1. जेष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचे १५  मे रोजी दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. गेली सत्तर वर्षांहून अधिक वर्षे नाट्यव्यवसायात रंगभूषेची धुरा समर्थपणे सांभाळणारे रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचे मूत्रपिंडाच्या विकाराने मुंबईत निधन झाले.
  2. वयाच्या अकराव्या वर्षांपासून 'रंगभूषाकार' म्हणून बोरकर यांचा प्रवास सुरू झाला. वयोपरत्वे रंगभूषेच्या कामातून निवृत्ती पत्करल्यानंतर ते मुंबई विद्यापीठाच्या 'अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स'च्या अभ्यासक्रमात'रंगभूषा' हा विषय प्रात्यक्षिकासह शिकवण्याचे काम ते करत.
  3. बोरकर कुटुंबीय खरे तर गोव्यातील बोरी गावचे. पण पोर्तुगीजांच्या काळात काही मंडळींनी तिथून स्थलांतर केले आणि बोरकर रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिंचखरी गावी आले.
  4. १९९२ च्या २४व्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेवेळी उत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून पारितोषिक, गुडबाय डॉक्टर या नाटकातील मधुकर तोरडमल यांच्या रंगभूषेकरिता नाट्यदर्पण पुरस्कार, भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार यांशिवाय अनेक अन्य संस्थांनी त्यांना सन्मान आणि पुरस्कार दिले.


  1. गोव्यातील पर्यटनाला चांगला वाव मिळावा म्हणून गोवा पर्यटन विभागातर्फे नवीन बससेवेची सुरुवात करण्यात आली. बहुप्रतिक्षित अशा 'हॉप ऑन हॉप ऑफ' बससेवेचा गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगांवकरांच्या पंजिम येथील पर्यटन भवनात शुभारंभ करण्यात आला. 
  2. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना या बसमधून प्रवास करत गोव्यातील विविध पर्यटनस्थळांना भेट देता येईल.पुणेस्थित 'प्रसन्न पर्पल ग्रुप'च्या सहयोगाने गोवा पर्यटन विकास महामंडळाने या आरामदायी आणि अलिशान बससेवेची सुरुवात केली आहे.
  3. 'हॉप ऑन हॉप ऑफ' (एचओएचओ - होहो) नावाने सुरू झालेल्या या लाल रंगाच्या शाही बसमध्ये बसवून पर्यटकांना गोव्याची सफर घडविण्यात येईल'ओपन टॉप डबल डेकर' आणि 'हायडेक'स्वरुपातील या बस आहेत.


OBOR

चीन त्याच्या महत्त्वाकांक्षी “वन बेल्ट वन रोड(OBOR)” प्रकल्पामध्ये 2013 पासून आतापर्यंत USD60 अब्जची गुंतवणूक केली आहे आणि पुढील पाच वर्षामध्ये आणखी USD600 अब्ज ते USD800 अब्ज पर्यंत गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

OBOR:

"वन बेल्ट वन रोड" या योजनेमध्ये दोन घटकाचा समावेश आहे.

1) सिल्क रोड इकॉनॉमिक बेल्ट,

2) 21ST सेंचुरी मेरीटाइम सिल्क रोड.

 

सिल्क रोड इकॉनॉमिक बेल्ट मध्ये तीन मार्ग समाविष्ट आहेत,

1) मध्य आशिया आणि रशिया मार्गे चीन ते युरोप,

2) मध्य आणि पश्चिम आशिया मार्गे चीन ते पर्शियन आखात आणि भूमध्य समुद्र,

3) चीन ते दक्षिण- पूर्व आशिया,दक्षिण आशिया आणि हिंद महासागर

 

21ST सेंचुरी मेरीटाइम सिल्क रोड मध्ये दोन मार्ग समाविष्ट आहेत,

1) दक्षिण चीन समुद्र मार्गे चीनी सागरी किनारपट्टी शहरे ते हिंद महासागर, पुढे युरोप पर्यंत विस्तारित

2) दक्षिण चीन समुद्र मार्गे चीनी सागरी किनारपट्टी शहरे ते दक्षिण पॅसिफिक

 

भारताचा विरोध:

भारत हा भौगोलिक जोडणी वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय सामुसायाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमामध्ये सहभाग घेत आला आहे.

मात्र OBOR हा विकासाच्या दृष्टीने सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय एकात्मते संबधित या मुख्य मुद्द्याशी जुळून नाही.

 

चीन साठी महत्वपूर्ण:

आर्थिक वाढीतील कमी गती आणि त्यामुळे निर्यातीत होणारी मोठी घसरण यामुळे सर्वात मोठा उत्पादक देश चीन समोर आर्थिक संकट येऊ शकते. त्यामुळे हा उपक्रम मोठे पाठबळ ठरणार आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.