More and more Indians are becoming richer, but there is still inequality: Global Wealth Report

 1. क्रेडिट सुइस या संस्थेनी प्रसिद्ध केलेल्या ‘ग्लोबल वेल्थ रिपोर्ट 2018’ या अहवालानुसार, अलिकडच्या काही वर्षांत भारतीय श्रीमंत बनले आहेत, तर अतिश्रीमंत लोकांची संख्या कमी आहे.
 2. याउलट, जगाच्या तुलनेत भारतात आर्थिकदृष्ट्या उच्च असमानता आढळून आली आहे. या सर्वेक्षणात 5 अब्ज प्रौढांच्या संपत्तीचे विश्लेषन केले गेले.
 3. भारताविषयी - 
  1. प्रत्येक 10 भारतीयांपैकी केवळ एकाची संपत्ती $10,000 पेक्षा अधिक आहे.
  2. प्रत्येक व्यक्तीची सरासरी वैयक्तिक संपत्ती गेल्या काही वर्षांत वाढली आहे, परंतु वाढीचा दर कमी झाला आहे.
  3. अलिकडच्या काळात बिगर-आर्थिक मालमत्तेत स्थिरपणे वाढ झाली आहे, परंतु घरगुती कर्जात वाढ झाली आहे.
  4. भारतामधील दर प्रौढ व्यक्तीकडे सरासरी $1,289 एवढी संपत्ती आहे, जी $4,209 या जागतिक सरासरीपेक्षा बरीच कमी आहे.
  5. भारताच्या बाबतीत उच्च ‘गिनी कोईफिशिएंट’ आहे. म्हणजेच अधिक असमानतेसह गरीब देशांपैकी एक असा याचा अर्थ होतो.
  6. ‘गिनी कोईफिशिएंट’ हे असमानतेचे प्रमाण आहे, त्यात ‘0’ म्हणजे लोकसंख्येत एकूणच समानता आहे आणि ‘100’ म्हणजे पूर्ण असमानता आहे.
 4. जागतिक दृष्य -
  1. देशनिहाय एकूण संपत्तीच्या बाबतीत प्रथम क्रमांक  अमेरिकेचा लागतो आहे. त्यानंतर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  2. जून 2018 पर्यंत गेल्या 12 महिन्यांच्या कालावधीत एकूण जागतिक संपत्तीमध्ये $14 लक्ष कोटी (ट्रिलियन) एवढी वाढ होऊन ती $317 लक्ष कोटी एवढी झाली आहे, म्हणजेच संपत्तीचा वृद्धीदर 4.6% इतका होता.
  3. दर प्रौढामागे सरासरी संपत्तीच्या बाबतीत, स्वित्झर्लंड ($530,240) प्रथम स्थानी आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ($411,060) आणि अमेरिका ($403,970) यांचा क्रम लागतो.
  4. जागतिक संपत्तीमध्ये स्त्रियांचा वाटा लक्षणीय असून तो त्यांच्याकडे 40% जागतिक संपत्ती आहे.


Agreement between India and Morocco for legal assistance in criminal matters

 1. दिनांक 12 नोव्हेंबर 2018 रोजी भारत आणि मोरोक्को या देशांदरम्यान गुन्हेगारीसंबंधित बाबींमध्ये परस्पर कायदेशीर सहकार्यासंबंधी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
 2. या करारामुळे मोरोक्कोबरोबर द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत होईल आणि गुन्ह्यांचा प्रतिबंध, तपास तसेच दहशतवादी कृत्यांना आर्थिक मदत पुरवणाऱ्यांचा शोध, प्रतिबंध तसेच संपत्ती जप्त करण्यासाठी व्यापक कायदेशीर चौकट उपलब्ध होईल.
 3. मोरोक्को हा उत्तर आफ्रिका भागातला एक देश आहे.
 4. रबात हे देशाचे राजधानी शहर आहे.
 5. मोरोक्कन दिरहाम हे राष्ट्रीय चलन आहे.
 6. मोरोक्को आफ्रिकेतला एकमेव असा देश आहे, जो आफ्रिका संघाचा सदस्य नाही.
 7. मोरोक्को अरब संघाचा सदस्य आहे.  अटलांटिक महासागर व भूमध्य समुद्र या दोन्हीचे किनारे लाभलेला मोरोक्को हा फ्रान्स व स्पेन व्यतिरिक्त एकमेव देश आहे.


