1. भारताचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार 500 अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य हे आता दिवास्वप्न राहिलेले नाही. ते वास्तवात येऊ शकते. कारण भारतात अमेरिकी कंपन्यांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेषत: संरक्षण आणि विमान क्षेत्रात अधिक चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
 2. फिक्कीच्या वतीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जेटली बोलत होते. त्यांनी म्हटले की, गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिकेचे  संबंध फारच मजबूत भागीदारीच्या स्वरूपात उदयास आले आहेत.
 3. ' मिशन-500' हे उद्दिष्ट आणि भागीदारीचे विभिन्न पैलू यावर जोर देण्यात येत आहे. संरक्षण आणि विमान क्षेत्रातील संधींकडे योग्य प्रकारे लक्ष दिल्यास असे लक्षात येईल की,  व्दिपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलरच्या पातळीवर घेऊन जाणे हे काही आता अशक्य काम राहिलेले नाही.
 4. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधीच्या आकडेवारीनुसार, भारत हा आता अमेरिकेचा नववा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. गेल्या वर्षी  दोन्ही देशांचा द्विपक्षीय व्यापार 67.7 अब्ज डॉलर होता. हा व्यापार भारताला फायदेशीर ठरला. त्यात 24 अब्ज डॉलरचा अधिशेष आहे.


 1.   आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund -IMF) कडून त्यांचा वार्षिक ‘फिस्कल मॉनिटर रिपोर्ट’ प्रसिद्ध करण्यात आला आहे.त्यामध्ये असे दिसून आले आहे की, जगभरात असमानतेमध्ये वेगाने घट झाली असली तरीही अमेरिका, चीन आणि भारत या देशांमध्ये त्याच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच करविषयक धोरणे आणि हस्तांतरण यांच्या माध्यमातून संपत्तीचे पुनर्वितरण करण्यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
 2. सहा महिन्यांपूर्वीच, प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक धोरणांविषयी कडक बाजूवर भर दिल्यामुळे कर्जपातळी सुधारण्याची शक्यता अपेक्षित आहे. मात्र,  सन 2017 मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) कमाल 110% च्या जवळ कर्जपातळी अजूनही उच्च आहे.
 3.  

 4.  
 5. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक एकत्रीकरणाची गती मंद असून एकाच ठिकाणी आहे. कमी उत्पन्न आणि विकसनशील देशांमध्ये सन 2011 आणि सन 2016 दरम्यान वित्तीय तूटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु सन 2017 मध्ये त्यात  सतत हळूहळू कमी येण्याची शक्यता आहे.

 6. कमी उत्पन्न आणि विकसनशील देशांमध्ये, कर क्षमता खूपच कमी आहे. यापैकी निम्म्या देशांचे कर प्रमाण  GDP च्या 15% पेक्षा कमी आहे.

 7. राष्ट्रीय सीमांना गृहीत न धरता जगातील सर्व नागरिकांमध्ये अलीकडच्या दशकांमध्ये वैश्विक असमानता कमी दिसून आलेली आहे, जी चीन आणि भारत यासारख्या मोठ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये मजबूत आय वृद्धी दर्शवीत आहे.

 8. वास्तविक स्वरूपात, ज्या देशांसंबंधीत आकडे  उपलब्ध आहेत, त्यामधील जवळपास अर्ध्या देशांमध्ये असमानतेत कमतरता आलेली आहे.

 9. अलीकडच्या वर्षांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि विकासावर भर दिला गेला आहे, मात्र असे असूनही कित्येक  देशांमध्ये लोकसंख्येत विभिन्न उत्पन्न पातळींच्या समूहांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्य सेवा उपलब्ध होण्यामध्ये मोठी तफावत दिसून आली आहे आणि यामध्ये विकसित अर्थव्यवस्थांचा देखील समावेश आहे.

 10. सार्वजनिक बँकांमध्ये योग्य भांडवलीकरण सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यावर भर देण्यात आला आहे.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, ज्याचे  मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये आहे. जागतिक आर्थिक सहकार्य करणे, आर्थिक स्थिरता आणणे, आंतरराष्ट्रीय व्यापार सुविधा प्रदान करणे, वाढीव रोजगारास प्रोत्साहन देणे आणि जगभरातील गरिबी कमी करणे तसेच आंतरराष्ट्रीय देयक प्रणालीची पुनर्बांधणी करणे ही या संस्थेची उद्दिष्टे आहेत.

