chalu ghadamodi, current affairs

1. इंडियन वुमन नेटवर्कच्या सहकार्याने केरळ स्टार्टअप मिशन (केएसयूएम) ने कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) द्वारा स्थापन केलेल्या 'महिला स्टार्टअप समिट 201 9' चे आयोजन केले आहे 
2. हा कार्यक्रम 1 ऑगस्ट 2019 रोजी केरळच्या
इंटिग्रेटेड स्टार्टअप कॉम्प्लेक्स, कोची येथे होणार आहे
3. इव्हेंटची
थीम "समावेशी उद्योजकता इकोसिस्टम" विकसित करणे अशी  आहे.
4. महत्वाकांक्षी महिला व्यावसायिकांना त्यांच्या उद्योजक प्रवासासाठी आणि समावेशी उद्योजकता पर्यावरणाचा विकास करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे मुख्य उद्दीष्ट आहे.

 


chalu ghadamodi, current affairs

1. तांत्रिक अडचणीमुळे 'चांद्रयान-२' चे आजचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले असून लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल असं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे. आज १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार होते. 

2.भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-२' या मोहिमेकडे संपूर्ण देश डोळे लावून होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे मोहीम रद्द झाली असली तरी भारतीय नागरिक इस्रोसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

3. चांद्रयान-२ एकूण १२ भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे. वजन ३.८ टन इतके आहे. आठ हत्तींच्या वजनाच्या इतके आहे हे वजन. चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी मोहीम झालेली नाही


chalu ghadamodi, current affairs

1. स्वित्झर्लंडचा खेळाडू आणि विम्बल्डनवर अधिपत्य सांगणाऱ्या रॉजर फेडरर याला नमवत सर्वियाच्या नोवाक जोकोविचने यंदाच्या विम्बल्डन पुरुष एकेरीचं जेतेपट मिळवलं आहे. रविवारी सेंटर कोर्टवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात या दोन्ही खेळाडूंमध्ये तुल्यबळ लढत झाल्याचं पाहायला मिळालं.

2. जोकोविचने पाचव्यांदा विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरलं असून, या निमित्ताने त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

3. जवळपास चार तास आणि ५५ मिनिटांपर्यंत खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या जोकोविचने दुसऱ्या स्थानारील रॉजर फेडररला ७-६ (७-५), १-६, ७-६ (७-४), ४-६, १३-१२ (७-३) अशा सेटमध्ये पराभवाचा धक्का दिला.  


chalu ghadamodi, current affairs

1. लॉर्ड्सच्या ऐतिहासकि मैदानामध्ये पुन्हा एकदा इतिहास घडला आहे. अत्यंत रोमांचक अशा मॅचमध्ये इंग्लंडने वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. 

2. वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच फायनल टाय झाली. एवढच नाही तर फायनल टाय झाल्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली, अखेर सुपर ओव्हरही टाय झाल्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. या मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लडचा विजय झाला.

 


chalu ghadamodi, current affairs

1. १६६२: इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या रॉयल सोसायटीची स्थापना झाली.

2. १५४२: लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो यांचे निधन.

3. २००६: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.

4. १९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.

5. १९६७: गायक व नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचे निधन.


Top

Whoops, looks like something went wrong.