Announcing the 65th National Film Awards

 1. भारत सरकारकडून दिल्या जाणार्‍या यंदाच्या 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
 2. चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. 3 मे 2018 रोजी हे सर्व पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
 3. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील.
 4. मराठी चित्रपटसृष्टीत निर्मित:-
  1. सर्वोत्कृष्ट बालचित्रपट – म्होरक्या
  2. स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) – म्होरक्या – यशराज कऱ्हाडे
  3. सर्वोत्कृष्ट संकलन – मृत्युभोग
  4. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (लघुपट) – नागराज मंजुळे (पावसाचा निबंध)
  5. सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन फीचर) – मयत (सुयश शिंदे)
  6. सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट – चंदेरीनामा (राजेंद्र जंगले)
  7. नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) – धप्पा (निपुण धर्माधिकारी)
 5. सर्वोत्कृष्ट चित्रपट (भाषेनिहाय):-
  1. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – कच्चा लिंबू
  2. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – न्यूटन (निर्माता अमित मसुरकर)
  3. सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट- गाझी
  4. सर्वोत्कृष्ट लद्दाखी चित्रपट- वॉकिंग विद द विंड
  5. सर्वोत्कृष्ट तामिळ चित्रपट- टू लेट
  6. सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट- मयूरक्षी
  7. सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट- हेब्बत रामाक्का
  8. सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट- थोंडीमुथलम दृक्शियम
  9. सर्वोत्कृष्ट ओरिया चित्रपट- हॅलो आर्सी
  10. सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट- दह..
  11. सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट- इशू
 6. अन्य पुरस्कारांची यादी:-
  1. दादासाहेब फाळके पुरस्कार - विनोद खन्ना (मरणोत्तर)
  2. सर्वोत्कृष्ठ अभिनेता - अक्षय कुमार (रूस्तम चित्रपटासाठी)
  3. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी (मॉम)
  4. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – दिव्या दत्ता (इरादा)
  5. सर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं – अब्बास अली मोगल (बाहुबली 2)
  6. सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स - बाहुबली 2
  7. सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन – गणेश आचार्य (गोरी तू लठ मार – टॉयलेट एक प्रेम कथा)
  8. स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) – अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन)
  9. सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर- ए.आर. रहमान (मॉम)
  10. ‘न्यूटन’ चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांना राष्ट्रीय पुरस्कार
  11. सर्वोत्कृष्ठ अॅनिमेशन चित्रपट - फिश करी
  12. सर्वोत्कृष्ठ चित्रपट (नॉन फिचर) - वॉटर बेबी
 7. दादासाहेब फाळके पुरस्कार:- 
  1. दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपट उद्योगामध्ये भारताचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.
  2. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाढ आणि विकासामधील उल्लेखनीय योगदानाकरिता भारत सरकारद्वाकडून दिला जातो.
  3. पुरस्कारामध्ये सुवर्ण कमळ स्मृतीचिन्ह, 10 लाख रुपये रोख आणि एक शाल यांचा समावेश आहे.
  4. हा पुरस्कार प्रथम 1969 मध्ये सादर करण्यात आला.
 8. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार:-
  1. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतीय चित्रपट सृष्टीत भारत सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित असा प्रमुख पुरस्कार आहे.
  2. हे पुरस्कार 1954 सालापासून दिले जात आहेत.
  3. सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे दोन पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटाना देण्यासोबतच बाकीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चित्रपटाच्या इतर कलात्मक आणि तांत्रिक अंगांसाठी दिले जातात.


 ISRO sent 'IRNSS-1I' navigation satellite to space

 1. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 12 एप्रिलला श्रीहरिकोटाच्या अंतराळ केंद्रावरून PSLV-C41 प्रक्षेपकाद्वारे ‘IRNSS-1I’ उपग्रह अंतराळात यशस्वीरीत्या सोडण्यात आले आहे.
 2. IRNSS-1I उपग्रह हा भारताच्या ‘NavIC’ नावाच्या स्वदेशी सुचालन प्रणालीचा एक भाग आहे.
 3. IRNSS-1I:-
  1. 1,425 किलोग्राम वजनी ‘IRNSS-1I’ सुचालन (दिशादर्शक) उपग्रह उप-भौगोलिक समांतर कक्षेत (सब-GTO) स्थापन करण्यात येत असलेल्या ‘भारतीय प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणाली (IRNSS)’ प्रकल्पाचा नववा उपग्रह आहे.
  2. हा उपग्रह IRNSS-1H ची जागा घेणार, ज्याचे प्रक्षेपण 31 ऑगस्ट 2017 रोजी अयशस्वी झाले होते.
  3. याचा कार्यकालावधी 10 वर्षांचा निश्चित करण्यात आला आहे.
 4. ‘NavIC’ प्रणाली:-
  1. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भारताची स्वत:ची GPS प्रणाली सुरू करणार आहे. ही प्रणाली ‘इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम (IRNSS)’ किंवा ‘NavIC’ सेवा या नावाने ओळखली जाईल.
  2. IRNSS दोन प्रकारच्या सेवा प्रदान करणार - सर्व वापरकर्त्यांसाठी स्टँडर्ड पोजिशनिंग सर्व्हिस (SPS) आणि केवळ अधिकृत वापरकर्त्यांसाठी रेस्ट्रीक्टेड सर्व्हिस (RS). 
  3. ‘NavIC’ प्रणाली ही ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (GPS) सेवेप्रमाणेच आहे. भारताकडून ‘NavIC’ या नावाने ‘भारतीय प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणाली (IRNSS)’ उभारण्यासाठी एकूण सात उपग्रहांचा वापर केला जाणार आहे. सात सुचालन उपग्रहांमधील पहिला IRNSS-1A उपग्रह तीन रुबिडियम अटॉमिक क्लॉक बंद पडल्यामुळे निष्प्रभावी झाले आहे.
  4. ही प्रणाली भारताच्या सर्व बाजूंनी सुमारे 1500 किलोमीटरच्या सीमेच्या आत कार्य करणार आहे. ही प्रणाली वापरकर्त्या संस्थेला रस्त्यावर आणि समुद्रात त्यांचे वाहन चालविण्यासाठी योजनेची आखणी करण्यास आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करणार आहे.
  5. आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडनार्‍या मच्छीमारांना याद्वारे सावध केले जाऊ शकते आणि लोकांना त्यांना आवश्यक असलेला पत्ता शोधण्यास मदत होऊ शकणार. शिवाय दूरसंचार आणि पॉवर ग्रीड कार्यामध्येही याची मदत होऊ शकते.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)
 1. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे.
 2. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे.
 3. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले.
 4. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.
 5. ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केला.
 6. 1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पाहिल्यादा प्रक्षेपित करण्यात आला.
 7. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रायान-1’ मोहीम यशस्वी झाली.
 8. त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.


