Asian Competitiveness Report 2018

 1. चीनच्या बोआओ एशिया मंचने (BFA) ‘आशियाई स्पर्धात्मकता अहवाल 2018’ प्रसिद्ध केला आहे. अहवालात आशियातल्या 37 अर्थव्यवस्थांच्या स्पर्धात्मकतेचे मूल्यांकन आणि विश्लेषण केले गेले आहे.
 2. जागतिक आर्थिक सुधारणा आणि आशियात क्षेत्रीय आर्थिक एकीकरण यामध्ये तेजी आल्याने आशियाची संपूर्ण अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे.
 3. व्यापार संरक्षण आर्थिक विकासाची स्थायी प्रेरणा शक्ती नसणार, परंतु आर्थिक विकासाच्या स्थिरतेला मर्यादित करणार, असे अहवालात व्यक्त केले गेले आहे.
 4. बोआओ एशिया मंच (BFA) याची निर्मिती जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या संकल्पनेवरून 2001 साली चीनकडून करण्यात आली.
 5. याची दरवर्षी वार्षिक बैठक घेतली जाते.
 6. यावर्षी 11 एप्रिलपर्यंत चालणारी बैठक चीनच्या हेनान प्रांतात दक्षिणी बेटामधील बोआओ या गावी सुरू होती.

‘आशियाई स्पर्धात्मकता अहवाल 2018’

 1. ठळक बाबी:-
 2. आशियात सिंगापूर हा सर्वात स्पर्धात्मक राष्ट्र ठरला आहे.
 3. स्पर्धात्मक राष्ट्रांच्या या यादीत शीर्ष 10 मध्ये सिंगापूरनंतर तायवान, चीन, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, हॉंगकॉंग, न्यूझीलंड, जपान, बहारिन आणि इस्रायल या देशांचा क्रमांक लागतो.
 4. आर्थिक विकासाची क्षमता, जागतिक आर्थिक विकासामध्ये योगदान आणि आर्थिक कार्यांची सुस्थिती यांसारख्या क्षेत्रावरून बघितल्यास चीन प्रथम स्थानी आहे.
 5. जागतिक आर्थिक पुनरुत्थान अंतर्गत आशियाची संपूर्ण अर्थव्यवस्था चांगली आहे.
 6. सन 2017 मध्ये उत्तर कोरिया वगळता पूर्व आशियातल्या अन्य अर्थव्यवस्थांचा स्थिर विकास झाला आहे.
 7. विदेशी गुंतवणूक आणि निर्यातमध्ये सुधारणा झाल्यामुळे आसियान जगातली सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.
 8. आग्नेय (दक्षिण पूर्व) आशियात अर्थव्यवस्थांचा स्वस्थ विकास देखील झाला. दक्षिण आशिया, मध्य आशिया, पश्चिम आशिया, ओशिनिया यांच्या बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्था आणि रशियाची अर्थव्यवस्था स्थिर दिशेने वाटचाल करीत आहे.


 The first time the American recognized the AI ​​tool for identifying diabetes mellitus

 1. प्रथमच अमेरिकेच्या अन्न आणि औषधे प्रशासन (FDA) ने देशाच्या बाजारपेठेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यावर आधारित उपकरणांच्या विपणनाला परवानगी दिली आहे, हे उपकरण मधुमेहामुळे होणार्‍या डोळ्यांच्या विकाराचे निदान करण्यासाठी उपयोगात येते.
 2. ‘IDx –DR’ नामक हे उपकरण एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे, जो कॅमेराद्वारे डोळ्यांच्या रेटीनाच्या प्रतिमांचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता यावर आधारित एल्गोरिदमच वापर करतो.
 3. डायबेटीक रेटिनोपॅथी हा मधुमेह असलेल्या लोकांमध्ये दृष्टी-नाश होण्याचे एक सामान्य कारण आहे.
 4. ज्यामध्ये रक्तातील साखरेच्या उच्च पातळीमुळे डोळ्यांच्या रेटिनाच्या रक्तवाहिन्या जखमी होतात.
 5. मधुमेह असलेल्या लाखो लोकांसाठी विकारापूर्वीच लवकर तपासणी होणे हा एक महत्त्वाचा भाग आहे, तरीही बरेच लोक या विकाराच्या बाबतीत जागरूक नाहीत.
 6. 50% लोक तर त्यांच्या डोळ्यांची वार्षिक आधारावर तपासणी करून घेत नाहीत.

‘IDx –DR’

 1. आयओवा स्थित IDx LLC या वैद्यकीय उपकरण कंपनीने ‘IDx –DR’ उपकरण विकसित केले आहे.
 2. चिकित्सक क्लाउड सर्व्हरवर रुग्णाच्या रेटीनाच्या डिजिटल प्रतिमा टाकणार, ज्यावर IDX -DR सॉफ्टवेअर प्रस्थापित केले जाते.
 3. हे उपकरण अगदी सामान्य मानसालाही हाताळता येण्याजोगे आहे.
 4. यामुळे एखाद्या चिकित्सकाकडून प्रतिमा किंवा परिणामांची व्याख्या जाणून घेण्याची गरज भासणार नाही, ते स्वताःच विकाराचे निदान करणार आहे.
 5. हे उपकरण मधुमेह असलेल्या प्रौढांमध्ये डायबेटीक रेटिनोपॅथी या डोळ्यासंबंधी विकाराच्या एका सौम्य पातळीपेक्षा जास्त प्रमाण शोधू शकण्यास सक्षम आहे.


