1. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांना हिपेटायटिसविरोधी मोहिमेसाठी डब्ल्यूएचओचा सदिच्छा दूत जाहीर केले.
  2. अमिताभ यांनी सूचविल्यानुसार महाराष्ट्र सरकारच्या मदतीने मोफत तपासणी मोहीम प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याबाबत विचार सुरू आहे. भारतात हिपेटायटिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळतात. यासाठी पंजाबमध्ये राबवलेली मोहीम भारतभर राबविण्याची आवश्‍यकता आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींनी जे. डब्ल्यू. मॅरिएट हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
  3. हिपेटायटिसचे उपचार आणि औषधे अत्यंत महागडी आहेत. तीन महिन्यांच्या उपचारांसाठी
  4. अमेरिकेत 85 हजार डॉलर,
  5. इंग्लंडमध्ये 55 हजार डॉलर आणि
  6. भारतात जवळपास 120 डॉलर खर्च होतात.
  7. इतर देशांच्या तुलनेत भारतातील खर्च कमी असला, तरी भारतीयांना हा खर्च परवडणार नाही. तो कमी करण्यासाठी आणि औषधे सर्वत्र उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती दक्षिण पूर्व आशिया विभागीय संचालिका डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी दिली.
  8. हिपेटायटिसवरील उपचार महागडे असले, तरी अत्यावश्‍यक आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास यकृत प्रत्यारोपणाची वेळ ओढवू शकते. त्यासाठी येणारा खर्च औषधोपचारांपेक्षा अधिक खर्चिक आहे.
  9. डब्ल्यूएचओचे प्रतिनिधी डॉ. हेन्क बॅकडम आणि डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितले, की भारतात फक्त 10 टक्के रुग्ण यासाठीची चाचणी करत असल्याने तेवढेच रुग्ण समजतात.
  10. भारतातील हिपेटायटिसच्या रुग्णांचा निश्‍चित आकडा समजलेला नाही, असे बॅकडम यांनी सांगितले. इतर आजारांवरील उपचार घेताना हा आजार झाल्याचे अनेक रुग्णांना नंतर लक्षात येते, असे ते म्हणाले.
  11. पंजाबात सर्वाधिक रुग्ण अमली पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणावर जडलेल्या ठिकाणी हिपेटायटिसचे रुग्ण जास्त आढळतात. भारतात पंजाबमध्ये असे सर्वाधिक रुग्ण आढळतात.


Top

Whoops, looks like something went wrong.