current affairs, loksatta chalu ghadamodi

१. यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जाहीर झाला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी बुधवारी ही घोषणा केली.
२. 1 लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राजर्षी शाहू जयंतीदिनी म्हणजे मंगळवार (२६ जून) सायंकाळी ६ वाजता शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात येणार आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.
३. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने दरवर्षी शाहू जयंतीनिमित्त समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
४. यंदाचा हा पुरस्कार अण्णा हजारे यांना त्यांच्या सामाजीक क्षेत्रातील अमुल्य कामगिरीबद्दल देण्यात येत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतीशील वारसा चालू ठेवणाऱ्या एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आणि त्यांनी समाज प्रबोधनाच्या वाटचालीमध्ये दीर्घकाळ दिलेल्या मौलिक योगदानाचा सन्मान म्हणूनही त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला असल्याचे देसाई यांनी सांगितले.


current affairs, loksatta chalu ghadamodi

१. भारतातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया योजनेची सुरूवात केली होती.मेक इन इंडिया योजनेला आता उत्तम प्रतिसाद मिळत असून ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये भारतात तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक मेट्रो धावणार आहेत. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.
२.गेल्या काही वर्षांमध्ये भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्यातच मेक इन इंडिया या योजनेमुळे भारतातील उत्पादन क्षेत्रालाही मोठी चालना मिळाली आहे. देशांतर्गत आणि परदेशी कंपन्यांद्वारे देशातील उत्पादन क्षेत्राला चालना मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यातच आता या योजनेला मोठे यश मिळाले असून भारतात तयार करण्यात आलेली मेट्रो ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये धावणार आहे.
३. सिडनीत पहिल्यांदाच चालक विरहित मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या मेट्रोमध्ये 6 कोचेस देण्यात आले असून 22 अॅल्सटॉम ट्रेनद्वारे ही सेवा पुरवली जाणार आहे. तल्लावांग मेट्रो स्टेशन ते वेस्टवूड स्थानकादरम्यान ही मेट्रो सेवा चालवण्यात येईल.
४. तल्लावांग ते वेस्टवूडदरम्यान एकूण 13 मेट्रो स्थानके असतील. सिडनी मेट्रोसाठी अॅल्सटॉम एसए या कंपनीने 22 मेट्रो ट्रेन तयार केल्या आहेत. या ट्रेन आंध्र प्रदेशात असेंबल करण्यात आल्या असून त्या पूर्णत: स्वयंचलित आहे. यामध्ये एलईडी लाइट, आपात्कालिन इंटरकॉम आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच एल्सटॉम एसए ने सिग्नलिंग सिस्टम आणि मेट्रो चालवण्यासाठी सिडनी मेट्रोसोबत 15 वर्षांचा करार केला आहे


current affairs, loksatta chalu ghadamodi

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आज तीन तलाक विधेयकास मंजुरी देण्यात आली. शिवाय मंत्रीमंडळाने जम्मू काश्मीरमध्ये सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट वाढवण्यासही मंजुरी दिली आहे.
२. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीतील निर्णयांची माहिती देताना सांगितले की, मुस्लिम महिलांचा विचार करून मोदी सरकार आगामी संसद सत्रात तीन तलाकचे विधेयक सादर करेल. अध्यादेशाचं कायद्यात परिवर्तन करण्यासाठी विधेयक आणण्यात येणार आहे. शिवाय कॅबिनेटने जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक २०१९ ला मंजुरी दिली आहे. ज्यामुळे जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात राहणा-या नागरिकांना मदत होईल.
३. केंद्र सरकारने आधार आणि अन्य कायदे (संशोधन) विधेयक २०१९ ला ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कोणत्याही व्यक्तीलआ आधार क्रमांक देण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही. मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर कॅबिनेटची ही पहिलीच बैठक बुधवारी पार पडली. ज्यामध्ये सरकारच्या नजीकच्या व दुरगामी धोरणांवर चर्चा करण्यात आली.


