स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांनी दिलेल्या भाषणामधील ठळक वैशिष्टये

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2017 रोजी देशाच्या 71 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकविण्याचा कार्यक्रम पार पडला.

ठळक मुद्दे:-

 1. भारतासाठी विशेष वर्ष - 8 ऑगस्ट 2017 रोजी ‘भारत छोडो’ आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झालीत. चंपारण सत्‍याग्रहाला आणि साबरमती आश्रमाला एक शतक पूर्ण झाले. शिवाय लोकमान्‍य टिळकांनी सुरू केलेल्या गणेश पूजन उत्सवाला 125 वर्ष पूर्ण झालीत.
 2. ‘न्यू इंडिया’ संकल्‍प - ‘न्यू इंडिया’चा संकल्‍प करून आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अग्रेसर करण्यास आव्हान करण्यात आले आहे.
 3. यशस्वी वित्तीय घटना - देशात 29 कोटी जनधन खाते उघडले गेलेत. 1 जुलै 2017 पासून देशात लागू झालेल्या वस्तु व सेवा कर (GST) प्रणालीमुळे देशात सहकार, स्पर्धात्मकता याला बहर आला आहे. GST मुळे तपास नाके उठवण्यात आले, यामुळे वाहतुकीचा वेळ तीस टक्क्यांनी वाचला. 01 एप्रिल ते 05 ऑगस्ट या काळात आयकर परतावा भरणार्‍यांमध्ये 56 लाख नवे व्यक्तिगत करदातांचा समावेश झाला, जी मागील वर्षी फक्त 22 लाख होती.
 4. काळापैसा विरोधी अभियान - काळ्यापैश्याविरुद्धच्या लढ्यात सरकारने आतापर्यंत 800 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त केली आहे. 1000 रुपये आणि 500 रुपये मूल्य असलेल्या बँकनोटांच्या बंदीमुळे भ्रष्‍टाचाराचा काळा पैसा बाद झाला. भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी विशेष अन्वेषण चमू (SIT) तयार करण्यात आली. यांनी तीन वर्षातच जवळपास सव्वा लाख कोटी रूपयांहून अधिक काळ्यापैशाचा तपास लावला. देशात तीन लाख फसव्या कंपन्या आढळून आल्या, ज्यापैकी आतापर्यंत पावणे दोन कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.
 5. पूर्णत्वास आलेल्या मागण्या - सैनिकांच्या ‘वन रॅंक - वन पेंशन’ मागणीवर तोडगा काढण्यात आला आहे आणि मागणी पूर्ण करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनंतरही वीज उपलब्ध नसलेल्या 14000 हून अधिक गावांमध्ये वीज पोहोचवण्यात आली आहे.
 6. शांतिमार्ग - जम्मू-काश्मीरचा विकास मुद्दा, क्षेत्र समस्या, दहशतवाद अश्या बाबींवर उपाय शोधण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि हे शांतिपूर्वक मार्गानेच संभव आहे.  
 7. कृषिजगत - यावर्षी देशात 16 लाख टन डाळीचे विक्रमी उत्पन्न निघाले. तीन वर्षापूर्वी फक्त 3.25 कोटी शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री फसल बीमा योजना लाभ घेतला होता. मात्र आज प्रधानमंत्री फसल बीमा योजनेमध्ये आज सव्वा कोटी नवे शेतकरी जोडले गेले आहेत आणि पुढे चालून हा आकडा जवळपास 5.75 कोटीवर पोहचणार असा अंदाज आहे. प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या योजनांपैकी 21 योजना पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि उर्वरित 50 योजना लवकरच पूर्ण केल्या जाणार आहेत. वर्ष 2019 च्या आधी एकूण 99 मोठ्या योजना पूर्ण करण्यास सरकार प्रयत्नशील आहे. भारत सरकार ने ‘प्रधानमंत्री किसान संपदा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांचे स्वामित्व दर्शवणार्‍या बियानांपासून ते बाजारपेठापर्यंत या दृष्टीकोनाने पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे.
 8. रोजगाराची सुवर्णसंधी - मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तरुणांना मोठ्या प्रमाणात विना गॅरंटी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. 8 कोटी पेक्षा अधिक युवांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज मिळाले आहे.
 9. गुणवत्तापूर्ण शिक्षण - मागील तीन वर्षांमध्ये 6 भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), 7 भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), 8 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) यांची स्थापना करण्यात आली आहे.
 10. सुविधा - महिलांना प्रसव काळ सुकर व्हावा यासाठी प्रसूती राजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्यात आली आहे. देशात पायाभूत सुविधांच्या संपूर्ण विकासासाठी रेल्वे मार्गिका, स्मार्ट शहरे, विमानतळ, वीजेसाठी सशक्त ग्रिड व्यवस्था, नेटवर्क अश्या विविध क्षेत्रात प्रकल्पांचा विकास केला जात आहे.


नवे ‘इंजेक्टेबल टिश्यू पॅच’ हृदयाला दुरूस्त करण्यास मदत करू शकते

 1. कॅनडाच्या टोरंटो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी टपाल स्टॅम्पपेक्षा अगदी लहान असे नवे ‘इंजेक्टेबल टिश्यू पॅच’ विकसित केले आहे, जे हृदयाला दुरूस्त करण्यास मदत करू शकते. छातीचा भाग उघडल्याशिवाय दुरूस्त करणारे ऊतकांचे पॅच (संकलन) एका लहान सुईने शरीरात टाकण्यासाठी हे एक तंत्र विकसित केले गेले आहे.
 2. हृदयाच्या ऊतकांच्या लहान पॅचला ‘एंजियोचीप (AngioChip)’ असे नाव दिले आहे, ज्यात स्वतःच्या रक्तवाहिन्या आणि हृदयाची पेशी आहेत.
 3. रेडिसिकच्या प्रयोगशाळेत माइल्स मॉन्टगोमेरी या पीएचडी संशोधकाने जवळजवळ तीन वर्षांच्या संशोधनानंतर हे पॅच विकसित केले आहे.

पॅच कसे काम करते?

 1. हे पॅच एखाद्या पट्टीप्रमाणे स्वतःला स्वरूप देते आणि नष्ट झालेल्या पेशींची जागा घेते. यामुळे शस्त्रक्रियेची गरज भासत नाही.
 2. यामुळे शरीरामधील प्रकेयेवर कोणताही फरक पडत नसल्याचे उंदीर व डुकरांवर करण्यात आलेल्या प्रयोगात आढळून आले.

या तंत्राची गरज :-

 1. हृदयविकाराच्या झटक्यामुळे किंवा इतर आरोग्यासंबंधी कारणामुळे नष्ट झालेल्या आणि ओपन-हार्ट शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या हृदयाच्या ऊतकांना (heart tissue) दुरूस्त करण्यासाठी ऊतकांची सहसा गरज असते.
 2. हृदयविकाराच्या झटक्यानंतर, ओपन-हार्ट सर्जरीसारख्या हल्लीच्या प्रक्रियेमुळे कदाचित हृदयाच्या कार्यामध्ये बाधा येऊन धोका निर्माण होतो.


Top