19 year old amgoth tukaram climb mount kiliamanjro

 1. तेलंगाणा येथील एका 19 वर्षीय तरुणाने माऊंट किलीमांजारो सर करत भारताचं नाव उज्वल केलं आहे.
 2. सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो हा समुद्र सपाटीपासून 5,895 मीटर उंच असून, आफ्रिकेतील टांझानियामध्ये आहे.
 3. तर हा महाकाय पर्वत 19 वर्षीय अमगोथ तुकाराम याने सर करत एक नवा टप्पा सर केला आहे.
 4. तसेच अमगोथ तुकाराम याने हेल्मेट वापराविषयीची जनजागृती करण्यासाठी ही मोहिम हाती घेतली आणि त्याची जबाबदारी पार पाडली.


indian economy on 6 th rank to overcome france

 

 1. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारताची अर्थव्यवस्था फ्रान्सला मागे टाकत जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.
 2. २०१७साठीच्या या आकडेवारीनुसार भारताचा जीडीपी २.५९७ लाख कोटी डॉलर्स असल्याचे जागतिक बँकने नमूद केले आहे. तर फ्रान्सचा जीडीपी २.५८२ लाख कोटी डॉलर्स आहे.
 3. सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर असून, त्यानंतर चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटन हे देश आहेत.
 4. या वर्षाच्या सुरूवातीला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ २०१८मध्ये ७.४ टक्क्यांच्या गतीने वाढेल असा अंदाज वर्तवला होता. तर २०१९मध्ये ही वाढ ७.८ टक्के असेल असाही अंदाज आहे.
 5. वाढीच्या वेगाचा विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था चीनपेक्षा (२०१८मध्ये ६.६ टक्के व २०१९मध्ये ६.४ टक्के) जास्त गतीने वाढेल असा अंदाज आहे.
 6. तत्पुर्वी भारत हा सर्वात वेगवान अर्थव्यवस्थेचा देश म्हणून ओळखला गेला होता. २०१६साली भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रगतीचा वेग ७.१ टक्के इतका होता. मात्र, जीएसटी व नोटबंदीमुळे तो वेग मंदावला होता.


ragunath mashelkar appointed as jio institute chancellor

 

 1. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची नॅशनल रिसर्च प्रोफेसर म्हणून 2016 मध्ये पुन्हा नियुक्ती करण्यात आली.
 2. त्यापाठोपाठ आता जिओ इन्स्टिट्युटच्या कुलगुरूपदीही त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.
 3. रिलायन्स फाऊंडेशनने या पदासंदर्भात त्यांना विचारणा केली असल्याची माहिती समोर येते आहे.
 4. तर उपकुलगुरू म्हणून दीपक जैन यांची निवड करण्यात येऊ शकते अशीही शक्यता आहे.
 5. दीपक जैन हे ससिन ग्रॅज्युएट इन्स्टिट्युटचे माजी संचालक होते. त्यांना उप-कुलगुरुपदासाठी विचारणा करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.


Top