 11. 1944 साली ब्रेटोण वूड्स परिषद येथे IMF ची स्थापना करण्यात आली आणि ही 1945 साली 29 सदस्य देशांसह औपचारिकरित्या अस्तित्वात आली. सध्या IMF चे 188 सदस्य देश आहेत.

 12.   

 13.   

 


 1. ‘ग्लोबल हंगर इंडेक्स 2017’ अनुसार, उपासमारीत भारत 100 व्या स्थानी आहे.बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण अधिक असल्यामुळे मागील वर्षाच्या 97 व्या स्थानावरून आणखी तीन क्रमांकाने घाली घसरत यावर्षी भारत 100 व्या स्थानी आले आहे.
 2. 31.4 सह भारताचे 2017 सालचे GHI गुण अधिक असून ते ‘गं भीर’ श्रेणीमध्ये गणल्या गेले आहे. 119 देशांच्या सर्वेक्षणामध्ये भारत 100 व्या स्थानी असून ते आशियामध्ये केवळ अफगानिस्तान आणि पाकिस्तान यांच्या पुढे आहे. यादीत, आशिया खंडात चीन (29), नेपाल (72), म्यानमार (77), श्रीलंका (84) आणि बांग्लादेश (88) ही राष्ट्रे भारतापूढे आहेत. तर पाकिस्तान आणि अफगानिस्तान अनुक्रमे 106 व्या आणि 107 व्या स्थानी आहे.
 3. तीन वर्षांच्या कालावधीत, भारत 2014 सालच्या 55 व्या स्थानावरून 45 क्रमांकाने खाली आले आहे.भारतात पाच वर्षाखालील एक पंचमांश बालके त्यांच्या उंचीच्या मानाने खूप कमी वजनाचे आहेत आणि एक तृतीयांश बालकांची उंची वयाच्या मानाने कमी आहे.

 4. वर्ष 2015-16 पर्यंत, भारतातील एक पंचमांशहून अधिक (21%) बालके उंचीच्या तुलनेत कमी वजनाचे आहेत, जे की हे प्रमाण वर्ष 2005-06 मध्ये 20% हून अधिक होते. या प्रमाणात भारताने गेल्या 25 वर्षांमध्ये कोणतीही सुधारणा दाखवलेली नाही.

 5. तुलनात्मकदृष्टय़ा, भारताने बालकांच्या स्टंटिंग (बालकाला येणारा थकवा) दर घटवण्यामध्ये (सन 2000 पासून 29% ने घट) लक्षणीय सुधारणा केली आहे. परंतू असे असूनही, भारतात हा दर 38.4% इतका अधिक आहेच

 6. जागतिक स्तरावर, मध्य आफ्रिकन गणराज्यमध्ये कोणत्याही देशाच्या तुलनेत   सर्वाधिक उपासमार आहे आणि हा निर्देशांकमध्ये ‘अत्यंत चिंताजनक’ श्रेणीत असलेला एकमेव देश आहे.

 7. अहवालात मूल्यमापनासाठी वापरण्यात येणार्‍या ‘बालकाचे कमी वजन’ या घटकाला 'वास्टिंग (बालकाची खुंटलेली वाढ)' आणि ' स्टंटिंग (बालकाला येणारा थकवा)' या घटकांनी बदलले गेले आहे.

 8. जगभरात लोकांना खाण्या-पिण्याच्या वस्तू कश्याप्रकारे आणि किती प्रमाणात उपलब्ध होतात याला प्रदर्शित करण्याचे GHI हे एक माध्यम आहे. देशांकडून प्राप्त होणार्‍या आकड्यांपासून या विश्लेषणात्मक अभ्यासातून उपासमार या समस्येविरुद्ध देशांच्या सरकारचे चाललेले प्रयत्न प्रदर्शित करते.

 9. सन 2006 मध्ये पहिल्यांदा ‘वेल्ट हंगरलाइफ’ नामक जर्मनीच्या स्वयंसेवी संस्थेने ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ प्रसिद्ध केला होता, जी इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट (IFPRI) च्या अहवालाखाली काम करते.

 


Top