1. केंद्रीय शासनाच्या भारतनेट कार्यक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारास मंजुरी मिळाली. या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 148 तालुके इंटरनेटने जोडण्यात येतील.
  2. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 7 हजार 451 गांवामध्ये भारतीय ब्रॉडबॅन्ड नेटवर्क सेवा पोहविण्यात आलेली आहे. पथदर्शी प्रकल्पातंर्गत नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायती पूर्णत: ब्रॉडबॅन्डशी जोडलेल्या आहेत. राज्यातील प्रथम डिजिटल जिल्ह्याचा मान नागपूर जिल्हाला मिळाला आहे.
  3. भारतनेटच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारात राज्यातील 148 तालुके ब्रॉडबॅन्डने जोडण्यात येणार आहेत. भारतनेट मध्ये ऑप्टिकल फाइबर नेटवर्कचे ब्रॉडबॅन्ड निर्माण करण्यात आले आहे. भारतनेट, ग्रामीण भारताला डिजिटल बनविण्याच्या दिशेने सुरू केलेली वाटचाल आहे.
  4. याअंतर्गत ग्रामीण ई-सक्षमीकरण होणार असून ई-शासनावर भर देण्यात आलेला आहे, जसे भुमी अभिलेख जन्म-मृत्य दाखले, आधार सेवा, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेशी (मनरेगा) संबंधित सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होतील.
  5. ई-हेल्थ केयर यामध्ये ऑनलाईन वैद्यकीय सल्ला, टेलीमेडीसीनद्वारे उपचार करणे, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनविषयक माहिती आदान-प्रदान करणे. ग्रामीण भागात अधिकाधिक इंटरनेट सुविधा पुरविणे, ई-व्यवसाय विकसित करणे, रोजगार वाढविणे अशा अनेक सुविधा भारतनेट अंतर्गत ग्रामीण भागात सहज उपलब्ध होतील.
  6. भारतनेटच्या पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण देशभरात 1 लाखापेक्षा अधिक ग्रामपंचायती ऑप्टिकल फाइबरने जोडण्यात आलेल्या आहेत. डिसेंबर 2017 पर्यंत या जोडलेल्या ऑप्टिकल फाइबरने भारतनेट सेवा ग्रामीण भारतात प्रदान करण्यात आली.


  1. आंध्रप्रदेशातील कृष्णा अभयारण्यात पहिल्यांदाच प्राण्यांची गणना होणार.
  2. आंध्रप्रदेशातील कृष्णा अभयारण्यमध्ये पहिल्यांदाच प्राण्यांची शिरगणती (गणना) केली जाणार आहे. हा जगातील सर्वात दुर्मिळ पर्यावरण असलेल्या प्रदेशांपैकी एक आहे तसेच हे क्षेत्र फिशिंग मांजरीसाठी प्रसिद्ध आहे..
  3. 194.8 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले हे क्षेत्र 1998 साली वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आणि तेव्हापासून तेथील प्राण्यांची गणनाच झालेली नाही.
  4. हे अभयारण्य कृष्णा आणि गुंटूर जिल्ह्यात पसरलेले आहे तसेच बंगालचा उपसागर आणि कृष्णा नदीच्या मध्यात वसलेले आहे.


Top