Mukesh ambani asia richest person

 1. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेआहेत. त्यांनी चीनचे जॅक मा यांना श्रींमतीमध्ये मागे टाकले आहे. जॅक मा हे अलिबाबा ग्रुपचे संस्थापक आहेत.
 2. मागच्या दोन दिवसात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने दोन महत्वाचे टप्पे गाठले आहेत.
 3. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर बाजारातील भांडवली हिस्सा 100 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला तर दुसऱ्या बाजूला रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मुल्य सात लाख कोटीच्या पुढे गेले.
 4. आता स्वत:हा मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे.
 5. मुकेश अंबानी यांनी याआधी सुद्धा चिनी उद्योगपतीवर मात केली आहे. यापूर्वी त्यांनी डिसेंबर 2017 मध्ये अंबानी यांनी हुई का यान या चिनी उद्योगपतीला श्रीमंतीमध्ये मागे टाकले होते.
 6. तेलापासून ते मोबाईलपर्यंत मुकेश अंबांनी यांच्या कंपन्यांचे साम्राज्य विस्तारलेले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे.


vinayak samant appointed as mumbai ranji team coach

 1. मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी माजी यष्टीरक्षक फलंदाज विनायक सामंत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याचसोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनने विल्कीन मोटा यांची मुंबईच्या 19 वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे.
 2. आगामी रणजी हंगामापर्यंत विनायक सामंत मुंबईचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. मुंबईत झालेल्या बैठकीनंतर एमसीएचे सह सचिव उन्मेश खानविलकर यांनी सामंत व विल्कीन मोटा यांच्या नेमणूकीबद्दलची घोषणा केली आहे.
 3. माजी प्रशिक्षक समीर दिघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईच्या प्रशिक्षकपदाची जागा रिक्त होती.
 4. विनायक सामंत यांनी राजस्थानचे माजी खेळाडू प्रदीप सुंदरम आणि मुंबईचा माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार यांच्यावर मात करत मानाचे प्रशिक्षकपद मिळवले आहे.
 5. स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघाचा मोठा दबदबा आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेचे सर्वाधीक वेळा विजेतेपद मुंबईने पटकावले आहे.


hima has won gold medal in 400 meter

 1. आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेतील भारताचा ट्रॅक प्रकारातील सुवर्णपदकाचा दुष्काळ हिमा दासने संपुष्टात आणला. तिने 20 वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत 51.46 सेकंद अशी वेळ देताना सुवर्णपदकावर नाव कोरले.
 2. भारताने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघातर्फे आयोजित विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेत सिनिअर, ज्युनिअर व युवा गटात मिळवून पाच पदके जिंकली आहेत. मात्र, ही पाचही पदके फिल्ड इव्हेंटमधील आहेत.
 3. ट्रॅक इव्हेंटमधील हे पहिलेच यश सोनेरी ठरले. 18 वर्षीय हिमाने गेल्या वर्षी नैरोबी येथे झालेल्या विश्‍व युवा स्पर्धेत दोनशे मीटर शर्यतीत पाचवे स्थान मिळवले होते.
 4. निपुन दास यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या हिमाने चौथ्या लेनमधून पळताना संथ प्रारंभ केला. शेवटचे शंभर मीटर अंतर शिल्लक असताना तिने नेहमीप्रमाणे वेग वाढवून सुवर्णपदकाला गवसणी घातली.
 5. रुमानियाच्या आंद्रीया मिक्‍लोसने हिमाला गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला 52.07 सेकंदात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अमेरिकेची मॅन्सन टेलर ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली.


Top