Successful flight of the world's largest aircraft

 1. उपग्रह प्रक्षेपक अग्निबाण जमिनीवरील अंतराळ तळाऐवजी थेट आकाशातूनच खूप उंचीवरून सोडण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून अमेरिकेतील एका खासगी कंपनीने तयार केलेल्या जगातील आजवरच्या सर्वात मोठ्या विमानाने कॅलिफोर्नियातील मोजावे वाळवंटावरून प्रथमच दोन तासांचे यशस्वी उड्डाण केले. अंतराळ विज्ञानास नवी दिशा देणारे पहिले पाऊल म्हणून हा प्रयोग ऐतिहासिक मानला जात आहे.

 2. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे एक अब्जाधीश संस्थापक पॉल अ‍ॅलन यांनी गेल्या वर्षी दुर्धर आजाराने निधन होण्यापूर्वी खास ही मोहीम डोळ्यापुढे ठेवून स्थापन केलेल्या ‘स्ट्रॅटोलॉन्च’ या कंपनीच्या अजस्त्र आकाराचे हे विमान यशस्वीपणे हवेत उडाले याच्याएवढेच ते पुन्हा सुखरूपपणे जमिनीवर उतरले हेही लक्षणीय आहे.

 3. पंखांच्या पसाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठ्या अशा या विमानाने माजावे हवाई व अंतराळ तळावरून उड्डाण केले. दोन तासांच्या फेरफटक्यात या विमानाने ताशी 304 किमी एवढा कमाल वेग व 17 हजार फुटांची उंची गाठली.

 4. एकाला एक जोडलेल्या दोन विमानांनासारखे दिसणारे हे विमान कोणतीही अडचण न येता पुन्हा सुखरूपपपणे उतरले तेव्हा हे आश्चर्य पाहण्यासाठी हजर असलेल्या प्रक्षकांनी आनंदाने जल्लोश केला.


This year's Marathi literature sammelan will be held in Cambodia

 1. नववे विश्व मराठी साहित्य संमेलन 28 ऑगस्ट रोजी कंबोडियातील अंग्कोरवाट येथे आयोजित करण्यात आले आहे. विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष कॅप्टन नीलेश गायकवाड यांनी ही माहिती दिली.

 2. ‘पुरातन स्थापत्य शास्त्र’ हे या वर्षीच्या संमेलनाचे सूत्र असून, या वेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ज्येष्ठ लेखिका माधवी वैध यांनी केले.

 3. गायकवाड म्हणाले, ‘शिवसंघ प्रतिस्थान अनई विश्व मराठी परिषदेतर्फे हे संमेलन भरविण्यात येणार आहे. कंबोडियातील बाराव्या आणि तेरावहया शकतातील शेकडो मंदिरांची स्थापना हिंदू राजा सूर्यवर्ननने केली. आधुनिक साधनांशिवाय त्या मंदिरावरील अप्रतिम कोरीव नक्षी, मंदिराचे स्थापत्य शास्त्र हे यंदाचे संमेलन कंबोडियात आयोजित करण्यामागचा हेतु आहे. असे अलौकिक आणि अदभूत वास्तुशिल्प अनुभवण्याची संधि संमेलनानिमित्त नागरिकांना मिळणार आहे.

 4. यंदाही पुरातन स्थापत्य शास्त्र या ख्सेत्राशी संबंधित ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कलावंत आणि लेखक यात सहभागी होणार आहेत. याशिवाय मराठीतून विविध ज्ञान शाखांमध्ये अध्ययन, संशोधन, लेखन करणार्‍यांना संमेळाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत.


HDFC Bank 'Best Bank In The Country

 1. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

 2. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘फोर्ब्ज’ मासिकाने केलेल्या ‘वर्ल्ड्स बेस्ट बँक सर्व्हे’ या अभ्यासानुसार देशातील सर्वोत्तम बँकांच्या सूचीत एचडीएफसी बँकेने ग्राहककेंद्रित सेवांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ‘फोर्ब्ज’ने हा अहवाल मार्केट रिसर्च फर्म ‘स्टॅटिस्टा’च्या साह्याने केला असून, त्यामध्ये २३ देशांतील बँकांचा आढावा घेण्यात आला आहे.

 3. देशातील पहिल्या १० बँकांच्या सूचीत सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठ्या स्टेट बँकेला स्थान मिळवता आलेले नाही. आधुनिक तंत्रज्ञान आणि आपल्या ४.३० कोटी ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देऊन ‘एचडीएफसी बँके’ने देशातील बँकांमध्ये अग्रस्थान पटकावले आहे. ‘एचडीएफसी बँके’ पाठोपाठ खासगी क्षेत्रातीलच आयसीआयसीआय बँकेने दुसरा क्रमांक पटकावला असून, तिसरा क्रमांक सिंगापूरस्थित मुख्यालय असलेल्या डीबीएस बँकेने पटकावले आहे. त्या पाठोपाठ कोटक महिंद्र बँक आणि आयडीएफसी बँकेने अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट, पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक, विजया बँक आणि खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने अनुक्रमे सहा ते दहा क्रमांक पटकावले आहेत. स्टेट बँक सूचीत अकराव्या क्रमांकावर आहे. या सूचीत कॅनरा बँक तिसाव्या स्थानावर आहे.


Day special:

 1. 15 एप्रिल हा दिवस ‘जागतिक कला दिन‘ तसेच ‘जागतिक सांस्कृतिक दिन‘ म्हणून साजरा केला जातो.

 2. शीख धर्माचे संस्थापक, पहिले गुरु ‘गुरु नानक देव‘ यांचा जन्म 15 एप्रिल 1469 रोजी झाला होता.

 3. सन 1892 मध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली.

 4. आर.एम.एस. टायटॅनिक हे जहाज 1912 यासाली उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले होते.

 5. 15 एप्रिल 2013 हा दिवस संत साहित्याचे अभ्यासक ‘वि.रा. करंदीकर’ यांचा स्मृतीदिन आहे.


Top