current affairs, loksatta chalu ghadamodi

1. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेले रघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत आहेत.

2. ब्रेग्झिटनंतरचा ब्रिटन बाहेरच्या देशातील व्यक्तिला बँकिंग क्षेत्रातील हे सर्वोच्च स्थान देईल का हा प्रश्न आहे. ब्रिटनचं पतधोरण ठरवणं आणि या देशाचं आर्थिक स्थैर्य राखणं ही काम अराजकीय व्यक्तिवर सोपवली जातात आणि त्यादृष्टीनं ज्या नावांचा विचार सुरू आहे त्यात राजन यांचं नाव आघाडीवर आहे.

3.ब्रिटनची बँक ऑफ इंग्लंड ही शिखर बँक 325 वर्ष जुनी असून सध्या मार्क कार्नी गव्हर्नरपदी आहेत.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. लिया पुत्राजाया (मलेशिया) : कर्करोगाशी कडवी झुंज देत असलेला मलेशियाचा बॅडमिंटन स्टार ली चोंग वेई याने गुरुवारी निवृत्ती जाहीर केली.

2.कारकीर्दीत अनेक जेतेपदाचा मानकरी राहिलेल्या ३६ वर्षांच्या लीची आॅलिम्पिक सुवर्ण जिंकण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. महाराष्ट्रातील महानगरांच्या महापौरांनी आपल्याला प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार असायला पाहिजेत, अशी मागणी केली आहे.

2. जगातील बहुतेक महानगरांमध्ये पालिकांचा कारभार लोकनियुक्त महापौरांच्या हातात असतो. काही ठिकाणी नागरिक त्यांची प्रत्यक्ष निवड करतात तर काही ठिकाणी लोकप्रतिनिधी.

3. न्यू यॉर्क आणि लंडनसारख्या शहरांचे महापौर प्रत्यक्ष नागरिक तर स्पेनमधील बार्सेलोना आणि युरोपमधील अनेक शहरांचे महापौर लोकप्रतिनिधींमधून निवडले जातात.

4. शहरासंबंधीची धोरणे आणि नियम ठरविणे, नियोजन आणि विकासाचे नियमन करणे, करनिर्धारण आणि नागरी सेवांचे दर ठरविणे, प्रकल्प आखणे-राबविणे, पालिकेसाठी उत्पन्न मिळविणे, बजेट आणि खर्च करणे अशी सर्व कामे महापौरांच्या अधिकारात मोडतात.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. वॉशिंग्टन : भारतीय बाजाराची विशालता लक्षात घेऊन गुगलने काही खास उत्पादने विकसित केली व नंतर ती उत्पादने जागतिक बाजारातही नेण्यात आली, असे प्रतिपादन गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी केले.

2.सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे आहेत.

3. अमेरिका-भारत व्यापार परिषदेने भरवलेल्या ‘इंडिया आयडियाज्’ शिखर संमेलनात पिचाई यांनी हे वक्तव्य केले.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1.14 जून हा दिवस ‘जागतिक रक्त दाता दिन म्हणून पाळला जातो.

2. भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ ‘निळकंथा सोमायाजी‘ यांचा जन्म 14 जून 1444 मध्ये झाला.

3. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ‘अनाथ बालिकाश्रम‘ ही संस्था 14 जून 1896 मध्ये स्थापन केली.

4. भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची ‘वेव्हेल योजना‘ 14 जून 1945 रोजी जाहीर झाली होती.

5. ए.सी. किंवा डी.सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ 14 जून 2001 मध्ये पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.


Top

Whoops, looks like something went wrong.