SPORTS HIGHEST AWARD MAHARASHTRA

 1. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हे राज्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानले जातात. या पुरस्कारांची क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी घोषणा केली. यात औरंगाबादचा झेंडा सातासमुद्रापार फडकवणाऱ्या प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे.

 2. 17 फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे या पुरस्कारांचे वितरण राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार आहे. अमेय शामसुंदर जोशी आणि सागर श्रीनिवास कुलकर्णी या औरंगाबादच्या दोन प्रशिक्षकांना जिम्नॅस्टिक्स या खेळात थेट पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 1 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि ब्लेझर असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.

 3. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात अमेय जोशी आणि सागर कुलकर्णी या दोन प्रशिक्षकांची उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (सन 2017-18) यासाठी निवड झाली आहे.

 4. अमेय जोशी औरंगाबादला एका खाजगी कंपनीत उपव्यवस्थापक या पदावर काम करतात. तर सागर कुलकर्णी हे मराठवाडा शारिरीक शिक्षण महाविद्यालयात सहयोगी क्रीडा प्राध्यापक म्हणून काम करतात.


VIDHEYAK INVESTMENT

 1. नियमबाह्य गुंतवणूक मिळविणाऱ्या देशभरातील सर्व पोंझी योजनांवर बंदी घालणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. विधेयकातील नियम बनविताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी सरकारने ठेवलेल्या नाहीत, असे प्रतिपादन वित्तमंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी केले.

 2. ‘नियमबाह्य ठेव योजना बंदी विधेयक 2018’ नावाच्या या विधेयकात गुंतवणूकदारांना भरपाई देण्याची तरतूद आहे. वित्तविषयक स्थायी समितीने केलेल्या शिफारशीही यात समाविष्ट केल्या आहेत.

 3. विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गोयल यांनी सांगितले की, देशात अनधिकृत गुंतवणूक योजनांची संख्या 978 आहे. त्यातील सर्वाधिक 326 अनधिकृत योजना पश्चिम बंगालमधील आहेत. एक तृतीयांशपेक्षा जास्त योजना या राज्यातील आहेत.

 4. तसेच गोयल यांनी सांगितले की, अनधिकृत गुंतवणूक योजना रोखण्यासाठी सरकारने तातडीने हालचाली केल्या आहेत. हे विधेयक तयार करताना विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्रुटी राहणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

 5. हे विधेयक 12 फेब्रुवारी रोजी सभागृहात सादर करण्यात आले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधेयकास सभागृहाने आवाजी मतदानाने मंजुरी दिली.

 6. पोंझी योजनांतून छोट्या गुंतवणूकदारांना लक्ष्य करण्यात येते. त्यांची फसवणूक होणार नाही, अशा तरतुदी विधेयकात आहेत. हे विधेयक कंपन्यांना गोरगरिबांचा कष्टाचा पैसा लुबाडण्यापासून तसेच बेकायदेशीररीत्या ठेवी स्वीकारण्यापासून रोखील, असा विश्वास सरकारला वाटतो.


UDAY DESHPANDE

 1. मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. याचप्रमाणे क्रिकेटपटू स्मृती मानधना, स्क्वॉशपटू महेश माणगावकर, टेनिसपटू ऋतुजा भोसले यांच्यासह 55खेळाडूंना राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी 2017-18 चा शिवछत्रपती पुरस्कार घोषित केला आहे. 

 2. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 15 जणांना घोषित करण्यात आला. तसेच राज्य क्रीडा साहसी पुरस्कार साताऱ्याच्या प्रियंका मोहितेला (गिर्यारोहण) देण्यात येणार आहे. येत्या रविवारी, 17 फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे होणाऱ्या समारंभात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

 3. ‘शिवछत्रपती पुरस्कारांच्या निवडीत होणारे वाद टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणून योग्य त्या खेळाडू-संघटक-मार्गदर्शक यांची निवड केली असून त्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे,’ असे तावडे यांनी पुरस्कांची घोषणा करताना सांगितले.


GUJJAR RESERVATION IN RAJASTHAN

 1. राजस्थानमध्ये आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या गुज्जरांसह अन्य चार जातींना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात आले असून यासंबंधीचे विधेयक राज्य विधिमंडळामध्ये मंजूर करण्यात आले.

 2. दरम्यान, आरक्षण आंदोलनाचा ज्वालामुखी भडकल्यानंतर राज्य सरकारने आंदोलकांसमोर अखेर नमती भूमिका घेतली.

 3. मागील दोन दिवसांपासून गुज्जर नेते किरोडीसिंह बैंसला यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलकांनी रस्त्यावर उतरून रेल आणि रास्ता रोको आंदोलन करत जाळपोळही सुरू केली होती, यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता.

 4. मागील काही दिवसापासून गुज्जर आंदोलक हे महामार्गावर ठाण मांडून बसले असून, त्यांनी सवाई माधोपूर जिल्ह्यामध्ये दिल्ली-मुंबई महामार्गावरील वाहतूक रोखून धरली आहे. राज्य सरकारने विधिमंडळामध्ये सादर केलेल्या विधेयकामध्ये मागास वर्गाचे आरक्षण 21 टक्‍क्‍यांवरून 26 वर नेण्याची मागणी केली होती.

 5. तर यामध्ये गुज्जरबंजारागडिया लोहाररायका आणि गदरिया या जातींना देण्यात आलेल्या पाच टक्के आरक्षणाचाही समावेश आहे. हे पाचही जातसमूह अतिमागास असून त्यांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वेगळे आरक्षण देणे गरजेचे असल्याचे राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.


DIN VISHESH

 1. 14 फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे‘ म्हणून साजरा केला जातो.

 2. पहिला मुघल सम्राटहिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1483 मध्ये झाला.

 3. सन 1881 मध्ये भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना झाली.

 4. सन 1924 मध्ये संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एम ची स्थापना झाली.

 5. सन 1946 यावर्षी बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.


Top

Whoops, looks like something went wrong.