A provision of Rs 16,500 crore for clean India campaign in 2018-19

 1. सन 2018-19 मध्ये भारत सरकारच्या 71 मंत्रालये आणि विभागांकडून चालविण्यात येणार्‍या स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी 16,500 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 2. तयार करण्यात आलेली ‘स्वच्छता कृती योजना (SAP) 2018-19’ याची मंत्रालये आणि विभागांकडून अंमलबजावणी केली जाणार आहे आणि त्यासाठी हा निधी आहे.
 3. भारत सरकारकडून राष्ट्रव्यापी ‘स्‍वच्‍छ भारत’ अभियानाला ऑक्टोबर 2014 पासून सुरुवात करण्यात आली.
 4. हे अभियान शहरी आणि ग्रामीण अश्या दोन पातळीवर केंद्रीय पेयजल व स्‍वच्‍छता मंत्रालयांतर्गत राबवविले जात आहे.
 5. स्वच्छ भारत अभियानांतर्गत आतापर्यंत 6.5 कोटी शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे.
 6. शिवाय 3.38 लक्ष गाव आणि 338 जिल्हे आतापर्यंत हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहे.


The WTO appointed a committee to combat the Indo-US conflict regarding renewable energy equipment

 1. जागतिक व्यापार संघटनाने (WTO) अमेरिका आणि भारत यांच्यामधील नवीन व अक्षय ऊर्जा क्षेत्रातल्या उपकरणांसंदर्भात निर्माण झालेल्या तंट्याला सोडविण्यासाठी एक समिती नेमली आहे.
 2. भारताने अक्षय ऊर्जा क्षेत्रात 8 अमेरिकेच्या राज्यांच्या धोरणांसंदर्भात प्रश्न उभे केले आहेत, कारण अमेरिकेच्या राज्यांच्या स्थानिक सामुग्रीच्या वापराचे नियम वैश्विक व्यापार व्यवस्थेच्या समरूप नाहीत.
 3. नियमांतर्गत स्थानिक कंपन्यांना प्रकल्पासाठी लागणार्‍या कच्च्या मालाचा एक हिस्सा स्थानिक बाजारपेठेमधून घेणे सक्तीचे आहे.
 4. दोन्ही देशामधली वाटाघाटी अयशस्वी ठरल्याने हा वाद सोडविण्यासाठी WTO ची मध्यस्थी घेतली जात आहे.
 5. जागतिक व्यापार संघटना (WTO) ही आंतरशासकीय संघटना आहे, जी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते. 
 6. याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे आणि याचे 164 देश सभासद आहेत.
 7. 1948 साली लागू झालेल्या दर व व्यापार संदर्भात सर्वसाधारण करार (General Agreement on Tariffs and Trade -GATT) याला बदली करून 15 एप्रिल 1994 रोजी 123 राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मार्राकेश करारांतर्गत WTO अधिकृतपणे 1 जानेवारी 1995 रोजी कार्यरत झाले.
 8. WTO वाटाघाटी करता येणार्‍या व्यापार करारासाठी कार्यचौकट प्रदान करून सहभागी देशांमध्ये व्यापाराचे नियमन करते तसेच सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सह्या केलेल्या आणि त्यांच्या संसदेने मान्य केलेल्या WTO कराराप्रती सहभागींची निष्ठा वाढविण्यासाठीच्या उद्देशाने तंटा निवारण प्रक्रिया हाताळते.


 International hostess day: May 12

 1. दरवर्षी 12 मे हा दिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून पाळला जातो. यावर्षी हा दिन ‘नर्सेस ए वॉइस टू लीड - हेल्थ इज ए ह्यूमन राइट’ या विषयाखाली पाळला गेला.
 2. सन 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल (जन्‍म 12 मे 1820) यांचा हा जन्मदिवस आहे.
 3. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते.
 4. 1965 साली इंटरनॅशनल काउंसिल ऑफ नर्सेज (ICN) तर्फे पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला होता.
 5. जानेवारी 1974 मध्ये 12 मे हा दिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ पाळण्याची घोषणा केली गेली.
 6. याप्रसंगी, भारत सरकारतर्फे फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार दिला जातो. 50,000 रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 


Top