MPSC chalu ghadamodi, current affairs

1. आंध्र प्रदेशातील तेलुगु माध्यमाच्या सर्व शाळांचे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये रूपांतर करण्यास आंध्र प्रदेश सरकारने मान्यता दिली आहे.

2. तर राज्यात पंचायत राज, महापालिका आणि सरकारी अशा तेलुगु माध्यमाच्या जवळपास 44 हजार शाळा आहेत. या निर्णयाबद्दल तेलुगु देसम पार्टी आणि भाजपने निषेध नोंदविला आहे.

3. तसेच मंडल प्रजा परिषद आणि जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी या वर्गाचे 2020-21 मध्ये, इयत्ता नववीच्या वर्गाचे 2021-22 मध्ये आणि इयत्ता दहावीच्या वर्गाचे 2022-23 या शैक्षणिक वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या
शाळांमध्ये रूपांतर केले जाणार आहे. इयत्ता पहिली ते सहावीपर्यंतच्या वर्गासाठी आदेशाची प्रथम अंमलबजावणी करण्यात येणार आहेत.

4. तथापि, शालेय शिक्षण आयुक्त तेलुगु आणि ऊर्दू हे सक्तीचे विषय करण्याबाबत योग्य निर्णय घेणार आहेत. शिक्षणाचा अधिकार कायद्याने विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षणाचा हक्क दिला आहे त्याचे आम्ही संरक्षण करणार आहोत आणि तेलुगु भाषेला कमी लेखणार नाही, तेलुगु भाषा सक्तीचा विषय म्हणून शिकविण्यात येणार आहे., मात्र काही वर्षांत शिकविण्याचे माध्यम हे तेलुगुऐवजी इंग्रजी राहणार आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) घेतलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय) स्पर्धेत औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आकाश कमलेश त्रिपाठी या विद्यार्थ्याने देशात सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे.

2. तर प्रथमच घेतलेल्या अशा प्रकारच्या या स्पर्धेत देशभरातील 1000 महाविद्यालयांतील 30,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

3. तसेच नवसारी येथील स्नेह आर. मेहता दुसर्या, तर आयआयटी जोधपूरमधील हर्षित शर्मा तिसर्या क्रमांकावर राहिला. अंतिम फेरीत 20 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना टीसीएसमध्ये संधी देण्याची तयारी दर्शविली आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. स्पेनसाठी सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू डेव्हिड व्हिया याने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.

2. तर 37 वर्षीय व्हिया पुढील महिन्यात जे-लीगच्या मोसमाअखेरीस आपल्या 19 वर्षांच्या कारकीर्दीला अलविदा करणार आहे.

3. तसेच व्हियाने बार्सिलोना, अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि व्हॅलेंसिया या नामांकित क्लबचे प्रतिनिधित्व केले. याचप्रमाणे स्पेनसाठी तो 98 सामने खेळला आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. खास नौदलासाठी बनवण्यात आलेल्या तेजसच्या सागरी आवृत्तीची संरक्षण संशोधन विकास संस्था डीआरडीओने रात्रीच्या वेळी केलेली अरेस्ट लँडिंगची चाचणी यशस्वी ठरली.

2. तर या चाचणीमधून डीआरडीओने अरेस्ट लँडिंग हाताळण्याचे आपले कौशल्य दाखवून दिले आहे. मंगळवारी रात्री केलेल्या या चाचणीचा व्हिडीओ डीआरडीओने पोस्ट केला आहे.

3. तेजस हे स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान आहे. 12 नोव्हेंबरला 6.45 च्या सुमारास एसबीटीएफ गोव्यामध्ये एलसीए तेजसचे अरेस्ट लँडिंग करण्यात आले. रात्रीच्या वेळी करण्यात आलेली ही पहिली चाचणी आहे.

4. अरेस्ट लँडिंगच्या टेक्नॉलॉजीमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदल, डीआरडीओ आणि एचएएलचे कौतुक केले आहे.

5. दोन महिन्यापूर्वीच गोव्यामध्ये समुद्र किनाऱ्याजवळील नौदलाच्या तळावर घेण्यात आलेली एलसीए तेजसची अरेस्ट लँडिंगची चाचणी यशस्वी ठरली होती. ही चाचणी दिवसा घेण्यात आली होती. सर्वसामान्य तेजस विमानाला उड्डाण आणि लँडिंगसाठी एक किलोमीटरची धावपट्टी लागते. तेजसच्या सागरी आवृत्तीमध्ये उड्डाणाला 200 मीटर आणि लँडिंगसाठी 100 मीटरची धावपट्टी लागते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 13 नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक दयाळूपणा दिन‘ म्हणून पाळला जातो.

2. शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1780 मध्ये झाला होता.

3. रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी सन 1913 मध्ये नोबेल पारितोषिक जाहीर केले.

4. महाराष्ट्राचे 5 वे व 9 वे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1917 मध्ये झाला होता.

5. वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन सन 1921 मध्ये पुण्यास अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली.

6. सन 1931 मध्ये शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.


Top

Whoops, looks like something went wrong.