MoU for ISRO with Jammu University for setting up space centers

 1. विद्यापीठात ‘सतीश धवन अंतराळ विज्ञान केंद्र’ (Satish Dhawan Center for Space Science) याची स्थापना करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याने जम्मूमधील केंद्रीय जम्मू विद्यापीठासोबत (Central University of Jammu -CUJ) एक सामंजस्य करार केला आहे.
 2. जम्मू-काश्मीरमध्ये अश्या प्रकारची ही पहिलीच संस्था असेल.
 3. याव्यतिरिक्त, विद्यापीठाचा सेंट्रल सायंटिफिक इंस्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन (CSIR-CSIO) यांच्यासमवेत एक सामंजस्य करार केला गेला.
 4. या कराराच्या माध्यमातून अंतराळ संशोधन, खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, वातावरणविषयक विज्ञान आणि संलग्न क्षेत्रांमध्ये संशोधन करण्यासाठी युवा वर्गात जागृती निर्माण केली जाणार आहे.
 5. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे.
 6. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे.
 7. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले.
 8. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. 
 9. ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत संघाने प्रक्षेपित केला.
 10. 1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा प्रक्षेपित करण्यात आला.
 11. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली आणि चंद्रावर पोहचणारा भारत हा जगातला चौथा देश बनला.
 12. त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.


21% of Indian children have weight loss: Global Hunger Index (GHI)

 1. वैश्विक उपासमार निर्देशांक 2018 (Global Hunger Index -GHI) अनुसार, पाच वर्षाखालील प्रत्येक 5 भारतीय लहान मुलांपैकी कमीतकमी एकाचे वजन त्याच्या ऊंचीच्या मानाने अत्यंत कमी आहे, जे की तीव्र कुपोषणाला प्रतिबिंबित करते.
 2. सन 2013 ते सन 2017 या काळातल्या माहितीच्या आधारावर हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे.
 3. त्यासाठी चार निर्देशक विचारात घेण्यात आले आहे, ते आहेत – कुपोषण, (पाच वर्षांखालील मुलांसंबंधित) कमी वजन (उंचीप्रमाणे कमी वजन), खुंटीत वाढ (वयाप्रमाणे कमी ऊंची), आणि बाल मृत्युदर.
 4. ठळक बाबी :-
  1. 119 देशांसाठीच्या या निर्देशांकाच्या यादीत भारताचा 103 हा क्रमांक आहे.
  2. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताच्या क्रमवारीत तीन स्थानांची घसरण) झाली आहे. भारतातली उपासमार संबंधी पातळी "गंभीर" म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहे.
  3. भारतात कुपोषित लोकांची संख्या 2000 सालच्या 18.2% वरून 2018 साली 14.8% इतकी कमी झाली आहे. तर बाल मृत्युदर निम्मा म्हणजेच (9.2% वरून) 4.3% पर्यंत कमी झाला आहे आणि खुंटीत वाढ असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण 54.2% वरून 38.4% वर आले आहे.
  4. दक्षिण सुदानमध्ये लहान मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण 28% इतके सर्वाधिक आहे.
  5. अहवालानुसार, सध्याच्या प्रगतीचा दर पाहता, 2030 सालापर्यंत 50 देश उपासमार संबंधी पातळीच्या "कमी" श्रेणीपर्यंत पोहचण्यात अपयशी ठरणार आहेत.


