एनडीआरएफच्या महासंचालकपदी संजय कुमार

 1. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच ‘एनडीआरएफ’
 2. महासंचालकपदी हरियाणाचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांची निवड करण्यात आली आहे.
 3. या दलाचे आधीचे प्रमुख आर के पचनंदा यांची इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाच्या (आयटीबीपी) प्रमुखपदी निवड झाल्यामुळे त्यांची जागा आता संजय कुमार घेतील.
 4. भारतीय पोलीस सेवेच्या १९८५ च्या तुकडीतील हरियाणा केडरचे अधिकारी असलेल्या संजय कुमार यांनी राज्यात विविध पदे भूषविली आहेत.
 5. कुलू येथे पोलीस अधीक्षक, सिमला परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अशा पदांवर काम केल्यानंतर त्यांना केंद्रात पाठवण्यात आले. काही काळ ते केंद्रीय राखीव पोलीस दलात होते.
 6. रेल्वे मंत्रालयात मुख्य दक्षता अधिकारी या पदावर असताना रेल्वेचे एजंट आणि काही कर्मचाऱ्यांचे साटेलोटे उघडकीस आणून कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई त्यांनी केली होती.
 7. अपर पोलीस महासंचालक असताना राज्याची सर्व पोलीस ठाणी ऑनलाइन व्हावीत यासाठी त्यांनी गृह मंत्रालयातून विशेष निधी मंजूर करवून आणला होता.
 8. पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसवणे, पासपोर्टसाठी लागणारा पोलीस पडताळणी अहवाल ऑनलाइन पाठवणे यांसारखे विधायक उपक्रम राज्यात त्यांनी राबवल्याने जनतेत ते लोकप्रिय बनले.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ):-

 1. आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार २००६मध्ये ‘एनडीआरएफ’ची स्थापना करण्यात आली.
 2. देशात अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात लोकांच्या मदतीला तातडीने धावून जाणे हे या दलाचे प्रमुख कार्य आहे.
 3. विविध राज्यांत या दलाच्या १२ बटालियन्स कार्यरत असून आजमितीस १३ हजार जवान यात कार्यरत आहेत.
 4. नैसर्गिक आपत्तींबरोबर जैविक वा रासायनिकअस्त्रांचा हल्ला झाला तरी त्यास समर्थपणे तोंड देता यावे याचे दलातील जवानांना प्रशिक्षण दिलेले असते.


इसिसविरोधात लढण्यासाठी भारताकडून फिलिपीन्सला आर्थिक मदत

 1. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेविरोधात लढण्यासाठी भारताकडून फिलिपीन्स या देशास सुमारे ५ लाख डॉलर्स म्हणजे ३.२ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.
 2. भारताने एखाद्या देशाला दहशतवादी संघटनेशी लढण्यासाठी आर्थिक मदत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 3. फिलिपीन्सची राजधानी असलेल्या मनिला शहराच्या दक्षिणेस असलेल्या मिंदानाओ प्रांतामध्ये इसिसशी फिलिपिनो सैन्य लढत आहे.
 4. या लढाईमध्ये आत्तापर्यंत फिलिपिनो सैन्यामधील किमान ९० सैनिक व ३८० दहशतवादी ठार झाले आहेत. याशिवाय बऱ्याच नागरिकांनाही जीव गमवावा लागला आहे.
 5. ही लढाई अद्याप सुरु असून दहशतवाद्यांच्या तावडीत शेकडो नागरिक असल्याचे आढळून आले आहे.
 6. फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी मिंदानाओ प्रांतात गेल्या ६० दिवसांपासून मार्शल कायदा लागू केला आहे.
 7. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि फिलिपिन्सचे परराष्ट्र मंत्री अॅलन पीटर सायटानो यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीनंतर भारताकडून ही मदत देण्यात आली आहे.


सुनील छेत्री आशियाई फुटबॉल महासंघाच्या त्रैमासिकावर

 1. भारताच्या वरिष्ठ संघाचा कर्णधार सुनील छेत्री हा आशियाई फुटबॉल महासंघाच्या त्रैमासिकावर झळकला आहे.
 2. हा मान मिळणारा तो भारताचा पहिलाच फुटबॉलपटू आहे.
 3. आशियाई फुटबॉल महासंघातर्फे प्रकाशित होत असलेल्या या त्रैमासिकात स्टार खेळाडू, मार्गदर्शक, क्लब तसेच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती प्रसिद्ध होत असतात.
 4. आशियाई फुटबॉलमध्ये त्यास खूपच महत्त्व आहे.
 5. या त्रैमासिकाच्या १९व्या अंकाच्या मुखपृष्ठावर छेत्रीचे छायाचित्र झळकले आहे.
 6. छेत्री हा बंगळूर एफसीचा प्रमुख खेळाडू आहे.
 7. छेत्रीवरील लेखात त्याचे बालपण, त्याला लहानपणासून असलेली फुटबॉलची आवड, यावर भर आहे.
 8. छेत्रीचे वडील लष्कर फुटबॉल संघात होते, तर त्याची आई नेपाळकडून फुटबॉल खेळली आहे.
 9. त्याने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय गोल पाकिस्तानविरुद्ध २००५ मध्ये केला होता.


Top

Whoops, looks like something went wrong.