Organized 'IONS Seminar' on the 10th anniversary of Kochi

 1. केरळच्या कोचीमध्ये 13 व 14 नोव्हेंबर 2018 पासून ‘इंडियन ओशन नेव्हल सिम्पोझियम (IONS)’ याचा 10वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी एक परिसंवाद आयोजित केले गेले होते.
 2. "IONS अॅज ए कॅटालिस्ट फॉर SAGAR" या विषयाखाली हा कार्यक्रम चालवला गेला.
 3. भारत सरकारचा ‘SAGAR (‘सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन’ / प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा व विकास)’ हा दृष्टीकोन भारताच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरणाशी संबंधित आहे आणि देशाच्या राजनैतिक, आर्थिक आणि लष्करी आराखड्याशी संबंधित आहे.
 4. इंडियन ओशन नेव्हल सिम्पोझियम (IONS) हिंद महासागर प्रदेशातील देशांतर्गत द्विवार्षिक बैठकीची एक शृंखला आहे.
 5. या मंचाची सुरुवात 2008 सालच्या फेब्रुवारी महिन्यात भारताने केली होती. एकूण 32 देश IONSचे सदस्य आहेत.
 6. हे सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्याला बळकट करण्यासाठी एक मंच प्रदान करते तसेच क्षेत्रीय समुद्री समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि सदस्य राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी सहाय्य प्रदान करते.
 7. सन 2018 मध्ये इराणी नौदलाने दोन वर्षांसाठी IONS चे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे.


ISRO's GSAT-29 communication satellite

 1. दिनांक 14 नोव्हेंबर 2018 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (ISRO) आंध्रप्रदेशाच्या श्रीहरिकोटा तळावरून 3,423 किलोग्राम वजनी GSAT-29 दळणवळण उपग्रहाला अवकाशात पाठविण्यात आले आहे.
 2. चार टन भार वाहून नेण्याची क्षमता असणार्‍या GSLV-Mk 3-D2 अग्निबाणाच्या सहाय्याने उपग्रहाला पृथ्वीपासून 36,000 किमी अंतरावर भूस्थिर कक्षेत पाठवले जात आहे.
 3. उपग्रहाद्वारे Ka/Ku-बँड हाय थ्रुपुट कम्युनिकेशन ट्रांसपॉन्डर पाठविण्यात आले आहे, ज्यामुळे डोंगराळ आणि दुर्गम भागात वापरकर्त्यांना उच्च-गती संपर्क सेवा पुरविण्यासाठी मदत मिळणार.
 4. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे.
 5. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे.
 6. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले.
 7. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत संघाने प्रक्षेपित केला.
 8. 1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा प्रक्षेपित करण्यात आला.
 9. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली आणि चंद्रावर पोहचणारा भारत हा जगातला चौथा देश बनला.
 10. त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.


'Indra 2018': Combined Military Practice of India and Russia

 1. दिनांक 18 नोव्हेंबर 2018 पासून उत्तरप्रदेशात बाबिना येथील लष्करी तळावर भारत आणि रशिया यांच्या लष्करी दलांचा ‘इंद्रा 2018’  नावाचा संयुक्त लष्करी सराव सुरू होणार आहे.
 2. ‘इंद्रा’ मालिकेचा यावर्षीची ही दहावी आवृत्ती आहे.
 3. हा सराव संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वाखाली बंडविरोधात लढा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे.
 4. अकरा दिवस चालणार्‍या या प्रशिक्षण कार्यक्रमात लष्कराच्या आंतर-कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी अनुभवांचे आदानप्रदान केले जाणार आहे.
 5. रशिया हा पूर्व यूरोप आणि उत्तर एशिया प्रदेशात स्थित एक विशाल आकार असलेला देश आहे.
 6. हा एकूण 17075400 चौ. किमी. क्षेत्रफळ असलेला जगातला सर्वात मोठा देश आहे. आकाराच्या दृष्टीने हा भारताच्या पाच पट आहे.
 7. या देशाची राजधानी मॉस्को शहर असून देशाचे चलन रशियन रूबल हे आहे. देशाचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे आहेत.


7 extremist groups in Manipur extends ban for five years

 1. केंद्र सरकारने मणीपूर राज्यात कार्यरत असलेल्या 7 मीतेई जहालमतवादी गटांवर आलेल्या बंदीचा काळ आणखी पाच वर्षांसाठी वाढविण्यात आला आहे.
 2. ‘अनाधिकृत क्रियाकलाप (प्रतिबंधक) अधिनियम-1967’ अंतर्गत तरतुदींच्या अन्वये बंदी घालण्यात आलेले गट पुढीलप्रमाणे आहेत -
  1. पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) आणि त्याची ‘द रिव्होल्यूशनरी पीपल्स फ्रंट’ ही राजकीय शाखा
  2. यूनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) आणि त्याची ‘मणीपूर पीपल्स आर्मी’ ही सशस्त्र शाखा
  3. कांगलीपाकची पीपल्स रिव्होल्यूशनरी पार्टी आणि त्याची 'रेड आर्मी' ही सशस्त्र शाखा
  4. कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टी (KCP) आणि त्याची 'रेड आर्मी' ही सशस्त्र शाखा
  5. कांगली याओल कान्बा लुप (KYKL)
  6. द कोऑर्डिंनेशन कमिटी
  7. अलायन्स फॉर सोशलिस्ट युनिटी कांगलीपाक (ASUK).


rs-75-coin-to-be-issued-to-mark-75th-anniversary-of-tricolour-hoisting-by-bose

 1. पोर्ट ब्लेअर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकवला होता.
 2. या घटनेच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त 75 रूपये मूल्य असलेले स्मारक नाणे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
 3. 30 डिसेंबर 1943 रोजी अंदमान व निकोबार बेटे या केंद्रशासित प्रदेशात पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेल येथे जपानच्या मदतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकवला होता आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूहाला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त म्हणून घोषित केले होते.


Top