India ranked 115th in the World Bank's Human Capital Index

 1. दिनांक 12 ऑक्टोबर 2018 रोजी जागतिक बँकेनी प्रसिद्ध केलेला मानवी भांडवल निर्देशांक (Human Capital Index -HCI) याच्या यादीत भारत 115 व्या क्रमांकावर राहिला आहे.
 2. यादीत सिंगापूरने पहिले स्थान पटकावले आहे.
 3. सिंगापूरपाठोपाठ दक्षिण कोरिया, जपान, हाँगकाँग आणि फिनलँड या देशांचा क्रमांक लागला आहे.
 4. ठळक बाबी:-
  1. जागतिक लोकसंख्येच्या केवळ 8% लोक उत्पादनक्षम आहेत, जे की इतर 75% लोकसंख्येच्या बरोबरीत आहे.
  2. उत्तर अमेरिका आणि युरोप या सारख्या प्रगत अर्थव्यवस्थांचे बहुतांश 0.75 पेक्षा जास्त HCI मूल्य आहे, तर दक्षिण आशिया आणि उप-सहारा आफ्रिका हे HCI मूल्य सर्वात कमी आहेत.
  3. 2009 सालापूर्वीच्या माहितीच्या आधारे, भारतासाठी HCI मूल्य 0.44 (म्हणजेच 44% उत्पादनक्षम) इतका अंदाजित केला गेला आहे. भारतात HCI महिलांसाठी पुरुषांपेक्षा थोडा चांगला आहे.
  4. भारतात जन्मलेल्या 100 मुलांपैकी 96 वयाच्या 5 वर्षानंतरही जगतात.
  5. भारतात वयाच्या चौथ्या वर्षी शाळेत दाखल झालेली मुले वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत शाळेत 10.2 वर्षे शिक्षण घेण्याची अपेक्षा करू शकतात.
  6. प्रौढांच्या जीवन दराच्या बाबतीत, भारतात 15 वर्ष वय असलेले 83% लोक वयाची 60 वर्ष पूर्ण करतील.
  7. भारतात 100 पैकी 38 लहान मुलांची खुंटीत वाढ आहे.
  8. हा निर्देशांक जागतिक बँकेच्या ‘वर्ल्ड डेवलपमेंट रीपोर्ट 2019: द चेंजिंग नेचर ऑफ वर्क’ या शीर्षकाखालील अहवालाचा एक भाग आहे.
  9. हा निर्देशांक लहान मुलांचे मृत्यूचे प्रमाण, आरोग्य आणि शिक्षण या आधारावर 157 देशांचे सर्व्हेक्षण करून तयार करण्यात आला आहे.
  10. जागतिक बँकेच्या मानवी भांडवल निर्देशांकाचा हा पहिलाच अहवाल आहे.
  11. मानवी विकास निर्देशांक (HDI) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) कडून तयार केला जातो.
  12. निर्देशांकाचे तीन घटक आहेत, ते म्हणजे – 5 वर्षाखालील मृत्यूदरानुसार बचावलेले जीव; गुणवत्तापूर्ण शिक्षणासह शाळांमधील अपेक्षित काळ; आणि आरोग्यविषयक पर्यावरण (प्रौढ जिवित दर आणि 5 वर्षाखालील मुलांच्या खुंटीत वाढीचा दर).


International Disaster Prevention Day: October 13

 1. दरवर्षीप्रमाणे दिनांक 13 ऑक्टोबर 2018 रोजी ‘रिड्युसींग डिझास्टर इकनॉमिक लॉसेस’ या विषयाखाली ‘आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन’ पाळण्यात आला आहे.
 2. यावर्षीचा विषय आपत्ती जोखीम निवारणासंबंधी सेंदाई आकृतिबंध (Sendai Framework on Disaster Risk Reduction -SFDRR) याच्या सात लक्ष्यांवर केंद्रित 2016 साली सुरू केलेल्या "सेंदाई सेव्हन" नावाच्या मोहिमेचा भाग म्हणून राखण्यात आला आहे.
 3. या वर्षी सेंदाई आकृतिबंधच्या ‘लक्ष्य – C’ यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, जे 2030 सालापर्यंत जागतिक GDPशी संबंधित आहे.
 4. ‘आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिन (किंवा आंतरराष्ट्रीय आपत्ती परिसीमन दिन / International Day for Disaster Reduction) पहिल्यांदा 1989 साली पळाला गेला.
 5. सुरूवातीला हा दिवस प्रत्येक ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या बुधवारी पाळला जात होता.
 6. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने या दिनासाठी 2009 सालापासून 13 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली.
 7. सन 2005 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून 'ह्योगो कृती आकृतिबंध' (Hyogo Framework for Action) ठरविण्यात आला.
 8. भारतात सन 2005 साली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण' (NDMA) याने आपत्ती निवारणाबाबत अनेक मार्गदर्शक सूत्रे ठरवून दिली आहेत.


After 111 days fast G. D. Agrawal passed away

 1. गंगा नदी वाचवण्यासाठी गेल्या 111 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले कानपूर IITचे माजी प्राध्यापक जी. डी. अग्रवाल यांचे दिनांक 11 ऑक्टोबरला निधन झाले.
 2. गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकार पातळीवर कोणत्याही उपायोजना न झाल्याच्या निषेधार्थ अग्रवाल आमरण उपोषणाला बसले होते.
 3. ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 4. अग्रवाल स्वामी ग्यान स्वरुप सानंद म्हणूनही ओळखले जात.
 5. त्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणून काम केले होते.
 6. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून गंगा नदीसाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केली होती.


Top