World Bank's Kristalina Georgieva became 2nd female IMF chief

जागतिक बँकेच्या वरिष्ठ अधिकारी क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदी निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या नावाला कोणीही विरोध केलेला नाही. बल्गेरियाच्या असलेल्या जॉर्जिव्हा या माजी व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तिन लॅगार्ड यांची जागा घेणार आहे. लॅगार्ड यांनी युरोपीयन सेंट्रल बँकेच्या प्रमुखपदी निवड झाली आहे.


world’s highest Ladakh Marathon 2019

  • 7 आणि 8 सप्टेंबर 2019 रोजी जम्मू व काश्मीरच्या लेह या शहरात जगातली सर्वोच्च उंचीवरची धावशर्यत असलेल्या ‘लद्दाख मॅरेथॉन’ची आठवी आवृत्ती आयोजित केली गेली होती.

 

  •  या कार्यक्रमात भारताच्या विविध भागातून आणि 25 परदेशांमधून 6 हजाराहून अधिक धावपटू सहभागी झाले होते. हा कार्यक्रम लद्दाख ऑटोनोमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल (LAHDC) यांच्याद्वारे प्रायोजित होता.

 

  •  72 किलोमीटर अल्ट्रा खारडुंग ला चॅलेंज - शबीर हुसेन (पुरुष), क्रिस्टीना वॉल्टर (आयर्लंड)

 

  • 42 किलोमीटर फूल मॅरेथॉन - जिग्मेट डोल्मा (महिला) (सलग तिसर्या वर्षी अव्वल स्थान), शबीर हुसेन (पुरुष)

 

  • हाफ मॅरेथॉन (महिला) - ताशी लाडोल


Chief election commissioner Sunil Arora took charge as chairman of Association of World Election Bodies (AWEB)

  • भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा ह्यांनी 3 सप्टेंबर 2019 रोजी असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (AWEB) या आंतरराष्ट्रीय संघाचे अध्यक्षपद स्वीकारले.

 

  • सन 2019 ते सन 2021 या कालावधीसाठी AWEBचे अध्यक्षपद रोमानियाकडून भारताकडे सोपविण्यात आले आहे.2017 साली झालेल्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला होता.

 

  • रोमानियाचे प्रतिनिधी आयन मिनकू रेड्यूलेस्कू ह्यांनी AWEBचा ध्वज सुनील अरोरा ह्यांना सोपवला आणि आता हा ध्वज सन 2021 पर्यंत भारताकडे राहणार.

​​​​​​​

  • अरोरा यांनी अशी घोषणा केली की दस्तऐवज निर्मिती, संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नवी दिल्लीतल्या ‘इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेन्ट (IIIDEM) या संस्थेमध्ये एक AWEB केंद्र सुरू केले जाणार आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.