 First health center under 'Ayushman Bharat' in Bijapur, Chhattisgarh

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 एप्रिल 2018 रोजी छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये ‘आयुष्मान भारत’ मोहिमेअंतर्गत देशातल्या पहिल्या हेल्थ अँड वेलनेस सेंटर (आरोग्य केंद्र) याचे उद्घाटन करण्यात आले आहे.
 2. यासोबतच ‘आयुष्मान भारत’ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.या वर्षभरात देशात 18,840 आरोग्य उपकेंद्रांना निरोगी केंद्रांमध्ये बदलण्याची योजना आहे.
 3. त्यासाठी 1200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 4. ‘आयुष्मान भारत - राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मोहीम (ABNHPM)’ या योजनेचे दोन घटक आहेत.
 5. पहिला 10.74 लक्ष कुटुंबांना मोफत 5 लक्ष रूपयांचा आरोग्य विमा प्रदान करणे आणि दुसरा म्हणजे हेल्थ अँड वेलनेस सेंटरची स्थापना करणे.
 6. देशभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना (PHC) अद्ययावत करून त्यांना हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये रूपांतरित केले जाणार आहे.
 7. या केंद्रांवर 12 प्रकारच्या आजारांवर उपचार दिले जातील आणि मोफत तपासणी सुविधा आणि औषधी मिळणार.
 8. महाराष्ट्रात 1450 केंद्रे प्रस्थापित केले जातील.


 Unveiling of 'Smart Impression Card' and 'e-Measurement Book' for CPWD

 1. गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीप पुरी यांच्या हस्ते केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) यासाठी PFMSच्या डिजिटल व्यासपीठावर ‘स्मार्ट इंप्रेस्ट कार्ड’ आणि ‘ई-मेजरमेंट बुक (e-MB)’ यांचे अनावरण करण्यात आले आहे.
 2. यासोबतच, ‘ई-मेजरमेंट बुक (e-MB)’ हे आर्थिक प्रगतीवर (म्हणजेच निधीचा वापर) देखरेख ठेवण्यासाठी नागरी मंत्रालयातील पहिले एकीकृत संकेतस्थळ आधारित घटक ठरणार आहे. 
 3. नागरी मंत्रालयात प्रथमच सुरु करण्यात आलेले ‘स्मार्ट इंप्रेस्ट कार्ड’ डिजिटल भारताचा भाग असून याद्वारे डिजिटल माध्यमातून रक्कम देऊ केली जाणार आहे.
 4. देशभर पसरलेल्या 400 हून अधिक कार्यालयांमध्ये हे कार्ड सुरू करण्याची योजना आहे.
 5. मुख्य मंत्रालयासाठी अॅक्सिस बँक, CPWD साठी भारतीय स्टेट बँक (SBI) आणि प्रिंटिंगसाठी IDBI बँक या तीन मान्यताप्राप्त बँका संपूर्ण भारतात सेवा देण्यासाठी MoHUA सोबत भागीदारी करीत आहेत.  
 6. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) संपूर्ण देशात सुमारे 15,000 प्रकल्प / कार्ये चालवितात, ज्यामध्ये दरवर्षी 15,000 ते 20000 कोटी रुपयांच्या वेतनांचा समावेश आहे.


 Bhanu Pratap Sharma appointed as Chairman of the Banks Board Bureau

 1. केंद्र सरकारकडून माजी CAG प्रमुख विनोद राय यांना बँक्स बोर्ड ब्युरो (BBB) च्या अध्यक्ष (चेअरमन) पदावरून हटविण्यात आले आहे आणि त्यांच्या जागी भानू प्रताप शर्मा यांची नियुक्ती केली आहे.
 2. सोबतच तीन नव्या सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्यामध्ये आहेत - वेदिका भंडारकर, पी. प्रदीप कुमार आणि प्रदीप पी. शाह.
 3. बँक्स बोर्ड ब्युरो (BBB) भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे.
 4. याच्या कार्यास एप्रिल 2016 पासून प्रारंभ झाला.
 5. याचे कार्यालय RBI च्या केंद्रीय कार्यालयात मुंबईमध्ये आहे.
 6. BBB शासकीय बँकांच्या कार्यात सुधारणा आणण्यासाठी भारत सरकारच्या 'इंद्रधनुष' धोरणाच्या सात घटकांपैकी एक आहे.
 7. यामध्ये पुनः-भांडवल, मालमत्तेची तनावमुक्तता, सक्षमीकरण, जबाबदारी आणि प्रशासन सुधारणांची कार्यचौकट यांचा समावेश आहे.


Top