Organizing ADDM in Singapore

 1. सिंगापूरमध्ये १९-२० ऑक्टोबर २०१८ रोजी १२व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे (एडीडीएम) आणि ५व्या एडीडीएम-प्लसचे आयोजन करण्यात आले.
 2. ही बैठक आग्नेय आशियातील संरक्षणासाठी प्रमुख मंत्रीस्तरीय मंच आहे. या मंचावर आसियान देशांद्वारे संरक्षण आणि सहकार्यावर चर्चा केली जाते.
 3. या बैठकीमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, न्यूझीलँड, दक्षिण कोरिया, रशिया आणि अमेरिका या देशांचे संरक्षण मंत्री उपस्थित होते.
 4. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.
 5. या बैठकीत संरक्षण मंत्र्यांनी सागरी सुरक्षा, दहशतवाद विरोधी कारवाई, शांतता मोहिमा या मुद्यांवर सहमती दर्शवली.
 6. एडीडीएम प्लस(ADDM: ASEAN Defence Ministers Meeting):-
  1. एडीडीएम प्लस आसियान सदस्य देश आणि ८ भागीदार देशांचे संरक्षण मजबूत करण्यासाठी तसेच शांती व विकास निर्मितीसाठी एक मंच आहे.
  2. या बैठकीचा उद्देश चर्चा आणि पारदर्शकतेसह सदस्य देशांमध्ये परस्पर विश्वास मजबूत करणे हा आहे.
  3. एडीडीएम प्लसच्या पहिल्या परिषदेचे आयोजन २०१०मध्ये व्हिएतनामची राजधानी हनोई येथे करण्यात आले होते.
 7. आसियान:-
 8. ASEAN (आसियान) : Association of Southeast Asian Nations
  1. आसियान ही आग्नेय आशियातील १० देशांची संघटना असून, याचे सचिवालय जकार्ता (इंडोनेशिया) येथे आहे.
  2. ब्रुनेइ, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश आसियानचे सदस्य आहेत.
  3. ८ ऑगस्ट १९६७ रोजी रोजी ही संघटना स्थापन करण्याची घोषणा झाली, यालाच ‘बँकॉक घोषणा’ म्हणतात.
  4. स्थापनेवेळी याचे इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, थायलंड हे पाच देश होते. त्यानंतर ब्रुनेइ हा सहावा देश जोडला गेला.
  5. १९९५ साली व्हिएतनाम, १९९७ साली लाओस व म्यानमार आणि १९९९ साली कंबोडिया हे देश जोडले गेले.
  6. जगाच्या एकूण जमिनक्षेत्रापैकी ३ टक्के क्षेत्र आसियान देशांनी व्यापलेले आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी ८.८ टक्के लोकसंख्या आसियान देशांची आहे.
  7. सर्व आसियान देशांची मिळून एक अर्थव्यवस्था मानली तर ती जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.


Meenal Patel honored Presidential Medal in America

 1. भारतीय वंशाच्या मीनल पटेल यांना मानवी तस्करीविरुद्ध त्यांनी दिलेल्या लढ्यासाठीअमेरिकेत प्रेसिडेंशियल मैडलने गौरविण्यात आले.
 2. मीनल पटेल या मानवी तस्करीवरील ह्युस्टनचे महापौर सिल्वेस्टर टर्नर यांच्या सल्लागार आहेत.
 3. जुलै २०१५मध्ये त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आले. या पदावर कार्य करताना त्यांनी मानव तस्करी थांबविण्यासाठी प्रशंसनीय कार्य केले.
 4. सध्या त्या महापौरांच्या मानवी तस्करी विरोधी योजनेची अंमलबजावणी करीत आहेत. अमेरिकेतील अशा प्रकारची ही पहिलीच योजना आहे.
 5. यापूर्वी त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवीय शिखर संमेलनाच्या प्रवक्त्याही होत्या. त्यांनी कनेक्टिकट विद्यापीठातून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.