current affairs, loksatta chalu ghadamodi

१. नवी दिल्ली : नोकरशाहीच्या रचनेत (ब्युरोक्रॅटिक हायरार्की) निर्णय प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी उपसचिव आणि संचालकांची पदे खासगी क्षेत्रातून भरण्याची केंद्र सरकारची योजना आहे, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. सामान्यत: ही पदे सरकारी नोकरांतून म्हणजे भारतीय प्रशासन सेवेसारख्या (आयएएस) गट-अ मधून, तसेच केंद्रीय सचिवालय सेवेत बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांतून भरली जातात.
२. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे (डीओपीटी) सचिव सी. चंद्रमौली यांनी संबंधित अधिका यांना उपसचिव आणि संचालक या पातळीवर तज्ज्ञांची नियुक्ती करण्यासाठी औपचारिक प्रस्ताव तयार करा, असे सांगितले आहे, असे हा अधिकारी म्हणला.
३. प्रारंभी असे एकूण ४० अधिकारी नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या नीती आयोगाने व्यवस्थेमध्ये तज्ज्ञांना ठराविक मुदतीसाठी सामावून घेणे गरजेचे आहे यावर आपल्या अहवालात भर दिला होता. वेगवेगळ्या पातळ्यांवर उपसचिव ते संयुक्त सचिव या पदांवर नीती आयोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचाही विचार करीत आहे. सल्लागारांची सेवा घेतली जात आहे; परंतु हे तज्ज्ञ सामावून घेण्यात आले तर त्यांचा दर्जा सरकारी सेवेतून त्या पदावर येणा यांचा जो असतो तोच असेल, असे सांगून हा अधिकारी म्हणाला की, याबाबत खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांचे अर्ज मागवणारी जाहिरात लवकरच दिली जाईल


current affairs, loksatta chalu ghadamodi

१. बंगळुरू : चंद्रावरील माती व वातावरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारताच्या चांद्रयान-2 या दुसऱ्या चांद्रमोहिमेसाठीचे यान १५ जुलै रोजी अंतराळात झेपावेल, असे इस्रोने बुधवारी जाहीर केले. इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी सात आठवड्यांच्या महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेची माहिती दिली. चांद्रयान-२साठी जीएसएलव्ही-५ मार्क 3 हा अग्निबाण श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ तळावरून १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी प्रक्षेपित केला जाईल.
२. मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात वैज्ञानिक संशोधनासाठीची साधने व उपकरणे असलेले विक्रम हे लॅण्डर व प्रग्यान ही गाडी (रोव्हर) ६ किंवा ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविली जाईल. दहा वर्षांपूर्वी भारताने चांद्रयान-१; मोहीम पूर्ण केली होती. आताची मोहीम प्रगत व तंत्रसिद्धतेने अधिक आव्हानात्मक असेल.
३. चांद्रयान-१ मध्ये चंद्रावर न उतरता ११ वैज्ञनिक उपकरणांनी चंद्राचा दुरुनच अभ्यास केला होता. आता प्रग्यानला कुशीत घेऊन विक्रम चंद्रावर उतरेल. नंतर प्रग्यान चंद्रावरील दगड-मातीचे नमुने गोळा करेल. दूरवरून अभ्यास करूनही चंद्रावरील पाण्याचा शोध लावणे हा चांद्रयान-चा यशाचा तुरा ठरला होता. आता त्याच गृहितकास बळकटी मिळण्याखेरीज चंद्राची नवी गुपितेही उघड होतील.
४. शिवन म्हणाले की, चंद्राभोवती ऑर्बिटरने घिरट्या घालण्यापर्यंतचा टप्पा चांद्रयान-१ प्रमाणे असेल. तेथपर्यंतचे मिशन याआधी यशस्वी झाले होतेच. आताच्या मिशन मधील लॅण्डर व रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्याचा शेवटचा १५ मिनिटांचा टप्पा पूर्णपणे नवा असल्याने काहीशी धास्ती निर्माण करणारा असेल. पण कुशल वैज्ञानिक ही नवखेपणाची बाजीही फत्ते करतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. या मोहिमेत १४ प्रकारची वैज्ञानिक उपकरणे यानासोबत पाठविली जातील. ती ऑर्बिटर विक्रम हा लॅण्डर व प्रग्यान हा रोव्हर या तिन्हीवर विखुरलेली असतील व ती एकाच वेळी निरनिराळे प्रयोग-चाचण्या करत राहतील.


current affairs, loksatta chalu ghadamodi

महत्वाच्या घटना
१८८१: यू. एस. एस. जीनेट आर्क्टिक समुद्रात नष्ट.
१९३४:व्हेनिसमध्ये अॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची भेट.
१९५६:पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.
१९८३:पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
२०००:स्पेन मधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला.

जन्म
१८३१: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ जेम्सक्लार्क मॅक्सवेल यांचा जन्म(मृत्यू ५ नोव्हेंबर १८७९ केम्ब्रिज, यु. के.)
१८७९: कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म.(मृत्यू:१६ मार्च १९४५)

मृत्यू
१९६९:विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन.(जन्म १३ ऑगस्ट१८९८)
२०१२:पाकिस्तानी गझल गायक मेहंदी हसन यांचे निधन.(जन्म:१८ जुलै १९२७)


Top