंतराळात झेपावेल.
 5. या मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड भारतीय हवाई दल आणि ISRO संयुक्तपणे करणार आहेत. याशिवाय, जून 2019 पर्यंत 'चंद्रयान 2' अंतराळात सोडण्याची योजना आहे. सन 2019 मध्ये एकूण 32 अंतराळ मोहिमा राबविल्या जाणार आहेत, जेव्हा की गेल्या वर्षी 16 मोहिमा होत्या.
 6. त्यामध्ये GSAT-20 ही सर्वाधिक महत्त्वाची मोहीम ठरणार आहे, कारण ती भारतीय क्षेत्रात हवाई प्रवासादरम्यान संपर्क यंत्रणा (म्हणजेच मोबाइल वापरण्यास) प्रदान करण्यास सक्षम बनविणार.
 7. भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसंबंधी सर्व कार्‍यांचे व्यवस्थापन करण्याकरिता बेंगरुळूमध्ये ‘मानव अंतराळ उड्डाण केंद्र’ उभारण्यात आले आहे.
 8. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 
  1. ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे.
  2. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे.
  3. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे दि. 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापन करण्यात आलेल्या ISROने 1962 सालच्या ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च’ (INCOSPAR) याला बरखास्त करीत त्याची जागा घेतली.
  4. ही संस्था भरता सरकारच्या विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. 
  5. ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ दि. 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत संघाने प्रक्षेपित केला.
  6. 1980 साली भारतीय बनावटीच्या SLV-2 या प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा प्रक्षेपित करण्यात आला.
  7. दि. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली आणि चंद्रावर पोहचणारा भारत हा जगातला चौथा देश बनला.
  8. त्यानंतर भारताच्या ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ या मोहिमेने दि. 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.


Top