Stephen Hawking's last book published

 1. दिवंगत शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे ‘Brief Answers to the Big Questions’ हे शेवटचे पुस्तक प्रकाशित झाले.
 2. टाईम ट्रॅव्हल, ब्लॅक होल इत्यादीसारख्या अनेक विषयांवर या पुस्तकात प्रकाशटाकण्यात आला आहे.
 3. या पुस्तकात हॉकिंग यांनी परमाणु शस्त्रे, कृत्रिम बुद्धिमत्ता, जेनेटिक इंजीनियरिंग आणि ग्लोबल वार्मिंग यासारख्या विषयांवर आपले मत नोंदविले आहे.
 4. स्टीफन हॉकिंग:-
  1. ब्रिटनचे ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्यांना आजच्या युगातील सर्वोत्तम शास्त्रज्ञांपैकी एक मानले जाते.
  2. ते एक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, विश्वरचना शास्त्रज्ञ व लेखक होते. ब्लॅक होल, हॉकिंग एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत.
  3. त्यासाठी त्यांना भौतिकशास्त्रातले अत्यंत मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर या पुरस्कारानेही त्यांना गौरवले होते.
  4. २००९मध्ये त्यांना प्रेसिडेन्शिअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले होते.
  5. त्यांचे 'ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम' हे पुस्तक विशेष गाजले. या पुस्तकात त्यांनी बिग बँग आणि कृष्णविवरासंदर्भात सविस्तर विवेचन केले होते.
  6. वयाच्या २१व्या वर्षी ‘मोटार न्यूरॉन डिसीज’ने त्यांना ग्रासले होते. ते फार फार तर २ वर्षे जगू शकतील अशी भीती डॉक्टरांनी वर्तवली होती.
  7. परंतु असामान्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी आपल्या आजारपणावर मात करत आधुनिक काळातील न्यूटन अशी ख्याती जगभर मिळवली.
  8. दुर्धर अशा आजारपणावर मात करत विज्ञान विषयात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या हॉकिंग यांचे १४ मार्च २०१८ रोजी निधन झाले.


The meeting of the SCO Education Ministers was completed in Kazakhstan

 1. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) शिक्षण मंत्र्यांची ७वी बैठक कझाकस्तानची राजधानीत अस्ताना येथे आयोजित करण्यात आली होती.
 2. कझाकस्तान सरकार, कझाकस्तान विज्ञान व शिक्षण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व एससीओ विद्यापीठाच्या रेक्टर कार्यालयाद्वारे ही बैठक आयोजित केली गेली.
 3. भारत, कझाकस्तान, चीन, किरगिझस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचे शिक्षण मंत्र्यांनी या बैठकीत भाग घेतला.
 4. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व मानव संसाधन आणि विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंगयांनी केले.
 5. या बैठकीत संयुक्त संशोधन प्रकल्प, शैक्षणिक यात्रा, भाषा अभ्यास, व्यावसायिक शिक्षण आणि युवा विनिमय कार्यक्रम या क्षेत्रामध्ये बहुपक्षीय सहकार्यावर चर्चा करण्यात आली.
 6. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन:-
  1. शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) स्थापना २००१मध्ये चीनच्या पुढाकाराने करण्यात आली.
  2. चीन, कझाकस्तान, किर्गीझस्तान, उझबेकिस्तान, ताजिकीस्तान आणि रशिया हे या संघटनेचे संस्थापक देश आहेत.
  3. या देशांपैकी उझबेकिस्तान वगळता इतर देश १९९६मध्ये स्थापन झालेल्या ‘शांघाय फाइव्ह’ या गटाचे सदस्य होते.
  4. २०१७मध्ये भारत व पाकिस्तानला या संघटनेचे पूर्ण सदस्यत्व देण्यात आल्यामुळे सध्या या संघटनेचे ८ सदस्य देश आहेत.
  5. हे ८ देश जगातील ४२ टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. या देशांचे उत्पन्न हे जागतिक उत्पन्नाच्या २० टक्के आहे.
  6. अफगाणिस्तान, बेलारूस, इराण व मंगोलिया हे ‘एससीओ’शी निरीक्षक देश म्हणून संलग्न आहेत.
  7. दहशतवाद, फुटीरतावाद या समस्यांविरोधात लढण्यासाठी आणि उपखंडीय समृद्धीसाठी यंत्रणा निर्माण करण्याकरिता शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) स्थापन झाली.
  8. मूलतत्त्ववाद व दहशतवाद या समस्यांबरोबरच व्यापार, गुंतवणूक व दळणवळण तसेच संपर्क या मुद्द्यांवर या संस्थेच्या माध्यमातून बदल घडून येणे अपेक्षित आहे.


Top