1. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना 25 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या घटनेला चिन्हांकित करण्यासाठी हा दौरा होता. या भेटीदरम्यान दोन्ही देशांनी आपले द्वैपक्षीय संबंध सुधारण्यासाठी 10 करारांवर स्वाक्षर्‍या केल्या. हे करार पुढीलप्रमाणे आहेत
 2. भारत सरकारचे युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय आणि बेलारूसचे शिक्षण मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार
 3. व्यावसायिक शिक्षणाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी भारत सरकारचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आणि बेलारूसचे शिक्षण मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार
 4. वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्यासाठी भारतीय राष्ट्रीय विज्ञान प्रबोधिनी  (INSA) आणि बेलारूसचे नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यात करार
 5. कृषी संशोधन व शिक्षण क्षेत्रात सहकार्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली आणि बेलारूसीयन स्टेट अॅग्रिकल्चरल अकॅडेमी, गोरकी यांच्यात सामंजस्य करार
 6. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि बेलारूसच्या कृषि व अन्न मंत्रालय यांच्यात 16 एप्रिल 2007 रोजी झालेल्या करारात दुरुस्ती करणारे राजशिष्टाचार दस्तऐवज
 7. वर्ष 2018-2020 साठी संस्कृतीच्या क्षेत्रात भारत सरकार आणि बेलारूस सरकार यांच्यामध्ये सहकार्य कार्यक्रम
 8. तेल व वायू क्षेत्रात भारत सरकारचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय आणि बेलारूसीयन स्टेट कंसर्न ऑफ ऑइल अँड केमेस्ट्री यांच्यात सामंजस्य करार
 9. "बेल्झारूबेझेस्ट्रोय" हे संयुक्त विशेष उपक्रम (JSV) आणि नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार
 10. JSC बेलारूसीयन पोटॅश कंपनी (BPC) आणि इंडियन पोटॅश लिमिटेड (IPL) यांच्यात सामंजस्य करार
 11. बेलारूसची OJSC मिन्स्क ट्रॅक्टर वर्क्स कंपनी आणि भारतामधील किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड इंडिया, पुणे यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यास करार
 12. याशिवाय, भारत बेलारूसशी युरोशियन इकॉनॉमिक यूनियन (EEU) आणि इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरीडोर यासारख्या बहुपक्षीय आर्थिक पुढाकारांच्या अंतर्गत जुळलेला आहे. भारत EEU सोबत मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी करत आहे.


 1. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद  यांच्या हस्ते 12 सप्टेंबर 2017 रोजी ‘#ओपन गोव्ह डाटा हॅक (#OpenGovDataHack)’  या राष्ट्रव्यापी हॅकथॉनचे उद्घाटन करण्यात आले आहे.
 2. स्टार्टअप पर्यावरण विकास कार्यक्रमाचा एक भाग म्हणून  राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) आणि  भारतीय इंटरनेट आणि मोबाईल मंडळ (IAMAI) हे संयुक्तपणे भारतामधील  7 राज्यांमध्ये/शहरांमध्ये 24 तासांच्या हॅकथॉनचे आयोजन करणार आहेत.
 3.  मुख्यतः ओपन गवर्नमेंट डेटाच्या वापरातून पेयजल व स्वच्छता, वाहतूक, शिक्षण, गुन्हेगारी आणि आरोग्य विषयक भारतीयांच्या नव्या विचारधारा अॅप्स / इन्फोग्राफिक्समध्ये विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम आहे.


 1. मार्टिना हिंगिसने तैवानच्या चॅन युंग-जॅनसह खेळताना अमेरिकन खुल्या टेसिन स्पध्रेतील  महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. 
 2. स्वित्र्झलडच्या या 37 वर्षीय खेळाडूचे कारकीर्दीतील 25वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद आहे. 
 3. हिंगिस व युंग-जॅन यांनी अंतिम फेरीत  चेक प्रजासत्ताकच्या ल्युसी हॅराडेका आणि  कॅटेरिना सिनिआकोव्हा यांच्यावर 6-3, 6-2असा सहज विजय मिळवला.
 4. हिंगिसने महिला दुहेरीतील 13, महिला एकेरीत पाच आणि मिश्र दुहेरीत 7 ग्रॅण्डस्लॅम नावावर केले आहेत. 
 5. मार्टिना हिंगिसने 1997 मध्ये अमेरिकन, ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन स्पध्रेतील एकेरीचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर तिने 1998 आाणि 1999 मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेत याची पुनरावृत्ती केली. 
 6. या हंगामातील हिंगिसचे हे तिसरे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद आहे. तिने  विम्बल्डन आणि  अमेरिकन  खु ल्या स्पध्रेतील मिश्र दुहेरीचे जेतेप द नावावर केले आहे. तसेच यंदा सहा डब्लूटीए दुहेरी विजेतेपदही तिच्या नावावर आहेत.


 1. 2017 सालासाठीच्या प्रतिष्ठित 'मॅन बुकर' पुरस्काराची लघुयादी 13 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. या यादीत ब्रिटन व अमेरिकेच्या लेखकांचा वरचष्मा आहे, मात्र दीर्घकाळापासून या यादीत राहत आलेल्या एकमेव भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा मात्र या वेळी त्यात समावेश झाला नाही.
 2. ' दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज' या पहिल्याच पुस्तकासाठी अरुंधती रॉय यांना 1997 साली 50 हजार पौंड्सचा 'मॅन बुकर' साहित्यिक पुरस्कार मिळाला होता. 
 3. ' दि मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस' या नव्या कादंबरीसाठी त्यांचे नाव या वर्षीच्या दीर्घ यादी होते. 
 4. ' भारताच्या अंतर्भागातून आलेले  समृद्ध आणि महत्त्वाचे पुस्तक' असे त्याचे वर्णन परीक्षकांनी केले होते. 
 5. तसेच  17 ऑक्टोबरला येथील गिल्डहॉलमध्ये जाहीर होणार असलेल्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी  अंतिम सहा लेखकांमध्ये स्पर्धा होणार आहे.
 6. 3 महिला व 3 पुरुष लेखकांची नावे असलेल्या लघुयादीमध्ये ग्रामीण इंग्लंडमध्ये आपले स्वावलंबन टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुटुंबाच्या संघर्षांपासून ते नागरी युद्धाच्या काळात एका अनाम शहरातून पळून जाऊ इच्छिणाऱ्या 2 निर्वासितांच्या शृंगारिक कथेपर्यंतचे व्यापक विषय आहेत. 
 7. 2017 साठीच्या पुरस्काराच्या परीक्षक मंडळाच्या अध्य क्ष  बॅरोनेस लोला यंग या होत्या.


Top