 The 8th Meeting of 'Regional 3-R Forum' concluded in Indore

 1. 9-12 एप्रिल 2018 या काळात भारतात इंदौर (मध्यप्रदेश) मध्ये आशिया आणि प्रशांत क्षेत्रातल्या ‘रिजनल 3-R फोरम’ ची आठवी बैठक पार पडली.
 2. बैठकीच्या शेवटी ‘मिशन झीरो वेस्ट’ (शून्य कचरा मोहीम) चे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी इंदौर 3R जाहीरनामा स्वीकारला गेला. 
 3. भारत सरकारच्या गृहनिर्माण व नागरी कल्याण मंत्रालय आणि जपान सरकारचे पर्यावरण मंत्रालय यांच्या सहकार्याने संयुक्त राष्ट्रसंघाचे क्षेत्रीय विकास केंद्र (UNCRD) तर्फे ही परिषद "अचिव्हिंग क्लीन वॉटर, क्लीन लँड अँड क्लीन एयर थ्रू 3R अँड रिसोर्स एफीश्यंसी – ए 21स्ट सेंचुरी व्हिजन फॉर एशिया – पॅसिफिक कम्यूनिटीज” या विषयाखाली आयोजित करण्यात आली होती.
 4. 3-R - रिड्यूस (कमी करणे), रीयूज (पुनर्वापर) आणि रीसायकल (पुनर्नवीनीकरण) – या सिद्धांतावर आधारित या परिषदेचे उद्घाटन लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले होते.
 5. 3-R फोरमची पुढील बैठक थायलंड सरकार बँकॉकमध्ये आयोजित करणार आहे.
 6. संयुक्त राष्ट्रसंघाचे क्षेत्रीय विकास केंद्र (United Nations Centre for Regional Development -UNCRD) क्षेत्रीय विकासासाठी 18 जून 1971 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) आणि जपान सरकार यांच्यात झालेल्या करारानुसार 1971 साली स्थापित करण्यात आले.


 Rajni Tilak, leader of Dalit feminist movement, died

 1. दलित अधिकार कार्यकर्त्या आणि लेखिका रजनी तिलक यांचे दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले.
 2. लेखिका, उत्तम संघटक व दलित स्त्रीवादी आंदोलनाच्या नेत्या अशी बहुविध ओळख असलेल्या रजनी तिलक या महिलांसाठी तारणहार होत्या.
 3. धार्मिक व पितृसत्ताक अवडंबरे झुगारून देताना जातिअंताच्या लढाईसाठी त्यांनी निर्णायक आंदोलन छेडले. 
 4. रजनी तिलक यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि त्यांच्या सन्मानासाठी नेहमीच आवाज उठवला.
 5. पितृसत्ताक पद्धतींविरुद्ध त्यांनी लढा दिला, शिवाय जातिवादालाही हादरे दिले. ‘पदचाप’ व ‘हवा सी बेचैन युवतियाँ’ हे त्यांचे दोन कवितासंग्रह बरेच गाजले.
 6. त्यांचे ‘अपनी जमीं अपना आसमां’ हे आत्मचरित्र प्रशंसेस पात्र ठरले. उत्तर भारतीय दलित महिलांवरील अत्याचाराचे अनुभव त्यांनी प्रभावीपणे लेखणीतून मांडले.
 7. ‘बेस्ट ऑफ करवा चौथ’ हा त्यांचा नवा कथासंग्रह असाच वाचनीय व विचारांना प्रेरणा देणारा आहे.
 8. बामसेफ, दलित पँथर, आव्हान थिएटर, नॅशनल फेडरेशन ऑफ दलित विमेन, वर्ल्ड डिगनिटी फोरम, दलित लेखक संघ, राष्ट्रीय दलित महिला आंदोलन या  संस्थांशी त्या निगडित होत्या.
 9. सेंटर फॉर अल्टरनेटिव्ह दलित मीडिया या संस्थेच्या त्या कार्यकारी संचालकही होत्या. ‘अभिमूकनायक’ या वृत्तपत्राचे संपादन त्या करीत असत.
 10. पुणे येथील दलित महिला परिषदेत त्यांना आंबेडकरी महिला चळवळीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता.
 11. दलितांच्या अधिकारांसाठी अविरत संघर्ष करणाऱ्या तिलक यांच्या निधनाने दलित अधिकार चळवळ आणि दलित साहित्याची मोठी हानी झाली आहे. 


Top