Amnesty International returned the honor given to Aung San Suu Kyi in Myanmar

 1. लंडन (UK) येथील अमेनेस्टी इंटरनॅशनल या जागतिक मानवाधिकार संघटनेनी म्यानमारच्या आंग सान सू की यांना 2009 साली बहाल केलेला ‘अॅम्बेसेडर ऑफ कोन्सायन्स अवॉर्ड’ हा सन्मान परत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. गेल्यावर्षी रोहिंग्या सशस्त्र गटाने पोलीस ठाण्यांवर केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर झालेल्या संघर्षात म्यानमारच्या सुरक्षा दलावर हत्याकांडाचा आरोप करण्यात आला.
 3. तेव्हापासून सुमारे 700,000 रोहिंग्या मुस्लीम लोकांनी बांग्लादेशकडे स्थलांतरण केले.
 4. अश्या आरोपांना म्यानमारच्या राष्ट्रीय सल्लागार मंत्री आंग सान सू की यांनी फेटाळण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे.
 5. म्यानमार हा आग्नेय आशियातला एक देश आहे.
 6. नॅयपिडॉ हे देशाचे राजधानी शहर असून बर्मीज क्याट राष्ट्रीय चलन आहे.


"Samudra shakti": India-Indonesia bilateral marine practice

 1. इंडोनेशियाच्या सुराबया बंदराजवळ भारत आणि इंडोनेशिया यांच्या नौदलांचा “समुद्र शक्ती 2018” या शीर्षकाखाली द्वैपक्षीय सागरी सराव आयोजित करण्यात आला आहे.
 2. हा कार्यक्रम 12 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर या काळात चालत आहे.
 3. दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रात तैनात भारतीय नौदलाचे ‘INS राणा’ या जहाजाने या सरावात भाग घेतला आहे.
 4. द्वैपक्षीय संबंध बळकट करणे, सागरी सहकार्य वाढवणे आणि सर्वोत्तम पध्दतींची देवाणघेवाण करणे हा या सरावाचा उद्देश आहे.
 5. इंडोनेशिया (दिपांतर प्रजासत्ताक) आग्नेय (दक्षिण पूर्व) आशिया आणि ओशिनिया येथील एक देश आहे.
 6. हा 17508 बेटांचा बेट राष्ट्र आहे आणि सुमारे 109 कोटी लोकसंख्येसह जगातला तिसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे.
 7. जकार्ता या देशाची राजधानी आहे आणि इंडोनेशियन रुपिआह हे चलन आहे.


Lewis Hamilton gave Mercedes the Constructors' Championship

 1. मर्सिडीजचा चालक लेविस हॅमिल्टनने साओ पावलो येथे झालेल्या ‘2018 ब्राझिलियन ग्रँड प्रिक्स’ या शर्यतीचे जेतेपद पटकावले आहे.
 2. या विजयाने मर्सिडीज संघाने सलग पाचव्या हंगामासाठी ‘कन्स्ट्रक्टर्स चॅम्पियनशिप’ जिंकले आहे.
 3. हॅमिल्टनचे हे कारकिर्दीतील 72वे जेतेपद आहे. रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने शर्यतीचे दुसरे आणि फेरारीच्या किमी रायकोनेनने रेड बुलच्या डॅनियल रिकार्डोला मागे टाकत तिसरे स्थान मिळविले.
 4. फॉर्म्युला वन वर्ल्ड कन्स्ट्रक्टर्स चॅम्पियनशिप (WCC) हा किताब पॅरिस (फ्रान्स) येथील आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघाने (FIA) हंगामात सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या फॉर्म्युला वन कन्स्ट्रक्टरला (म्हणजेच संघाला) दिला जातो.
 5. त्यासाठी ग्रँड प्रिक्सच्या परिणामांवर आधारीत गुणांवरून ठरवले जाते.
 6. कन्स्ट्रक्टर्स चॅम्पियनशिप हा किताब पहिल्यांदा 1958 साली वॅनवॉल या संघाला बहाल करण्यात आला.


Top